दीपक मोहिते,
भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते बविआत सामील,
आज भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नालासोपाऱ्याचे युवा आ.क्षितिज ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला.हा प्रवेश कार्यक्रम जुन्या विवा महाविद्यालयात पार पडला.
भाजपचे वसई विरार जिल्हा युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस विक्की झा व विरार शहर जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस सुधाकर मिश्रा आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह बहुजन विकास आघाडीमध्ये सामील झाले.या सगळ्यांचे आ.क्षितिज ठाकूर यांनी स्वागत केले.यावेळी विक्की झा यांनी माध्यमांशी बोलताना भाजपमध्ये उत्तर भारतीयांना मानसन्मान मिळत नाही.आमची सतत उपेक्षा झाल्यामुळे आम्ही भाजपला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेतला.या निवडणुकी दरम्यान अनेक उत्तर भारतीय पदाधिकारी व कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीत सहभागी होण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले.

