Author: दीपक मोहिते

रविंद्र राऊळ, मुंबई केंद्रीयमंत्री पीयूष गोयल रमले शोभायात्रेत… गुढीपाडव्यानिमित्त उत्तर मुंबईत निघालेल्या शोभा यात्रेमध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री तसेच उत्तर मुंबईचे खा.पीयूष गोयल हे चांगलेच रमलेले पाहायला मिळाले. सर्वप्रथम कांदिवली येथील त्यांच्या लोककल्याण कार्यालयात गुढी उभारून त्यांनी पूजा केली. त्यानंतर चारकोप येथील सेक्टर नऊ, बोरीवली,दहिसर,मालाड येथे काढण्यात आलेल्या शोभा यात्रांमध्ये ते सहभागी झाले. या शोभा यात्रांमध्ये ते लेझिम खेळले,ढोल वाजवला,झेंडा फडकवला,पालखी खांद्यावर घेतली आणि रथही ओढला. त्यांच्या या सहभागामुळे नागरिक आणि कार्यकर्ते चांगलेच सुखावले होते.या शोभयात्रेमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read More

शुभम सावंत,विरार, जनता दरबारला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पण पालकमंत्र्यांनी अवघ्या दीड तासात गुंडाळला… दोन दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील ग्रामस्थ आपल्या समस्या,अडचणी व प्रश्न घेऊन आले होते. त्यासाठी त्याना चांगलीच पदरमोड करावी लागली.पण या जनता दरबारामध्ये किती कामकाज झाले,याचा लेखाजोगा तपासला तर हा जनता दरबार केवळ देखावा होता. आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जॉन परेरा यांना या जनता दरबाराचा अत्यंत वाईट अनुभव आल्याचे news 27 च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.ते म्हणाले, महावितरण कंपनीला स्वीचींग स्टेशनसाठी विरार पश्चिम भागात जमीन हवी होती, त्यासाठी त्यांनी तहसीलदार यांच्याकडे रीतसर मागणी केली होती.वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून आम्हीही महावितरण कंपनीकडे…

Read More

दीपक मोहिते, पालघर येथे जनता दरबारचे यशस्वी आयोजन, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जनतेला भेडसावत असलेल्या विविध समस्या आणि प्रश्न जाणून घेण्यासाठी तसेच त्याचे निराकरण करण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित “ जनता दरबार,” कार्यक्रमाच्या निमित्ताने जनतेशी थेट संवाद साधण्यात आला. जनता दरबारसारख्या उपक्रमांमुळे लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्ये सुसंवाद निर्माण होत असतो.विविध विकासकामांच्या बांधणीचा आराखडा अशा दरबारात होणाऱ्या चर्चेतून ठरवणे शक्य होत असते. जनतेच्या विकासाच्या दृष्टीने आयोजित करण्यात येणाऱ्या अशा लोकहिताच्या उपक्रमांमुळे नक्कीच जनतेच्या समस्या कमी होऊन विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरु होत असते. या उपक्रमात राज्याचे…

Read More

सुरेश वैद्य,पालघर गोविंद बोडके यांना सेवानिवृत्तीचा निरोप देणे, क्लेशदायक-पालकमंत्री नाईक, शासकीय सेवा करताना सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना एक दिवस सेवानिवृत्त व्हावेच लागते.पण जनतेची मनाभावातून सेवा करणारे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना सेवानिवृत्तीसाठी निरोप देणे, क्लेशदायक असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. जिल्हाधिकारी गोविंद बोडके हे नियत वयोमानानुसार ३१ मार्च २०२५ रोजी प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.त्यांचा निरोप समारंभ काल आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी पालकमंत्री नाईक बोलत होते. यावेळी आ.राजेंद्र गावित,आ.विनोद निकोले, कोकण विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी जिल्हाधिकारी गोविंद बोडके जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे सहायक जिल्हाधिकारी…

Read More

वसंत भोईर,वाडा वाडा वन परीक्षेत्रात खैर तस्करांवर पुन्हा संक्रान्त, तालुक्यातील कंचाड वनपरिक्षेत्रात खैर तस्कर चोरीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती वाडा दक्षता पथकाला मिळताच त्यांनी सापळा रचला होता. पण त्याची खबर लागताच अंधाराचा फायदा घेऊन खैर तस्कर पसार झाले.मात्र खैराच्या २४ ओडक्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात वनविभागाला यश आले. सदर घटना रात्रीच्या सुमारास घडली.वाडा दक्षता पथकाचे वनक्षेत्रपाल यांना मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कंचाड वन परिसरात खैर तस्कर,चोरीच्या उद्देशाने येणार असल्याचे माहिती मिळाली होती. त्यांनी रात्री ९.३० वाजल्यापासून पाळत ठेवली होती.रात्री १.०० ते २.०० च्या सुमारास अंदाजे १५ ते २० इसम खैर झाडे तोडण्याच्या इराद्याने राखीव वन क्षेत्रात घुसले.त्यांनी जंगलात काही उभ्या…

Read More

वसंत भोईर,वाडा नववर्ष स्वागत यात्रेने वाडा दुमदुमले गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीतर्फे वाडा शहरात टाळमृदुंग,ढोल ताशे व लेझीमच्या तालावर हिंदू नववर्षानिमित्त स्वागतयात्रा मोठ्या जल्लोषात काढण्यात आली.या स्वागतयात्रेमध्ये श्रीराम,लक्ष्मण,सीता,हनुमान यांचे देखावे व विविध समाजाच्या संस्कृतीचे दर्शन दाखवणारे देखावे होते. यात्रेच्या मार्गावर दुतर्फा रांगोळ्या काढून वाडावासीयांनी ऐक्याच्या गुढ्या उभारल्या होत्या. सकाळी सात वाजता वाडा येथील श्रीराम मंदिर येथून स्वागत यात्रेला सुरुवात झाली.या यात्रेत स्त्री-पुरुष , लहान मुले पारंपारिक वेशभुषा करून सहभागी झाले होते. टाळ मृदुंगाच्या तालावर यात्रेतील नागरिक भजने, भक्ती गीत गात होते.फुगड्या, नाच सुरू होते.ही यात्रा वाणी आळी,भानुशाळी आळी,मुख्य बाजारपेठ,परळी नाका,बस स्थानक पंचायत समिती कार्यालय,आगर आळी, गावदेवी मंदिरापासून पुन्हा श्रीराम मंदिरात तिचा…

Read More

राजू वाघ,मुंबई गारगाई प्रकल्प व भांडुप जलशुद्धीकरण केंद्र मुंबईसाठी महत्त्वाचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाल विधान भवन,मुंबई येथे ” गारगाई धरण प्रकल्प,” यासंदर्भात आढावा बैठक आणि मौजे भांडूप,मुंबई येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या बांधकामासाठी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र संनियंत्रण समितीच्या मान्यतेसाठी बैठक पार पडली.या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,गारगाई प्रकल्प मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक आहे. या प्रकल्पातून ४०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे पुढील ५० वर्षे शहर व उपनगरासाठी पाणी उपलब्धता निश्चित होणार आहे. उगदा गावाजवळ ( वाडा ) हा प्रकल्प उभारण्यात येत असून या परिसरातील सहा गावांचे पुनर्वसन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका व…

Read More

दीपक मोहिते, बॉटमलाईन महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक : गैरवापर होण्याची शक्यता अधिक,कामगार संघटना आक्रमक, प्रस्तावित महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा कायदा अमलात आणण्यापूर्वी सरकारने या विधेयकासंदर्भात सावधानता बाळगायला हवी.कारण या कायद्याविरोधात राज्यातील अनेक भागात पडसाद उमटू लागले आहेत. या कायद्याविषयी लोकांच्या मनात भिती आहे.हा कायदा लोकशाही मुल्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे.तो भारतीय राज्य घटनेच्या विरोधात आहे,असा जो समज निर्माण झाला आहे. तो लक्षात घेऊन सरकारने सावध पावले टाकली पाहिजेत. या कायदयाच्या तरतूदीमध्ये ” बेकायदेशीर कॄत्य,” म्हणून जे म्हंटले आहे.त्याबाबत लोकांचा आक्षेप आहे.या दोन शब्दाची नेमकी कशी व्याख्या केली आहे,त्याविषयी लोकांच्या मनात संशययाचे वातावरण आहे.आमचे मूलभूत अधिकार/हक्क,अभिव्यक्ती स्वातंत्र धोक्यात…

Read More

सुरेश काटे,तलासरी, वेवजी-काटीलपाडा येथे गौणखनिजाची लूट, तलासरी तालुक्यातील मौजे वेवजी काटीलपाडा येथील गट क्रमांक २२५/९ मधून नाममात्र २०० ब्रासची रॉयल्टी असताना हजारो ब्रास माती उत्खनन करण्यात येत आहे, याबाबत खातेदार तारा अशोक वाडु यांनी तलासरी तहसील कार्यालयात तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे स्थानिक ग्रामस्थानी संताप व्यक्त केला आहे. गट क्रमांक २२५/९ हा सामायिक गट असून या गटातून धर्मा जवळ्या कडू यांचे नावे किरकोळ ब्रासची रॉयल्टी काढून त्या आधारे हजारो ब्रास माती पोकलन द्वारे काढण्यात येत आहे. तलासरी भागात अनेक प्रकल्प होत आहेत,त्यासाठी मोठ्या प्रमाणात गौण खनिज लागते,यासाठी या प्रकल्पतिल ठेकेदार आदिवासी शेतकऱ्याची दिशाभूल करून त्यांच्या जमिनीतून हजारो…

Read More

शुभम सावंत,विरार स्वच्छ भारत अभियान २.० मध्ये उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालय प्रथम क्रमांकावर, वसई विरार शहर महानगरपालिका आयोजित स्वच्छ भारत अभियान २.० आणि स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ अंतर्गत वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता जनजागृतीच्या संदर्भात स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या कै.पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. विविध आंतरमहाविद्यालयीन आणि शासकीय स्पर्धांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये या महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मुग्धा लेले,श्रीमती कल्पना राऊत,उपप्राचार्य प्रा. सुभाष शिंदे,प्रा.रमेश पाटील आणि प्रा.हेमा पाटील तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील समन्वय समितीचे सदस्य यांनी अनमोल असे मार्गदर्शन केलेले…

Read More