दीपक मोहिते,
निवडणूक पर्व,
राजेश पाटील यांच्या रॅलीला सर्वत्र उत्स्फूर्त पाठिंबा,
बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आ. राजेश पाटील यांच्या निवडणूक प्रचार दौ-याला आज सकाळी ९.०० वाजता कोळी पडघे येथून सुरुवात झाली.यावेळी काढण्यात आलेली भव्य प्रचार रॅली मान,बेटेगाव, वाळवे,महागाव,कुकडे,गारगाव – खानिवडे,शिगाव,हनुमान नगर,राणी शिगाव,गणेश नगर,काटकर पाडा अशा भेटी देत,बोईसर येथे पोहोचली.या रॅलीला गावागावातील नागरिकांकडून मोठ्याप्रमाणात समर्थन मिळाला.आ.राजेश पाटील यांनी पाच वर्षे जनतेत राहून केलेल्या कामांची पोचपावती स्वागताने आणि जल्लोषाने मिळत आहे.त्यामुळे कार्यकर्ते व नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सदैव कर्तव्यदक्ष तत्पर असलेल्या आ.राजेश पाटील यांना विक्रमी बहुमताने निवडून देणार अशी आश्वासने ठिकठिकाणी देण्यात येत होती. महिलांनी त्यांचे औक्षण करून शुभेच्छाही दिल्या. तर तरुण वर्ग घोषणा देत होते,.
यावेळी त्यांच्या समवेत बहुजन विकास आघाडीचे पालघर तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, उपजिल्हा अध्यक्ष विश्वनाथ घरत, जिल्हा परिषद सदस्या भावना विचारे,पंचायत समिती सदस्य अनिल रावते, अनिल काठे, बहुजन विकास आघाडी आदिवासी सेल जिल्हा अध्यक्ष प्रसाद प्रहाड माजी पंचायत समिती उपसभापती चेतन पाटील, युवती अध्यक्षा धनश्री रेवदंकर ,पि टी पाटील सर,धुकटण उपसरपंच निवास पाटील करिश्मा मॅडम, अनिल सिंग,राहुल शर्मा, देवरे मॅडम,सुरेखा कांबळे,नीलकंठ पाटील,विष्णु पाटील आदी उपस्थित होते.

