Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, आज छत्रपती शिवाजी महारांजाची ३९५ जयंती उत्साहात साजरी होणार… हिंदवी स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी १९ फेब्रु.रोजी साजरी होत असते.यंदाही महाराष्ट्रात शिवजयंती धुमधडाक्यात साजरी होणार आहे.या सोहोळ्याला उत्सवाचे स्वरूप असते.राज्य शासन या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करते.राज्यातील शिवप्रेमी आजच्या दिवशी मिरवणुका,लेझीम व अन्य उपक्रम दिवसभर राबवत असतात.त्यामध्ये आबालवृद्ध,तरुण-तरुणी व बाळगोपाळ मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.त्यांचा जन्म १९ फेब्रु.१६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे विजापूरच्या सुलतानाच्या सैन्यात प्रमुख सरदार होते. त्यांची आई जिजाबाई या सिंदखेड येथील लखुजी जाधवराव यांच्या कन्या होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांना बालवयात हिंदवी…

Read More

संजय लांडगे,वाडा ट्रक व दुचाकीच्या अपघातामध्ये एक ठार,तर एक जखमी, वाडा तालुक्यातील वसुरी येथील अरुंद पुलावरुण वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकचा समोरासमोर अपघात होऊन दुचाकी वरील एक जण ठार झाला आहे,तर दुसरा जखमी झाला आहे.जखमीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वाडा तालुक्यातील वसुरी येथील अरुंद पुलावरुन मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास दोन ट्रक समोरा समोरून जात असताना त्यांच्यात अपघात झाल.यापैकी एका ट्रकच्या मागून येणाऱ्या दुचाकीला धडक लागल्यामुळे दुचाकीवरील दिलीप धाऊ भुयाळ ( वय ४२ ) रा. गोऱ्हाड यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अनंता चाहू पवार ( वय ५४ ) रा.दापिवली हा जखमी झाला असून त्याला खानिवली येथील प्रथमिक आरोग्य…

Read More

सचिन परब, लाच स्विकारताना तीघेजण लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भरारी पथकातील दोन पोलीस व एका खाजगी व्यक्ती असे एकूण तिघांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजार रू.ची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. दत्ता माधवराव शिंदे,श्रीराम सूर्यभान डाखुरे,हे दोघे पोलीस शिपाई व तृणाल मोहन धनु अशी या तिघांची नावे आहेत.तक्रारदार हा खडी विक्रीचा व्यवसाय करत असून त्याच्या वाहनावर ( हायवा डंपर ) जप्तीची कारवाई न करण्यासाठी या तिघांनी त्यांच्याकडे २ लाख रू.ची मागणी केली होती.याबाबत संबंधित तक्रारदाराने लांचालूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पथकाने सापळा रचून या तिघांना रंगेहाथ पकडले. वरील दोन्ही पोलीस शिपाई हे अनुक्रमे बोईसर व मनोर पोलीस ठाण्याचे कर्मचारी…

Read More

शुभम सावंत,विरार उत्कर्ष विद्यालय,पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाने केला शिवमहोत्सव साजरा, शिवजयंती निमित्त विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट,उत्कर्ष विद्यालय,पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागात शिवमहोत्सव साजरा करण्यात आला. पारंपारिक वेशभूषेत आलेल्या १५०० विद्यार्थ्यांनी शिवमय वातावरणात महाराजांना मानवंदना दिली . मुख्याध्यापिका श्रीमती भक्ती वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून महाराजांचा आगमन सोहळा पार पडला.जय भवानी,जय शिवाजी शिवगर्जनेच्या जयघोषात परिसर दुमदुमला. कु.द्रोण केळवेकर,मंजिरी सावंत,अथर्व बने,अन्वी राऊत,तत्वमसी तांडेल, शिवाजीच्या भूमिकेत शिवांश सावंत,शिवगर्जना कु.वेदांत वझे,कु.शिवन्या साळवी, कु.सृष्टीबैकर,कु.अर्णा पोवार कु.सत्यम तोरसकर.कु.गझल गजभारे कु.रूद्र पाडावे यांनी शिवजन्मोत्सवासह पाळणा, माहिती,पोवाडा,शिवनाट्य सादर केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अक्षता चव्हाण,ज्येष्ठ शिक्षिका मुग्धा पाटील,अपर्णा पालव,किरण राणे,संजना…

Read More

अनंत भोईर,पालघर, जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे वितरण, बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा मनोर मार्फत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांस जिल्हा अग्रणी बँक व आर्थिक साक्षरता सल्ला केंद्र,पालघर यांच्यावतीने विमा रकमेचे वितरण जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर येथे करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विशाल वाघ,मनोर शाखेचे व्यवस्थापक नवदीप यादव, वैभव विधाते,वित्तीय साक्षरता अधिकारी उज्ज्वला कोकणे आदि उपस्थित होते. या योजनेचा उद्देश कुटुंबियांना आर्थिक सुरक्षेची हमी देणे हा आहे.आपल्या कुटुंबातील सदस्यांची आर्थिक सुरक्षितेसाठी ही विमा योजना आवश्यक आहे,तरी जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी…

Read More

सुरेश वैद्य,सफाळे, दातीवरे गाव ; पर्यटनाला चांगला वाव,रोजगाराच्या संधी निर्माण होतील, पालघर तालुक्यात सफाळे गावाच्या पश्चिमेस समुद्रकिनारी वसलेले दातीवरे गाव,हा मच्छीमार गाव म्हणून ओळखला जातो.या गावाची लोकसंख्या जेमतेम अडीच हजाराच्या आसपास आहे.येथील स्थानिक रहिवासी हे मासेमारी व शेती,या पारंपारिक व्यवसायावर आपला उदरनिर्वाह चालवत असतात.पश्चिम रेल्वेने सफाळे रेल्वे स्थानक येथे उतरून एसटी किंवा रिक्षाने या गावात जाता येते.विशेष म्हणजे या गावाला अर्नाळा येथून बोटीनेही जाता येते.येथील समुद्रात माश्याच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात,येथील रहिवाश्यांचा प्रमुख हा व्यवसाय मासेमारी आहे.पण त्यातून होणारी आवक ही माफक प्रमाणात असल्यामुळे या परिसरात सरकारने पर्यटनवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत,अशी स्थानिकांची मागणी आहे.पण याविषयी सरकारकडून आजवर ठोस पावले उचलली…

Read More

संजय लांडगे,वाडा छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वोत्कृष्ट नेतृत्व-नवनाथ शिंदे, शिक्षक संचालित शिक्षण संस्था वाडा,स्वामी विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वाडा व लॉयन्स कॅम्पस क्लब ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज,वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वाडा शहरातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आज प्रसिद्ध व्याख्याते नवनाथ शिंदे यांचे शिवचरित्रातून काय शिकावे ?या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानामध्ये मार्गदर्शन करताना शिंदे आपल्या भाषणात म्हणाले,आजच्या पिढीने शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व ओळखले पाहिजे.ते कोणत्याही एका जातीचे,विशिष्ट प्रदेशाचे किंवा देशाचे नसून ते जगाचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व होते.त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगातून प्रत्येकाने शिकवण घेतली पाहिजे.तसेच आपल्या…

Read More

वसंत भोईर,वाडा वाड्याचा स्वप्नील पाटील राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम, पलपब प्रकाशन संस्था अहमदाबाद,यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्यस्तरीय काव्यलेखन वाचन स्पर्धा पालघर येथे आयोजित करण्यात आली होती.यावेळी स्वरचित काव्य सादरीकरणासाठी राज्यभरातून पन्नास कवी निवडण्यात आले होते.कवींना आवाहन करून त्यांच्या कविता मागवल्या होत्या. त्यामधून निवडलेल्या पन्नास कवींना स्पर्धेत कविता सादरीकरणाची संधी देण्यात आली.या काव्य स्पर्धेत वाडा तालुक्यातील चिखले येथील स्वप्नील पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. जेष्ठ लेखक विनायकराव जाधव यांच्या हस्ते पाटील यांना सन्मानित करण्यात आले. स्वप्नील पाटील,हे शिक्षक असून प्रबोधनकरी व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या लेखन,अभिनय तथा व्याख्यानाच्या माध्यमातून ते मागील पंधरा वर्षांपासून समाज प्रबोधनाचे काम करत आहेत.स्पर्धेसाठी त्यांनी सादर केलेली ” सावित्री,”…

Read More

दीपक मोहिते, माझा गांव कुठे हरवला ? भाग क्र. १, आपला देश हा सुमारे सहा खेड्यामध्ये पसरलेला आहे.देशाचा पूर्व इतिहास लक्षात घेता खेडं हाच आपल्या देशाचा आत्मा आहे.पण गेल्या सात दशकात खेड्यातील आर्थिक व सामाजिक व्यवस्थेला तडा गेल्याचे दिसून आले आहे.गेल्या काही वर्षात खेड्यातून शहराकडे होणाऱ्या स्थलांतरणाचे प्रमाण प्रचंड वाढत गेले व खेडी ओस पडत गेली.या सात दशकाच्या काळात शासनकर्त्यांनी खेड्यातील हरवलेले चैतन्य परत निर्माण करण्याचा प्रयत्नच केला नाही.त्यांचे धोरण हे केवळ शहरी भागापूरतेच मर्यादित राहीले,त्यामुळे खेडी ही विकासापासून कायम वंचित राहीली. स्वातंत्र्यानंतर आखण्यात आलेले धोरण व प्रत्यक्षात निर्माण केलेली व्यवस्था,यामध्ये प्रचंड तफावत राहिल्यामुळे खेडी बाळसं धरू शकली नाहीत. पुरातन…

Read More

संजय लांडगे,वाडा वाडा शिवसेनेत ( शिंदे गट ) पक्ष प्रवेशाला चांगलाच वेग, राज्यात शिवसेनेत वेगाने इनकमिंग सुरु असताना पालघर जिल्ह्यातही दिवसागणिक प्रवेश होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात नालासोपारा येथे पाचशे ते सहाशे तरुण – तरुणीनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आज वाडा नगरपंचायत हद्दीतील अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी नगराध्यक्ष संदीप गणोरे व शहर प्रमुख राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला. शिवशेना नेते प्रकाश पाटील यांच्या निवासस्थानी आज पार पडलेल्या एका कार्यक्रम प्रसंगी हा पक्षप्रवेश झाला. याप्रसंगी प्रभू धानवा,निशांत धानवा,जितेंद्र पवार,निलेश धानवा,प्रकाश घाडेगावकर, प्रीती घाडेगावकर,प्रिया…

Read More