- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
संगीता तावडे,मंत्रालय प्रतिनिधी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक संपन्न. वसईच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे विविध योजना हाती घेतल्या आहेत. त्यामध्ये (१) अर्नाळा किल्ला आणि ७ गावे (२)अर्नाळा गाव व १६ गावे तसेच (३) तिल्हेर गाव व १२ गावे,अशा तीन योजनांचा समावेश आहे. या तीन योजनांना सन २००८ मध्ये शासनाने मंजूरी दिली होती.मात्र त्यावर कोट्यावधी रु.चा निधी खर्च होऊनही या योजना पूर्ण झाल्या नाहीत.त्यानंतर शासनाने पुन्हा सन २०२२ मध्ये या योजनांना नव्याने मंजूरी देऊन त्याप्रमाणे कार्यादेश देण्यात आले.मात्र निविदेनुसार विहीत कालावधी पूर्ण होऊनही या योजनांची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पालघर,जिल्हा…
नदीम शेख,पालघर पालघर स्थानकावर कच्छ व दादर-बीकानेर एक्सप्रेसला थांबा, पालघर जिल्ह्याच्या रेल्वेप्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी अखेर पूर्ण झाली असून, २२९५५/२२९५६ बांद्रा टर्मिनस-भुज कच्छ एक्सप्रेस आणि १२४८९/१२४९० बीकानेर-दादर एक्सप्रेस या दोन महत्त्वाच्या गाड्यांना प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर पालघर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.त्यानंतर प्रशासन तिकीट विक्री आणि प्रवाशांच्या प्रतिसादाच्या आधारावर याचे पुनरावलोकन करणार आहे. प्रवाशांची संख्या समाधानकारक राहिल्यास,या थांब्यांना कायमस्वरूपी मंजुरी देण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामागे पालघर लोकसभा मतदारसंघाचे खा.डॉ.हेमंत सवरा यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कारणीभूत ठरला आहे.त्यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्रव्यवहार करून तसेच संसदेत प्रश्न उपस्थित करून ही मागणी सातत्याने मांडली होती.जिल्ह्याचा औद्योगिक आणि आर्थिक विकासाचा विचार करता,तसेच प्रवाशांच्या सुविधेसाठी हे थांबे आवश्यक…
वसंत भोईर,वाडा वाडा शहराला मिळाले अतिरिक्त पाणी ; वाडावासीय सुखावले, वाडा शहराला वैतरणा नदीवरील सिध्देश्वर बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्यात येत असतो.मात्र यंदा पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे वाडा शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती.अखेर तहसीलदार गटविकास अधिकारी व लघुपाटबंधारे अधिका-यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नामुळे अतिरिक्त पाणी मिळू शकले. त्यामुळे वाडावासीयांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. वाडा शहराची लोकसंख्या ३० ते ३५ हजारांच्या आसपास असून शहराला वैतरणा नदीवरील सिध्देश्वर बंधाऱ्यातून पाण्याचा पुरवठा केला जातो.मात्र दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात नदीच्या पाण्याची पातळी खाली जाते व नदी कोरडीठाक पडते.त्यामुळे दरवर्षी या दोन महिन्यात वाडावासींयावर तीव्र पाणीटंचाईचे सावट असते. अखेर याविषयी वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यानी…
दीपक मोहिते, निवृत्त न्या.संजीव खन्ना ; न्यायव्यवस्थेतील आदर्श व्यक्तिमत्व, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदाची सूत्रे न्यायमूर्ती बी.आर.गवई यांनी नुकतीच स्विकारली.निवृत्त होत असलेले भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता. अॅटर्नी जनरल,सॉलिसिटर जनरल यांच्यापासून ते सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिलांपर्यंत अनेक दिग्गज, तसेच न्यायपालिकेशी संबंधित विविध मान्यवर या निरोप समारंभाला हजर होते.यावेळी अनेक वक्त्यांनी खन्ना यांचं कौतुक करत त्यांना हसतमुखाने निरोप दिला. अॅटर्नी जनरल आर. वेकंटरमणी यांनी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी आपल्या भाषणात आजवर दिलेल्या निकालांचे,त्यांच्या स्पष्टतेचे व त्यांच्या साधेपणाचे तोंडभरून कौतुक केले.वेंकटरमणी म्हणाले, “ सरन्यायाधीश संजीव खन्ना हे नेहमीच न्यायपालिकेचे स्वातंत्र्य व संस्थात्मक अखंडता कायम राहावी,यासाठी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वसई-विरारमध्ये असे अनेक सीताराम गुप्ता दडून बसले आहेत, वसई विरार भागातील कुविख्यात भुमाफिया सीताराम गुप्ता यांच्यासह दहा ते बारा जणाच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी काल दिवसभर छापे मारले.सुमारे सहा ते सात तास,ही छापेमारी सुरू होती.यामध्ये भाजपच्या एका पदाधिकाऱ्याचा समावेश आहे.या पदाधिकाऱ्यांनी आता ” मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याची,” कोल्हेकुई सुरू केली आहे. सीताराम गुप्ता हा वसई विरार भागातील कुप्रसिद्ध भुमाफिया असून गेल्या तीन दशकात त्याने सरकारी,आदिवासी व शासकीय कामासाठी आरक्षित असलेल्या असंख्य जमिनी गिळंकृत केल्या व स्वतःचे आर्थिक साम्राज्य उभे केले.एका राजकीय पक्षात सक्रिय असल्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी त्याला वचकून असायचे.तो महानगरपालिकेचा माजी नगरसेवक होता.त्याने आपल्या…
दीपक मोहिते, अवकाळी पावसाचा पालघर व नाशिक जिल्ह्याला पुन्हा दणका, काल जव्हार,नाशिक,त्र्यंबकेश्वर या भागात जोरदार पाऊस पडला.सांयकाळी चारच्या सुमारास सुरू झालेल्या या धुवांधार पावसाने नागरिकांची पार दाणादाण उडवून दिली.अनेक भागात पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर चांगलाच परिणाम जाणवला.सुमारे चार तास झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील जनजीवन पार विस्कळीत झाले होते. राज्यात पडत असलेल्या अवकाळी पावसाने अनेक रब्बीची पिके धोक्यात आली आहेत.शेतकरीवर्ग चिंतेत सापडला असताना काल पुन्हा अवकाळी पावसाने पालघर व नाशिक जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले.सलग चार तास पडलेल्या या पावसाने या दोन्ही जिल्ह्यातील अनेक भाग जलमय झाले.नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे.तर गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने पालघर जिल्ह्यातील सुमारे दीड…
वसंत भोईर,वाडा वाड्याचा निकाल ९२.४० % मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल काल लागला असून तालुक्याचा निकाल ९२.४० टक्के लागला आहे.तालुक्यात एकूण परिक्षेस १ हजार ५३४ मुले तर १ हजार ५२० असे एकूण ३ हजार ५४ विद्यार्थी परिक्षेस बसले होते त्यापैकी २ हजार ८२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ९२. ४० इतकी आहे. तालुक्यातील ह.वि.पाटील विद्यालय व कै.घ.बा.पाटील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चिंचघरचा निकाल ८८.३० टक्के लागला आहे.अस्पी विद्यालय उचाट – ८३.५० तर सीबीएसई,१२ वीचाही निकाल जाहीर झाला असून झेड.ए.मेमन इंग्लिश स्कुल -१०० %
नवीन पाटील,सफाळे सफाळे रेल्वे फाटक क्र. ४२ बंद करण्या प्रकरणी कृती समितीचे आमरण उपोषण सुरू, पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाजवळ असलेले रेल्वे फाटक क्रमांक ४२ कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता ३१ मार्च २०२५ रोजी रेल्वे प्रशासनाने अचानकपणे बंद केले होते.त्यामुळे पादचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ कालपासून सफाळे विकास कृती समितीतर्फे उपोषण सुरू करण्यात आले आहे. रेल्वे फाटक क्रमांक ४२ हे बंद होऊ नये,यासाठी कृती समितीने वेळोवेळी रेल्वे प्रशासन,स्थानिक प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे आपल्या मागण्या मांडल्या. मात्र त्यावर फक्त आश्वासने देण्यात आल.प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी झाली नाही, असे समितीचे अध्यक्ष सिकंदर…
सुरेश वैद्य, पालघर पालघर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९५.३८ टक्के ; मुलींनी मारली बाजी, फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये झालेल्या १० वीच्या ( माध्यमिक ) परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला असून, पालघर जिल्ह्याचा एकूण निकाल ९५.३८ टक्के लागला आहे. यंदा मुलींनी मुलांपेक्षा चांगले यश मिळवत निकालात आघाडी घेतली आहे. या परीक्षेला जिल्ह्यातून एकूण ६३ हजार ६१७ विद्यार्थी बसले होते.यामध्ये ३३ हजार ३५५ मुले व ३० हजार २६२ मुलीचा समावेश होता.त्यापैकी ३१ हजार ४४८ मुले व २९ हजार २३२ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण होणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या ६० हजार ६८० इतकी आहे. मुलांचा निकाल: ९४.२८% मुलींचा निकाल: ९६.५९% एकूण जिल्हा निकाल: ९५.३८ % विद्यार्थ्यांनी…
सचिन भोईर,वसई चंद्रेपाडा उपसरपंचपदी हेमराज भोईर, वसई तालुक्यातील चंद्रपाडा ग्रामपंचायत उपसरपंचपदी हेमराज भोईर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीचे कामकाज ग्रामविकास अधिकारी विजय लोकरे व सरपंच दिनेश काटेला यांनी पाहिले. यशस्वी उद्योजक तसेच सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेले हेमराज भोईर यांची चंद्रपाडा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निवडीच्यावेळी अविष्कार पाटील,गंगाधर भोईर, विश्वजित पाटील, हरेश भोईर,भूपेश पाटील, चेतन तांडेल, अभिषेक म्हात्रे, हर्षद पाटील, मंगेश पाटील, रोहिदास मादणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शासनाच्या विविध योजनांचा फायदा ग्रामपंचायतीस मिळवून देऊन जास्तीत जास्त कामे मार्गी लावणे,सोपवलेली जबाबदारी पार पाडून माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे,”.असे भोईर…
