दीपक मोहिते,
वसई-विरार मनपातर्फे मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन,
आगामी विधानसभा निवडणूक २०२४ च्या मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वीप अॅक्टीविटी अंतर्गत मा.आयुक्त तथा प्रशासक, वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी ०८.४५ वाजता वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय, नवीन प्रशासकीय इमारत,यशवंत नगर रोड,विरार (पश्चिम) येथे मतदान जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या बाईक रॅलीमध्ये महानगरपालिका अग्निशमन दलाचे कर्मचारी,तसेच महानगरपालिकेतील विविध विभागाचे कर्मचारी सहभाग घेणार असून सदर रॅली वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, यशवंत नगर रोड,विरार (पश्चिम) येथून सुरु होऊन बोळींज नाका,आगाशी नाका, निर्मळ नाका,होळी, पारनाका,कोर्ट नाका, माणिकपूर,अंबाडी रोड, वसंत नगरी,आचोळे व नालासोपारा पूर्व-पश्चिम ब्रिज मार्गावरून वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय,नवीन प्रशासकीय इमारत,यशवंत नगर रोड,विरार (पश्चिम) येथे रॅलीची सांगता होईल.
तरी सर्व पत्रकार व प्रतिनिधी यांनी या मतदान हक्क बजावणे बाबतच्या जनजागृती बाईक रॅलीस उपस्थित राहावे,असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

