दीपक मोहिते,
निवडणूक पर्व,
बविआच्या महिलां
बविआच्या महिला कार्यकर्त्यांचा प्रचारासाठी नवीन फंडा,
नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे युवा आ.क्षितिज ठाकुर यांच्या प्रचारासाठी आज हजारो महिला घराबाहेर पडल्या.यया महिला कार्यकर्त्यांनी शहरातील प्रत्येक घराघरात जाऊन आ.क्षितिज ठाकूर यांनी गेल्या पंधरा वर्षांत केलेल्या विकासाकामाबाबत रहिवाशांना अवगत केले.महिलांनी राबवलेल्या या मोहिमेस नालासोपारावासीयांनी न भूतो न भविष्यती,असा उदंड प्रतिसाद दिल्यामुळे या महिला अक्षरशः गहिवरल्या.आजवर एकाही लोकप्रतिनिधीला असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला नाही.
आज सकाळी वारूळ फुटून मुंग्या जशा बाहेर पडतात,तशा आज हजारो महिला कार्यकर्त्या आ.क्षितिज ठाकूर यांच्या प्रचारासाठी बाहेर पडल्या.त्यानी घरोघरी जाऊन महिला,तरुण व ज्येष्ठांची भेट घेऊन आजवर केलेल्या विकासकामांची जंत्रीच मांडली.तसेच भविष्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या विकासकामासंदर्भात परिपूर्ण माहिती दिली.महिलांच्या या उपक्रमाचे जोरदार स्वागत करण्यात आले.त्यामुळे या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या चांगल्याच भारावून गेल्या होत्या.या महिलांनी राबवलेल्या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून बविआचे तरुण पदाधिकारी व कार्यकर्ते देखील अशाप्रकारचा उपक्रम राबवणार आहेत.वसई व नालासोपारा या दोन मतदारसंघात बविआच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराची जोरदार मोहीम उघडली आहे.त्यांच्या प्रचाराला मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधी पक्षाच्या उमेदवारांची गाळण उडाली आहे.

