अनंत भोईर,पालघर,
जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे वितरण,
बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा मनोर मार्फत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांस जिल्हा अग्रणी बँक व आर्थिक साक्षरता सल्ला केंद्र,पालघर यांच्यावतीने विमा रकमेचे वितरण जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर येथे करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विशाल वाघ,मनोर शाखेचे व्यवस्थापक नवदीप यादव, वैभव विधाते,वित्तीय साक्षरता अधिकारी उज्ज्वला कोकणे आदि उपस्थित होते.
या योजनेचा उद्देश कुटुंबियांना आर्थिक सुरक्षेची हमी देणे हा आहे.आपल्या कुटुंबातील सदस्यांची आर्थिक सुरक्षितेसाठी ही विमा योजना आवश्यक आहे,तरी जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले.
जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विशाल वाघ यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत गरीब गरजू कुटुंबास आर्थिक मदतीचा लाभ मिळाला असून,भविष्यातही गरीब गरजू नागरिकांसाठी या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय बँकांकडून करण्यात येत आहे.
लाभार्थ्यांनीही सरकारच्या या योजनेंबद्दल समाधान व्यक्त केले.या योजनेचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत.१८ ते ५० वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी ही योजना खुली आहे,वार्षिक फक्त रु.४३६ च्या प्रीमियममध्ये रु.२ लाखांचा विमा संरक्षण मिळतो,मृत्यूनंतर कुटुंबियांना थेट आर्थिक मदत दिली जाते. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या बँकेत/शाखेस अवश्य भेट द्या,असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे.

