दीपक मोहिते,
आज छत्रपती शिवाजी महारांजाची ३९५ जयंती उत्साहात साजरी होणार…
हिंदवी स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी १९ फेब्रु.रोजी साजरी होत असते.यंदाही महाराष्ट्रात शिवजयंती धुमधडाक्यात साजरी होणार आहे.या सोहोळ्याला उत्सवाचे स्वरूप असते.राज्य शासन या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करते.राज्यातील शिवप्रेमी आजच्या दिवशी मिरवणुका,लेझीम व अन्य उपक्रम दिवसभर राबवत असतात.त्यामध्ये आबालवृद्ध,तरुण-तरुणी व बाळगोपाळ मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.

छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.त्यांचा जन्म १९ फेब्रु.१६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे विजापूरच्या सुलतानाच्या सैन्यात प्रमुख सरदार होते. त्यांची आई जिजाबाई या सिंदखेड येथील लखुजी जाधवराव यांच्या कन्या होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांना बालवयात हिंदवी स्वराज्याचे बाळकडू पाजले.शिवाजी महाराजानी त्यानंतर विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून मराठा सम्राज्याची निर्मिती केली.इ.स.१६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.त्यानंतर शिवाजी महाराजांनी प.महाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डोंगररांगेपासून थेट नागपूर, उत्तर महाराष्ट्र,दक्षिण भारतात तंजावरपर्यंत मराठा साम्राज्य स्थापन केले.त्यानंतरच्या काळात महाराजांनी मुघल साम्राज्य,गोवळकोड्यांची कुतुबशाही,विजापूरची आदिलशाही व युरोपियन वसाहतीशी दोन हात करण्यास सुरुवात केली.शिस्तबद्ध लष्कर व प्रभावी प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर मराठ्यांचे सामर्थ्यशाली साम्राज्य उभे केले.समुद्रकिनारी व अंतर्गत प्रदेशातील किल्ल्याची डागडुजी करण्यासोबत त्यांनी नवे गडकिल्ले देखील उभारले. मुघलांना सळो की पळो करत अनेक भुभाग आपल्या ताब्यात घेतले.त्यांनी प्राचीन हिंदू परंपरा व न्यायव्यवस्था पुनरूज्जीवीत केल्या.
अशा या महान योध्याची ३९५ वी जयंती आज साजरी करण्यात येत आहे.त्यासाठी शिवप्रेमी नागरिक विविध संस्थांच्या माग्यमातून उपक्रम राबवत आहेत.हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या अशा या महान योध्याला साक्षात दंडवत..

