दीपक मोहिते,
देवेंद्र फडणवीस यांनी शिवचरित्र वाचायला हवं,
एका वृत्तवाहिनीने आज आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ” महाराष्ट्राचा महासंकल्प,” हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता.” राज्याचा विकास व राजकीय चढाओढ,” या विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,( शरद पवार गट ),भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,छगन भुजबळ यांनी आपली मते दिलखुलासपणे मांडली.
सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांना पाचारण करण्यात आले होते.त्यांना लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाद झाल्यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला व मी मध्यस्थी केल्याचे मान्य केले व या योजनेचे श्रेय एकट्याने कोणी घेऊ नये,अशा सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.त्यानंतर मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे,यावर बोलताना त्यांनी मूळ विषयाला बगल देत ” सुरतेची लूट,” या शब्दावर केंद्रित केले,यावेळी ते म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांना लुटेरा म्हणणे योग्य नाही,शिवाजी महाराजांनी ” सुरतेवर स्वारी,” केली,असे म्हंटले पाहिजे,शिवाजी महाराजांनी कधीही सुरतेची लूट केली नाही,तर त्यांनी स्वारी केली.मूळ मुद्दा बाजूला ठेवत फडणवीस यांनी खोटे बोलून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला.आजवर अनेक चरित्रकारांच्या चरित्रात त्यांनी काय म्हटलं आहे,हे त्यांनी नजरेखालून घालायला हवं होतं.इतर चरित्रकार नको,त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवचरित्र तरी वाचायला हवं.निखालस खोटं बोलून ते कितीही रेटलं तरी इतिहास बदलता येत नाही.याचा त्यांना विसर पडला आहे.

