दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
छगन भुजबळ व अजित पवार,अडचणीत…
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या मुलाखतीमध्ये आपण ईडीच्या त्रासामुळे भाजपसोबत गेल्याचे सांगितल्यामुळे राज्याचे राजकारण अक्षरशः ढवळून निघाले आहे.राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेल्या पुस्तकात याविषयी सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे.त्यावर बोलताना भुजबळ यांनी मी असे बोललेलो नाही,असे माध्यमांना सांगत सुटले आहेत.
छगन भुजबळ आता आपण अशी मुलाखत दिलीच नसल्याचा दावा करत आहेत.पण त्यांच्या या मुलाखतीमुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सध्या संकटात सापडल्याचे पाहायला मिळत आहे.संजय राऊत,सुप्रिया सुळे,नाना पटोले,यांनी अजित पवार गटावर टीकेची झोड उठवली आहे.त्यामुळे त्यांची व त्यांच्या सहकाऱ्यांचा याविषयी खुलासा करताना प्रचंड दमछाक होत आहे.संजय राऊत यांनी तर छगन भुजबळ,अजित पवार,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सारे आपल्याला जेलमध्ये जावे लागेल,म्हणून त्यांनी भाजपचा हात पकडल्याचा थेट आरोप केला आहे.दरम्यान राजदीप सरदेसाई,हे देखील ही मुलाखत छगन भुजबळ यांनी दिली होती,या त्यांच्या मतावर ठाम आहेत.तर दुसरीकडे छगन भुजबळ व अजित पवार या दोघांनी वकिलांचा सल्ला घेऊन आम्ही दावा दाखल करणार असल्याचे माध्यमांना सांगितले.या घडामोडीमुळे विरोधी पक्षाच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे.त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ले चढवण्यास सुरुवात केली आहे.

