संजय लांडगे,वाडा
ट्रक व दुचाकीच्या अपघातामध्ये एक ठार,तर एक जखमी,
वाडा तालुक्यातील वसुरी येथील अरुंद पुलावरुण वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकचा समोरासमोर अपघात होऊन दुचाकी वरील एक जण ठार झाला आहे,तर दुसरा जखमी झाला आहे.जखमीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वाडा तालुक्यातील वसुरी येथील अरुंद पुलावरुन मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास दोन ट्रक समोरा समोरून जात असताना त्यांच्यात अपघात झाल.यापैकी एका ट्रकच्या मागून येणाऱ्या दुचाकीला धडक लागल्यामुळे दुचाकीवरील दिलीप धाऊ भुयाळ ( वय ४२ ) रा. गोऱ्हाड यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अनंता चाहू पवार ( वय ५४ ) रा.दापिवली हा जखमी झाला असून त्याला खानिवली येथील प्रथमिक आरोग्य केंद्रात उपचार चालू आहेत दरम्यान दोन्ही ट्रक चालक फरार झाले आहेत.या घटनेचा अधिक तपास वाडा पोलीस करत आहेत.

