Author: दीपक मोहिते

नवीन पाटील,सफाळे मायखोप गावात लाखो लिटर पाणी वाया… पालघर जिल्ह्यातील झांझरोळी धरणाची जीर्ण झालेली जलवाहिनी मायखोप गावात फुटल्याने परिसरात लाखो लिटर पाणी वाया गेले. जीर्ण झालेली जलवाहिनी बदलणे आवश्यक असताना कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे ही जलवाहिनी वारंवार फुटत आहे.त्यामुळे लाखो लिटर्स पाणी वाया जात आहे. पालघर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाला कळवुनही उपाययोजना करण्यात येत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा सारख्या तालुक्यात अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो तर दुसरीकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे.काल सकाळी सहाच्या सुमारास केळवे रोड बंधारा धरणाची जलवाहिनी मायखोप गावात फुटली. केळवा, मायखोप व…

Read More

दीपक मोहिते, बाधित शेतकरी,मच्छीमार व ग्रामस्थांना तातडीच्या मदतीची गरज, गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने पालघर जिल्ह्यातील शेतकरी,मच्छीमार व ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले आहे.या नुकसानीचे भयावह स्वरूप लक्षात घेता सरकारने तुटपुंजी नुकसानभरपाई न देता जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज देण्याची गरज आहे.अनेक ग्रामस्थांच्या घरावरील पत्रे उडाले,मच्छीमार बोटी क्षतीग्रस्त झाल्या व अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले,त्यामुळे,या घरांची तातडीने डागडुजी होणे गरजेचे आहे.तसेच या नैसर्गिक आपत्तीमध्ये शंभरहून अधिक मच्छीमार बोटीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.या मच्छीमाराना आपल्या बोटीची दुरुस्ती करण्यासाठी त्वरित आर्थिक सहाय्य मिळायला हवे.अन्यथा अनेक मच्छीमार कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये उन्हाळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरीवर्ग भितीच्या सावटाखाली…

Read More

जव्हार प्रतिनिधी, आदिवासी वस्ती मुलभूत सुविधांपासून वंचित ; आ.भोये यांची प्रत्यक्ष भेट, मोखाडा तालुक्यातील मोरांडा भागातील मुरबाटवाडी या आदिवासी वस्तीत आजही रस्ते,वीज,पाणी,आरोग्य, शाळा आणि अंगणवाडी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. शेतमाळरानावर वसलेली ही वाडी गेल्या पन्नास वर्षांपासून अस्तित्वात असतानाही शासनाच्या योजनांपासून कोसोंदूर आहे.या वाडीत सध्या १८ कुटुंबे राहतात आणि सुमारे १२५ लोकवस्ती आहे. ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार,वस्ती उशिरा वसल्याचे कारण देत अधिकारी अनेक वर्षांपासून विकासकामांना टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.गेल्या तीन दिवसांपूर्वी येथील महिलांनी आ. हरिश्चंद्र भोये यांच्या जव्हार येथील कार्यालयात भेट देऊन वस्तीतील समस्या मांडल्या. त्यानंतर आमदार भोये यांनी काल मुरबाटवाडीला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि ग्रामस्थांच्या…

Read More

वसंत भोईर,वाडा कुडूसमध्ये दोन तरूणांना बेदम मारहाण,१८ जणांवर गुन्हे दाखल, तालुक्यातील कुडूस येथे मांगाठणे येथील रूपेश पाटील हा तरूण आपल्या मित्रांसोबत काल सायंकाळी चायनीज पदार्थ खात असताना किरकोळ कारणावरून वादावादी झाली.काही तरुण जोराने ओरडत असल्याने त्याने चायनीज हॉटेल मालकाला आरोपींना हळू आवाजात बोलण्यास सांगितले.त्याचा मनात राग धरून रूपेश व कुणाल या दोघांना आरोपींनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली.या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या वादामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. सायम शेख,काल्या पूर्ण नाव माहीत नाही,सुभान सुसे, मोहाफीज सुसे,राजु सुसे, मोहम्मद घोस व अन्य १० ते १८👇 इसम अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस सुत्रांनी…

Read More

नदीम शेख,पालघर नुकसानभरपाईसाठी विशेष पॅकेज देण्यात यावे -आ.गावित, पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने शेकडो घरांचे नुकसान झाले आहे.तसेच मच्छीमार बांधवांचे देखील मोठे नुकसान झाल्याने पालघर जिल्ह्यासाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर करून शेतकरी,आदिवासी आणि बागायतदार तसेच मच्छीमार बांधवांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक घरांचे अतोनात नुकसान झाले होते. अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे शेतकरी,मच्छीमार,सामान्य जनतेला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. शेतकऱ्यांचे दुबार भात शेती सह विट उत्पादक,पालेभाजी फळबाग लागवड शेतकरी तसेच मच्छीमार बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.आ.राजेंद्र गावित यांनी धाकटी…

Read More

सचिन परब,वसई २८७ वा “ वसई विजयोत्सव दिन,” मोठ्या जल्लोषात संपन्न, वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित ” २८७ वा वसई विजयोत्सव दिन, ” आज मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. प्रथेप्रमाणे सकाळी ०७.०० वाजता वज्रेश्वरीदेवी मंदिर, वज्रेश्वरी येथे मशाल पूजन करून मशाल यात्रेला सुरुवात झाली. अग्निशमन विभागाच्या विशेष वाहनातून व बाईकस्वारांच्या सोबतीने वज्रेश्वरीहून निघालेली मशाल यात्रा राष्ट्रीय महामार्ग – वसई फाटा – वालीव नाका – गोखीवरे नाका – चिमाजी अप्पा उद्यान, नवघर पूर्व – माणिकपूर येथून पारनाका येथे पोहोचल्यावर या मशाल यात्रेत ढोल-ताशा पथक, लेझीम पथकांच्या जल्लोषपूर्ण गजरात मशाल यात्रा वसई किल्ल्यापर्यंत काढण्यात आली.यावेळी विविध पारंपारिक वेशभूषेत मान्यवर…

Read More

वसंत भोईर,वाडा स्वतःची शेती दुसराच कोणीतरी कसतोय , कृषी निविष्ठांमुळे उत्पादन खर्च वाढला असताना शेतीला नैसर्गिक आपत्तीचा फटका दरवर्षी बसत आहे.अशा परिस्थितीत मजुरांची टंचाई व वाढती मजुरी,यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त आहे.घरी पिक कधी येईल,याची शाश्वती राहिली नाही.अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी शेती बटाईने दिली आहे. पालघर जिल्ह्यातील शेती ही निसर्गावर अवलंबून आहे.त्यातच कृषी निविष्ठांच्या वाढत्या दराने उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे.शिवाय पेरणी,मजुरी व मशागतीचे दर वाढले आहेत.पिके काढणीच्या काळात पावसाचा तडाखा अन नेमके याचवेळी मजुरांचा तुटवडा असतो.त्यामुळे शेती करणे,हे बेभरवशाचे झाले आहे. शेती व्यवसाय परवडणारा नाही,त्यामुळे काही जणांनी रोजगाराच्या शोधात आपला मोर्चा शहराकडे वळवला आहे. आणि काही शेतकरी शेती बटाईने देण्याकडे…

Read More

वसंत भोईर, वाडा वाडा येथे बालसंस्कार शिबिरातून घडतोय वारकरी संप्रदाय, तालुक्यातील स्वर्गीय सुख निवासी ह.भ.प.गोविंद बाबा तपोभूमी मंदिर शेले फाटा येथे बालसंस्कार शिबिरातून मुलांना वारकरी,धार्मिक आणि संप्रदाय शिक्षण देण्यात येत आहे.यंदा प्रथमच ह.भ.प.रोहण पाडेकर, हार्दिक तरे यांच्या माध्यमातून विनामूल्य बाल संस्कार शिबिर भरविण्यात आले आहे. काल शिबिराला सुरुवात झाली असून १८ मे पर्यंत ते चालणार आहे.या निवासी शिबिरात ८० बालके सहभागी झाली आहेत.ही सर्व बालके वाडा तालुक्यातील गाव खेड्यातून आध्यात्मिक धडे घेण्यासाठी या शिबिरामध्ये सहभागी झाली आहेत. या शिबिरात मुलांना गायन,वादन,गीता पठण, ज्ञानेश्वरी वाचन,वारकरी चाली शिकवण्यात येतात.दररोज विविध विषयांवर कीर्तन, प्रवचन,पखवाद वादन, संध्याकाळी हरिपाठ,किर्तन, भजन कार्यक्रम सुरू आहेत. ही सर्व…

Read More

नवीन पाटील,सफाळे पालघरच्या साईराज पाटील याला मुंबई टी २० स्पर्धेसाठी सर्वाधिक बोली, आयपीएलच्या लिलावात दुर्लक्षित राहिलेला व गत मोसमात मुंबईकडून मर्यादित षटकाचा एकही सामना न खेळलेल्या पालघरच्या साईराज बिपिन पाटील याला मुंबई टी-२० च्या लिलावात ईगल ठाणे स्टायकर्स संघाने सर्वाधिक म्हणजेच १५ लाख रु.ची बोली लावली. पालघर जिल्ह्यातील साईराज हा विरार डहाणू तालुका क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. मध्यगती गोलंदाजी करणाऱ्या या अष्टपैलू खेळाडूंनी सध्या मोसमात मुंबईतील विविध स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला आहे.ठाणे प्रिमियर लीग,सालारजंग,डी.वाय. पाटील अशा विविध स्पर्धांमध्ये त्यांनी प्रभावी कामगिरी केली होती.त्याची या कामगिरीची दखल ईगल ठाणे स्ट्रायकर्स संघाने घेतली आहे. मर्यादित षटकाच्या लढतीसाठी…

Read More

दीपक मोहिते, ” चुकीचा पायंडा,” भारताने युक्रेनसारखी हिम्मत दाखवायला हवी होती, अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत – पाक युद्धात शस्त्रसंधी घडून आली.युद्ध होणे व ते लांबत जाणे,कधीही हानिकारकच असते.त्यामध्ये मानवी संहार,युद्धात उतरलेल्या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था रसातळाला जाणे,सार्वजनिक मालमत्तेची होणारी अपरिमित हानी,व्यापार व औद्योगिक वाढीला खीळ बसणे,अशा प्रकारामुळे युद्ध लांबत जाणे,हे कोणत्याही देशाला परवडणारे नसते.रशिया – युक्रेन,इस्त्रायल – पॅलेस्टाईन युद्धात आपण हे सारे अनुभवत आहोत.त्यामुळे गेल्या आठवड्यात सुरू झालेले भारत – पाक युद्ध त्वरित थांबावे,यासाठी अमेरिकेसह अनेक युरोपीय देश आग्रही होते.पण पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या आतताईपणामुळे हे युद्ध आठवडाभर लांबले. भारताने थेट लाहोर,कराची व पाकव्याप्त काश्मीर पर्यंत मुसंडी मारल्यानंतर पाकची भंबेरी उडाली…

Read More