- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाग क्र.१ …तर अजित पवार यांच्या राजकारणाला उतरती कळा लागेल.. राज्याच्या चार ते पाच मतदारसंघाच्या निवडणुकांकडे तमाम जनतेचे लक्ष लागले आहे.त्यामध्ये बारामती,माहीम, इंदापूर,महाड व कवठे-महांकाळ या पाच विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. बारामती येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी जबरदस्त आव्हान उभे केले आहे.सुशिक्षित व संस्कारी अशी ओळख असलेल्या युगेंद्र पवार यांच्या पाठीशी संपूर्ण पवार घराणे असून येथे अजित पवार यांना युगेंद्र पवार यांच्याशी एकाकी झुंज द्यावी लागणार आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना काकाश्री शरद पवार व बहीण सुप्रिया सुळे यांनी धोबीपछाड दिल्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते.आता या विधानसभा निवडणुकीत…
दीपक मोहिते, जीवनाचा एक अविरत संघर्ष… प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी ‘ बॅड पॅच,’ येतो. शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात आपल्या करीयरमध्ये काहीतरी बिघडतं, नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं, व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो, पैशांची बिकट वाट लागते.नड येते, आणि बहुदा हे सारं एकदमच,एकाच वेळी घडतं..!! हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो… आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो… आयुष्य नकोसं करुन सोडतो… आपण कितीही नको म्हंटलं,टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतोच येतो. संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो,अन आपल्याला तो भोगावा, व अनुभवावाच लागतो.कितीही नकोसा वाटला,कितीही त्रास झाला तरी या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वसई व नालासोपारा जागांवर महाविकास आघाडी बविआला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत, वसई विधानसभा लढवण्यासंदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.पालघर जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची ताकद नगण्य असल्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्या वाट्याला आलेल्या १३१ वसई विधानसभेची जागा ते लढवतील,अशी शक्यता वाटत नाही.पालघर जिल्ह्यात सहापैकी वसईची जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वाट्याला आली आहे.नालासोपारा,पालघर व बोईसर- शिवसेना ( उबाठा ) डहाणू- मार्क्स.कम्यु.व विक्रमगड-राष्ट्रवादी काँगेस ( शरद पवार ) असे जागावाटप करण्यात आले आहे.भाजपने १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात बविआच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे,वसई विधानसभा मतदारसंघात पण महायुतीकडून उमेदवार देण्यात येणार आहे.त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात बविआविरोधात महाविकास आघाडीने…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुती व महाविकास आघाडी या दोघांना बंडखोरीची लागण, महाविकास आघाडी व महायुती,या दोघांचे जागावाटप जवळपास पूर्ण होत आले आहे.१५ ते २० जागांवरून सध्या ज्या हाणामाऱ्या सुरू आहेत,त्या पण एकदोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे.शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यामुळे ८५:८५:८५ असा फार्म्युला महाविकास आघाडीने सर्वसंमत केला.१५ जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार असून उर्वरित १८ जागाचा तिढा कसा सोडवायचा,यासाठी शरद पवार जोरदार प्रयत्न करत आहेत.या अठरा जागांपैकी १२ ते १३ जागा विदर्भातील आहेत.वास्तविक विदर्भात सेनेला फार मोठा जनाधार आहे,अशी परिस्थिती नाही.पण संजय राऊत व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आपापसातील भांडणामुळे हा तिढा अधिक जटील झाला आहे.पण यातून मार्ग…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, आ.राजेश पाटील ; ” आपल्या हक्काचा माणूस,” विकासकामांवर ८३० कोटी रु.खर्च करणारा लोकप्रतिनिधी, बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी आपल्या मतदारसंघात सुमारे ८३० कोटी रु.चा निधी खर्च केला असून हा एक विक्रमच म्हणावा लागेल.या निधीतून त्यांनी केलेली विकासकामे,ही विरोधी उमेदवारांची झोप उडवणारी ठरली आहेत. या निधीतून त्यांनी बोईसर मतदारसंघाच्या ग्रामीण व शहरी भागात रस्ते,स्मशानभूमी,समाज मंदिरे,पाणीपुरवठा,साकव,पूल,वसतीगृहे इमारती,तरंगती जेट्टी,जेट्टीची दुरुस्ती,चक्रीवादळ निवाराकेंद्र व अन्य पायाभूत सुविधा विकास कामावर खर्च केला.त्यांनी केलेल्या विकासकामामुळे बोईसरच्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहराच बदलला गेला.मेरिटाईम बोर्ड,जलजीवन मिशन,पर्यटन,भौतिक पायाभूत सुविधा,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,अल्पसंख्यांक विकास कार्यक्रम,सार्व.बांधकाम विभाग,डोंगरी विकास,आदिवासी विकास विभाग व अन्य विभागाकडे आ.राजेश पाटील यांनी आर्थिक निधी मिळावा…
दीपक मोहिते, शिवसेनेचे ( उबाठा ) जयेंद्र दुबळा व डॉ.विश्वास वळवी यांना अनुक्रमे पालघर व बोईसर येथून उमेदवारी.. काल शिवसेनेच्या ( उबाठा ) उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली,यादीत एकूण ६५ उमेदवारांची नांवे जाहीर करण्यात आली आहेत.पालघरहुन जयेंद्र दुबळा व बोईसर येथे डॉ.विश्वास वळवी या दोघांना संधी देण्यात आली आहे.वास्तविक या दोन्ही जागा ठाकरे यांच्या शिवसेनेला देण्यात येतील,असा अंदाज होता. पण जयेंद्र दुबळा यांना पालघर या महत्वाच्या जागेवर संधी मिळेल,असे शिवसैनिकांच्या ध्यानीमनीही नव्हते.येथून डॉ.विश्वास वळवी यांना उभे करण्यात येईल,असा सर्वसाधारण अंदाज होता,पण त्यांना शेजारी असलेल्या बोईसर विधानसभा मतदारसंघात ट्रान्सफर करण्यात आले.डॉ.विश्वास वळवी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, पालघर विधानसभा ; तिरंगी लढत होण्याची शक्यता, १३० पालघर विधानसभा ( अनु.ज.) या मतदारसंघात अद्याप एकाही पक्षाने आपल्या उमेदवाराची नांवे जाहीर केलेली नाहीत.पालघर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून या मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्यासाठी महायुती व महाविकास आघाडी हे दोघेही प्रयत्नात आहेत.२००९ चा एकमेव अपवाद वगळता हा गड कायम तीन दशके एकसंघ सेनेच्या ताब्यात राहिला.२००९ मध्ये काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांनी सेनेच्या मनिषा निमकर यांच्यावर निसटता विजय मिळवला होता.हा एकमेव अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सेनेचा वरचष्मा राहिला.२०१४ साली सेनेतून उमेदवारी मिळवणारे कृष्णा घोडा यांनी काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांच्यावर केवळ ५१५ मतांनी विजय मिळवला होता.त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे चिरंजीव अमित…
दीपक मोहिते, राजन नाईक हे आ.क्षितिज ठाकूर यांना रोखू शकतील का ? १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघातुन भाजपच्या राजन नाईक यांना उमेदवारी मिळाली आहे.त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.पक्षात त्यांना अंतर्गत विरोध असूनही ते उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.मात्र त्यांना या निवडणुकीत पक्षातील नाराज मंडळींकडून किती सहकार्य मिळेल,हे सांगता येत नाही.वसई भाजपामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गटा तटाचे राजकारण सुरू आहे. राजन नाईक हे ज्या सामवेदी समाजाचे प्रतिनिधित्व करतात,तो समाजही शिवसेना व बहुजन विकास आघाडीत विभागला आहे.तर किनारपट्टीवर राहणारा मांगेला समाजही असाच विभागला आहे.पालघर जिल्ह्यात मांगेला समाज मोठ्या संख्येने राहतो,पण त्यांना आजवर भाजपकडून योग्य ती…
दीपक मोहिते, मुंबईच्या क्षितिजावरून, उमेदवारी जाहीर करण्यात भाजपने मारली बाजी, मात्र त्यांच्या आयटी सेलचा चावटपणा सुरू, भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून पाहिला नंबर पटकावला आहे.भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी आठ दिवसापूर्वी या यादीवर मोहोर उठवल्यानंतर ( १४ ऑक्टो.) ती दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली. होती.या यादीत ९९ उमेदवारांची नांवे आहेत.विशेष म्हणजे ८० % विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.केवळ पाच आमदारांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आहे.बंडखोरीची लागण मोठ्याप्रमाणात होऊ नये,यासाठी जुन्या चेहऱ्यांना पुढे चाल देण्यात आल्याचे दिसून आले आहे.इतर पक्षात जागावाटपावरून कलगीतुरा रंगत असताना भाजपने आपली यादी प्रसिद्ध करून एकप्रकारे बाजी मारली आहे. कोकण विभाग-२५, उ.महाराष्ट्र-२०, विदर्भ-१९, मराठवाडा-१८…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, जिल्ह्याचा विकास हाच आमचा श्वास,-आ.क्षितिज ठाकूर, पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी बहुजन विकास कटिबद्ध आहे,त्यासाठी कायम आमचे प्रयत्न राहतील,कारण जिल्ह्याचा विकास हा आमचा श्वास आहे.त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला झोकून देऊन काम केले पाहिजे,असे उदगार नालासोपाऱ्याचे आ.क्षितिज ठाकूर यांनी विरार येथे काढले. विरार पश्चिमेस क्लब वन येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते,यावेळी व्यासपीठावर आ.हितेंद्र ठाकूर,आ.राजेश पाटील,ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबनशेठ नाईक,माजी महापौर नारायण मानकर,माजी उपमहापौर उमेश नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते.आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले,पालघर जिल्ह्यात विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करणे,कृषी संशोधन केंद्र सुरू करणे,अद्ययावत क्रीडा संकुल उभारणे, जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवणे,वाहतूक…
