रविंद्र राऊळ, मुंबई
केंद्रीयमंत्री पीयूष गोयल रमले शोभायात्रेत…
गुढीपाडव्यानिमित्त उत्तर मुंबईत निघालेल्या शोभा यात्रेमध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री तसेच उत्तर मुंबईचे खा.पीयूष गोयल हे चांगलेच रमलेले पाहायला मिळाले.
सर्वप्रथम कांदिवली येथील त्यांच्या लोककल्याण कार्यालयात गुढी उभारून त्यांनी पूजा केली. त्यानंतर चारकोप येथील सेक्टर नऊ, बोरीवली,दहिसर,मालाड येथे काढण्यात आलेल्या शोभा यात्रांमध्ये ते सहभागी झाले. या शोभा यात्रांमध्ये ते लेझिम खेळले,ढोल वाजवला,झेंडा फडकवला,पालखी खांद्यावर घेतली आणि रथही ओढला. त्यांच्या या सहभागामुळे नागरिक आणि कार्यकर्ते चांगलेच सुखावले होते.या शोभयात्रेमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

