सचिन परब,
लाच स्विकारताना तीघेजण लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात,
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भरारी पथकातील दोन पोलीस व एका खाजगी व्यक्ती असे एकूण तिघांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजार रू.ची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.
दत्ता माधवराव शिंदे,श्रीराम सूर्यभान डाखुरे,हे दोघे पोलीस शिपाई व तृणाल मोहन धनु अशी या तिघांची नावे आहेत.तक्रारदार हा खडी विक्रीचा व्यवसाय करत असून त्याच्या वाहनावर ( हायवा डंपर ) जप्तीची कारवाई न करण्यासाठी या तिघांनी त्यांच्याकडे २ लाख रू.ची मागणी केली होती.याबाबत संबंधित तक्रारदाराने लांचालूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पथकाने सापळा रचून या तिघांना रंगेहाथ पकडले. वरील दोन्ही पोलीस शिपाई हे अनुक्रमे बोईसर व मनोर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आहेत.

