सुरेश वैद्य, पालघर
पालघर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९५.३८ टक्के ; मुलींनी मारली बाजी,
फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये झालेल्या १० वीच्या ( माध्यमिक ) परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला असून, पालघर जिल्ह्याचा एकूण निकाल ९५.३८ टक्के लागला आहे. यंदा मुलींनी मुलांपेक्षा चांगले यश मिळवत निकालात आघाडी घेतली आहे.
या परीक्षेला जिल्ह्यातून एकूण ६३ हजार ६१७ विद्यार्थी बसले होते.यामध्ये ३३ हजार ३५५ मुले व ३० हजार २६२ मुलीचा समावेश होता.त्यापैकी ३१ हजार ४४८ मुले व २९ हजार २३२ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण होणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या ६० हजार ६८० इतकी आहे.
मुलांचा निकाल: ९४.२८%
मुलींचा निकाल: ९६.५९%
एकूण जिल्हा निकाल: ९५.३८ %
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल पालकमंत्री पालघर जिल्हा, जिल्हाधिकारी पालघर,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

