सचिन भोईर,वसई
चंद्रेपाडा उपसरपंचपदी हेमराज भोईर,
वसई तालुक्यातील चंद्रपाडा ग्रामपंचायत उपसरपंचपदी हेमराज भोईर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीचे कामकाज ग्रामविकास अधिकारी विजय लोकरे व सरपंच दिनेश काटेला यांनी पाहिले.
यशस्वी उद्योजक तसेच सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेले हेमराज भोईर यांची चंद्रपाडा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या निवडीच्यावेळी अविष्कार पाटील,गंगाधर भोईर, विश्वजित पाटील, हरेश भोईर,भूपेश पाटील, चेतन तांडेल, अभिषेक म्हात्रे, हर्षद पाटील, मंगेश पाटील, रोहिदास मादणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या विविध योजनांचा फायदा ग्रामपंचायतीस मिळवून देऊन जास्तीत जास्त कामे मार्गी लावणे,सोपवलेली जबाबदारी पार पाडून माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे,”.असे भोईर यांनी माध्यमाना सांगितले.

