दीपक मोहिते,
पालघर येथे जनता दरबारचे यशस्वी आयोजन, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,
जनतेला भेडसावत असलेल्या विविध समस्या आणि प्रश्न जाणून घेण्यासाठी तसेच त्याचे निराकरण करण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित “ जनता दरबार,” कार्यक्रमाच्या निमित्ताने जनतेशी थेट संवाद साधण्यात आला.
जनता दरबारसारख्या उपक्रमांमुळे लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्ये सुसंवाद निर्माण होत असतो.विविध विकासकामांच्या बांधणीचा आराखडा अशा दरबारात होणाऱ्या चर्चेतून ठरवणे शक्य होत असते.
जनतेच्या विकासाच्या दृष्टीने आयोजित करण्यात येणाऱ्या अशा लोकहिताच्या उपक्रमांमुळे नक्कीच जनतेच्या समस्या कमी होऊन विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरु होत असते.
या उपक्रमात राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक,जिल्हाधिकारी गोविंद बोडके,पालघर विधानसभा आ.राजेंद्र गावित,डहाणू विधानसभा आ.विनोद निकोले अनेक पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या जनता दरबारामध्ये जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आपल्या समस्या व अडचणी लेखी स्वरूपात दाखल केल्या होत्या.त्यापैकी ७० % तक्रारीचे निवारण करण्यात आले.उर्वरित तक्रारीची विविध विभागातर्फे चौकशी करून त्याही सोडवण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले.

