मुरबे गावात गावित याना स्थानिक भूमीपुत्रांनी काळे झेंडे दाखवले,
जिंदाल जेटी,वाढवण बंदरास विरोध,
पालघर,
पालघर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांची प्रचार रॅली मुरबे गावात आली असता स्थानिक भूमीपुत्रांनी रद्द करा,रद्द करा,मुरबे बंदर रद्द करा अशा घोषणा दिल्या.
यावेळी काळे झेंडे दाखवून रॅलीला गावात प्रचार करण्यास विरोध केला. त्यामुळे गावीतांना किनारपट्टीत प्रचार करणे,आता अडचणींचे ठरले आहे.
सातपाटी, मुरबे, चिंचणी,वरोर, दांडी आणि वाढवण या भागांत स्थानिक मच्छीमार मतदारांची संख्या बहुसंख्य आहे.गेल्या अनेक निवडणूकीत पश्चिम किनारपट्टीवरील या भागांतील मते ही राजेंद्र गावित यांची वोट बँक समजली जात होती.मात्र सद्यस्थितीत वाढवण बंदर आणि मुरबे गावाच्या हद्दीत जेएसडब्लयू जिंदाल जेट्टीला मंजूरी देण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये सरकार विरोधात रोष आहे.
महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित प्रचारासाठी मुरबे गावात आले होते.यावेळी ग्रामस्थांनी सरकार विरोधी घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.जेएसडब्ल्यू जिंदाल बंदरामुळे मासेमारी धोक्यात येणार असल्यामुळे मच्छिमारांमध्ये प्रचंड रोष आहे.यावेळी बंदरपट्टीतील मतदारांचा गाविताना विरोध होत असल्यामुळे त्यांच्यासमोर निवडणूक प्रचार कसा करायचा असा प्रश्न उभा ठाकला आहे.

