दीपक मोहिते,
बॉटमलाईन
महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक : गैरवापर होण्याची शक्यता अधिक,कामगार संघटना आक्रमक,
प्रस्तावित महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा कायदा अमलात आणण्यापूर्वी सरकारने या विधेयकासंदर्भात सावधानता बाळगायला हवी.कारण या कायद्याविरोधात राज्यातील अनेक भागात पडसाद उमटू लागले आहेत.
या कायद्याविषयी लोकांच्या मनात भिती आहे.हा कायदा लोकशाही मुल्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे.तो भारतीय राज्य घटनेच्या विरोधात आहे,असा जो समज निर्माण झाला आहे. तो लक्षात घेऊन सरकारने सावध पावले टाकली पाहिजेत.
या कायदयाच्या तरतूदीमध्ये ” बेकायदेशीर कॄत्य,” म्हणून जे म्हंटले आहे.त्याबाबत लोकांचा आक्षेप आहे.या दोन शब्दाची नेमकी कशी व्याख्या केली आहे,त्याविषयी लोकांच्या मनात संशययाचे वातावरण आहे.आमचे मूलभूत अधिकार/हक्क,अभिव्यक्ती स्वातंत्र धोक्यात येणार आहे, अशी भिती सर्वत्र व्यक्त होत आहे.या विधेयकामुळे आमच्या विचारस्वातंत्र्याला नख लागता कामा नये.भारतीय संविधानाने चुकीच्या निर्णयाला विरोध करण्याचा जो हक्क दिला आहे.तो अबाधित राहिला पाहिजे,असे लोकांचे म्हणणे आहे.
सार्वजनिक सुव्यवस्थेला हानी पोहोचता कामा नये,यासाठी हा कायदा आणत आहोत,असा सरकारचा दावा आहे.पण त्याचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक आहे.भ्रष्टाचार आणि हुकुमशाही कारभाराला ऊत येईल.त्यामुळे प्रस्तावित महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम विधेयक समंत करण्यापूर्वी सरकारने विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती,सामाजिक,कामगार संघटनाना विश्वासात घेण्याची गरज आहे.विशेष म्हणजे या विधेयका संदर्भात कामगार संघटना आता रस्त्यावर उतरून आंदोलने करू लागली आहेत.गेल्या आठवड्यात नाशिक व पुणे जिल्ह्यात या कायद्याचे जोरदार पडसाद उमटले होते.

