सुरेश वैद्य,पालघर
गोविंद बोडके यांना सेवानिवृत्तीचा निरोप देणे, क्लेशदायक-पालकमंत्री नाईक,
शासकीय सेवा करताना सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना एक दिवस सेवानिवृत्त व्हावेच लागते.पण जनतेची मनाभावातून सेवा करणारे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना सेवानिवृत्तीसाठी निरोप देणे, क्लेशदायक असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.
जिल्हाधिकारी गोविंद बोडके हे नियत वयोमानानुसार ३१ मार्च २०२५ रोजी प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.त्यांचा निरोप समारंभ काल आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी पालकमंत्री नाईक बोलत होते.
यावेळी आ.राजेंद्र गावित,आ.विनोद निकोले, कोकण विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी जिल्हाधिकारी गोविंद बोडके जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे सहायक जिल्हाधिकारी करिष्मा नायक,सत्यम गांधीनिवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदेbआणि अधिकारी व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या पत्नी अनुसयाताई बोडके,बेंगळूरु महापालिकेत अतिरिक्त आयुक्त असलेले त्यांचे चिरंजीव दिग्विजय बोडके, त्यांचे दुसरे चिरंजीव मयुरेश बोडके तसेच त्यांचे नातेवाईक आणि स्नेही उपस्थित होते.

