संजय लांडगे,वाडा
छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वोत्कृष्ट नेतृत्व-नवनाथ शिंदे,
शिक्षक संचालित शिक्षण संस्था वाडा,स्वामी विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वाडा व लॉयन्स कॅम्पस क्लब ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज,वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वाडा शहरातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आज प्रसिद्ध व्याख्याते नवनाथ शिंदे यांचे शिवचरित्रातून काय शिकावे ?या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या व्याख्यानामध्ये मार्गदर्शन करताना शिंदे आपल्या भाषणात म्हणाले,आजच्या पिढीने शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व ओळखले पाहिजे.ते कोणत्याही एका जातीचे,विशिष्ट प्रदेशाचे किंवा देशाचे नसून ते जगाचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व होते.त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगातून प्रत्येकाने शिकवण घेतली पाहिजे.तसेच आपल्या परिवारापुरते मर्यादित न राहता समाजासाठी समर्पक असे जीवन जगणे किती महत्त्वाचे आहे.हे त्यांनी आपल्या महान कार्यातून जगाला दाखवून दिले.यावेळी त्यांचा चिरंजीव बालवक्ता शौर्य नवनाथ शिंदे याने छत्रपती शिवाजी महाराजां विषयी विचार प्रगट केले. कार्यक्रमासाठी शिक्षक संचलित शिक्षण संस्थेचे सरचिटणीस विशाल कुळकर्णी कोषाध्यक्ष जगदीश चिते संस्थेचे सचिव व लायन्स क्लबचे अध्यक्ष योगेश विद्वांस शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाडवी,उपमुख्याध्यापिका अर्चना सूर्यवंशी उपप्राचार्य हेमंत फुलपागरे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन लायन्स क्लबचे उपाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी मानले.यावेळी विद्यार्थी,विद्यार्थिनी,शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

