दीपक मोहिते,
कुणबी सेनेचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा,
कुणबी सेनेने आज अचानक बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे इतर पक्षाचे धाबे दणाणले आहे.आज कुणबी सेनेचे नेते विश्वनाथ पाटील यांनी बविआचे नेते व वसईचे आ.हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले.
यावेळी माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, होते गेल्या सात वर्षांपासून घटक पक्ष म्हणून कुणबी सेना भाजपासोबत सोबत होती.मात्र त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली.त्यामुळे नालासोपारा वसई आणि बोईसर या तिन्ही विधानसभा निवडणुकीत कुणबी सेना बहुजन विकास आघाडीला जाहीर पाठिंबा देत आहे. यापुढेही स्थानिकांच्या अस्तित्वासाठी एकत्रितपणे निवडणुका लढवण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी सांगितले.यापुढेही आम्ही बहुजन विकास आघाडी सोबत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी कुणबी सेना,कुणबी समाज बांधव व शेतकरी त्यांच्या हितासाठीच काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

