सुरेश काटे,तलासरी,
वेवजी-काटीलपाडा येथे गौणखनिजाची लूट,
तलासरी तालुक्यातील मौजे वेवजी काटीलपाडा येथील गट क्रमांक २२५/९ मधून नाममात्र २०० ब्रासची रॉयल्टी असताना हजारो ब्रास माती उत्खनन करण्यात येत आहे, याबाबत खातेदार तारा अशोक वाडु यांनी तलासरी तहसील कार्यालयात तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे स्थानिक ग्रामस्थानी संताप व्यक्त केला आहे.
गट क्रमांक २२५/९ हा सामायिक गट असून या गटातून धर्मा जवळ्या कडू यांचे नावे किरकोळ ब्रासची रॉयल्टी काढून त्या आधारे हजारो ब्रास माती पोकलन द्वारे काढण्यात येत आहे.
तलासरी भागात अनेक प्रकल्प होत आहेत,त्यासाठी मोठ्या प्रमाणात गौण खनिज लागते,यासाठी या प्रकल्पतिल ठेकेदार आदिवासी शेतकऱ्याची दिशाभूल करून त्यांच्या जमिनीतून हजारो ब्रास गौणखनिजचे उत्खनन करीत आहेत.
वास्तविक वेवजी काटीलपाडा बारडी हे पेसा गाव असून,या सामायिक जमिनीत इतरांची सहमती न घेता,तसेच ग्रामसभेत चर्चा ठराव न घेता अनधिकृत गौण खनिजाचे हजारो ब्रास माती काढण्यात येत असून दिवसरात्र या गौण खनिजाची वाहतूक होत आहे.
यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी तारा अशोक कडू यांनी केली आहे.
याबाबत मंडळ अधिकारी झरी राजेश निमगूळकर यांच्याकडे विचारणा केली असता घटना स्थळी पाहणी करून कारवाई करतो,असे त्यांनी सांगितले.
आदिवासी भागात अनेक प्रकल्पचे काम सुरु असून त्यासाठी माती व दगड मोठ्या प्रमाणात लागत आहे.त्यामुळे ठेकेदार आदिवासी बांधवांची दिशाभूल करून त्यांच्या जमिनीत अनधिकृत गौण खनिजचे उत्तखनन करीत आहेत,यात शासनाचा महसूलही बुडवला जात असल्याने यांच्यावर कारवाई करण्यात यावी – बबला धोडी, भाजप जेष्ठ नेते तलासरी

