- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच… लोकसभा,विधानसभा निवडणुकीनंतर लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे.कोविड व त्यानंतर ओबीसी आरक्षण प्रश्नी न्यायालयात असलेले खटले मार्गी न लागल्यामुळे या निवडणुका गेली चार वर्षे या सर्व निवडणुका रखडल्या.कोविड संपल्यानंतर महायुती सरकारने या प्रश्नी पावले उचलण्याची गरज होती,पण या निवडणुका लवकर झाल्या तर आपला पराभव होईल,अशा भितीमुळे राज्य सरकारने न्यायालयात प्रयत्न केले नाहीत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर राज्यसरकार आता या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात,यासाठी प्रयत्न करेल,अशी शक्यता आहे.साधारणपणे या निवडणुका फेब्रुवारी २५ दरम्यान होतील,असा अंदाज आहे. मुंबई,ठाणे,औरंगाबाद,पुणे, नाशिक,कल्याण-डोंबिवली, वसई-विरार,या महानगरपालिकासह राज्यातील महापालिका आपल्या ताब्यात राहाव्यात,यासाठी महायुती यावेळी जोरदार प्रयत्न…
दीपक मोहिते, न्यूजलाईन, नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारतीवरील कारवाईला सुरुवात, आज नालासोपारा शहरातील सुमारे २ हजार कुटुंबावर आज आभाळ कोसळले आहे.आरक्षण असलेल्या जमिनीवर बांधण्यात आलेल्या ४१ अनधिकृत इमारतीवर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने हातोडा चालवला.आज दिवसभरात या पथकाने रिकाम्या करण्यात आलेल्या इमारती जमीनदोस्त केल्या. नालासोपारा पूर्व भागात मौजे आचोळे,सर्वे क्रमांक २२ ते ३२ व ८३ मध्ये डंपिंग ग्राउंड व मलजल प्रक्रिया केंद्रासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर काही समाजकंटकांनी ४१ अनधिकृत इमारती चौदा वर्षापूर्वी बांधल्या. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती.त्यावर सुमारे गेली दोन वर्षे सुनावणी होऊन काही महिन्यापूर्वी या प्रकरणी न्यायालयाने अंतिम निकाल दिला.निकालात न्यायालयाने या ४१ इमारती तोडण्याचे आदेश दिले…
दीपअसेक मोहिते, ” न्यूजलाईन,” असे आहेत आपले नवीन आमदार : एक दृष्टीक्षेप, विधानसभेवर निवडून आलेल्या सर्वपक्षीय २८८ आमदारांपैकी ६५ % आमदारांवर विविध स्वरूपांचे गुन्हे दाखल आहेत.या आमदारांपैकी ११८ म्हणजेच ४१ % आमदारांविरोधात विविध पोलीस ठाण्यांत हत्या, अपहरण,हत्येचा प्रयत्न करणे, महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचारासारख्या गंभीर गुन्हयांची नोंद असल्याचे दिसून आले आहे. या आमदारांमध्ये एकूण २२ महिला आमदार आहेत. वयोमानानुसार सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ ( ७७ वर्षे ), दिलीप सोपल ( ७५ वर्षे ) आणि गणेश नाईक ( ७४ वर्षे ) यांचा क्रम लागतो.तर राष्ट्रवादीचे ( शरद पवार ) रोहित पाटील ( २५ वर्षे ) सर्वात तरुण आमदार आहेत.त्यांच्यापाठोपाठ…
दीपक मोहिते, त्या ४१ अनधिकृत इमारतीवर आजपासून निष्कासनाची कारवाई, वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती ‘ डी,’ मौजे आचोळे सर्वे नं.२२ ते ३२ व ८३ मधील “डंपिग ग्राऊंड व मलजल प्रक्रिया केंद्र ( एसटीपी, )” साठी आरक्षित असलेल्या आरक्षित भुखंडावर सन २०१० पूर्वी तत्कालिन सिडको नियोजन प्राधिकरणाच्या कार्यकाळात बांधलेल्या ४१ अनधिकृत इमारतीविरोधात उच्च न्यायालयात रिट याचिका क्र.१५८५३/२०२२ दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालय,मुंबई व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून या ४१ इमारतीवर आजपासुन निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे.तरी सदर इमारती लवकरात लवकर खाली करुन वसई विरार शहर महानगरपालिकेला सहकार्य करावे,असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जे सदनिकाधारक विहित पुरावा सादर करतील,त्यांना…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मनसेचा दारुण पराभव ; राज यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज, अखेर मनसेने या निवडणुकीच्या निकालावर आपले मौन सोडले आहे.त्यांच्या एका नेत्याने ” न्यायालय त्यांचे,निवडणूक आयोग त्यांचे,मग आम्ही न्याय कोणाकडे मागायचा ? ” असा प्रश्न उपस्थित करत आपल्या पराभवाचे खापर इव्हीएमवर फोडले आहे.तसेच महायुतीने या निवडणुकीत आमची फसवणूक केली,असा थेट आरोप केला आहे.त्यांच्या या म्हणण्यात बिलकुल तथ्य नाही,कारण त्यांचे नेते राज ठाकरे हे गेल्या पंधरा वर्षात आपल्या भूमिका वारंवार बदलत राहिले.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुंबई,नाशिक,पुणे,सिंधुदुर्ग व शहरी भागातील महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेतल्या,या प्रचार सभात ते महायुतीचे गुणगान गात होते. तत्पूर्वी ते गुजरात राज्यात जाऊन मोदी…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” अखेर भाजपने एकनाथ शिंदे यांचा गेम केलाच… अखेर भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यासारखाच पोपट केला.२०१९ साली उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी फिरवला,त्याच धर्तीवर एकनाथ शिंदेंनाही वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती,या पत्रकार परिषदेत हताश झालेले व वांरवार पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भलामण करताना एकनाथ शिंदे पहायला मिळाले. प्रादेशिक पक्षानं आपल्या पंखाखाली घेऊन त्यांना गुंडाळणे,हा संघाचा अलिखित अजेंडा आहे,त्यानुसार त्यांनी गेल्या दहा वर्षात शिवसेनेसह अनेक प्रादेशिक पक्ष संपवले.२०१४ साली त्यांनी सत्तेत आल्या आल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे सहकार्याचा हात…
दीपक मोहिते, ” बॉटमलाइन,” एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांसाठी भाजपने खड्डे खणून ठेवले आहेत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपण नवनिर्वाचित सरकारमध्ये सहभागी होणार नाही,आमचा बाहेरून पाठिंबा असेल,असा प्रस्ताव दिल्लीला पाठवल्यामुळे भाजपचे हायकमांड,शिंदे यांच्यावर प्रचंड नाराज झाले आहेत.” हे होणारच होते,” आम्ही ही शक्यता आठ दिवसापूर्वीच वर्तवली होती,ती खरी ठरली आहे.यानंतर मंत्रिपद व खातेवाटप प्रक्रियेत अजित पवार गटाला देखील भाजपचे हायकमांड शॉक देण्याच्या तयारीत आहे.अर्थ,गृह,नगरविकास व महसूल,ही चारही मलईदार खाती,भाजप स्वतःकडे ठेवणार आहे.त्यामुळे शिंदे व अजित पवार गटाची अवस्था ” इकडे आड,तिकडे विहीर,” अशी झाली आहे.सत्तेच्या काळात या दोन्ही गटाला ” तोंड बांधून बुक्क्यांचा मार,” सहन करावा लागणार आहे,हे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपने एकनाथ शिंदेंचा गळा आवळण्यास सुरुवात केली,तर अजित पवारही डेंजर झोनमध्ये, अखेर भाजपने डाव साधला,राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार आहे,त्यामुळे शिंदे यांचा पत्ता कट झाला आहे.त्यांना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात मंत्रिपद अशी ऑफर देण्यात आली आहे.पण शिंदे यांना हे दोन्ही प्रस्ताव मान्य नाहीत.ते पक्षप्रमुख म्हणून राहणार असू देशभरात आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी नियोजनबद्ध आखणी करत शिंदे यांची कोंडी केल्याचे दिसून आले आहे.शिंदे यांनी जर काही गडबड केली तर अजित पवार गटाला हाताशी धरून सत्ता स्थापन करण्यासंदर्भात मोदी व शहा हे दोघे सध्या चाचपणी करत आहेत.मुख्यमंत्रीपदावर काम केल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद…
दीपक मोहिते, ” निवडणूक विश्लेषण,” ” अंतिम भाग,” आ.हितेंद्र ठाकूर फिनिक्स पक्षासारखे पुन्हा भरारी घेतील, १३३ वसई विधानसभा मतदारसंघ,हा साडेतीन दशके आ.हितेंद्र ठाकूर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता.त्या बालेकिल्ल्याला या निवडणुकीत भगदाड पडले.सलग सहावेळा निवडणुका जिंकल्यानंतर यंदा अस काय घडलं की आ.ठाकूर यांचा पराभव झाला ? आ.ठाकूर यांचा पराभव होऊ शकतो,यावर लोकांचा अजूनही विश्वास बसत नाही.मात्र अनेक बाबी पडताळल्यानंतर पाच गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या,त्या म्हणजे विरोधकांनी पसरवलेले फेक नरेटिव्ह,बविआचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची निष्क्रियता व फाजील आत्मविश्वास,नवीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संख्या फळी उभारण्याकडे झालेले दुर्लक्ष व केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आलेले अपयश,होय.. या मतदारसंघात यंदा तिरंगी लढत झाली.बविआचे हितेंद्र ठाकूर,भाजपच्या स्नेहा…
दीपक मोहिते, ” पर्यटन विशेष,” पर्यटकांचे विशेष आकर्षण ; निसर्गरम्य ” वांद्री धरण,” महाराष्ट्राला निसर्गाने भरभरून दिले असून पावसाळ्यात अनेक भागातील हिरवाई आणि गर्द वनसंपदेने नटलेले डोंगर – दऱ्यामध्ये मनसोक्त भटकंती करण्याची मजा काही औरच असते. पावसाळ्यामध्ये भटकंती करत असताना रिमझिम पाऊस आणि त्यातल्या त्यात जर घाट रस्त्यांवरून प्रवास करत असाल तर पसरलेली धूक्याची चादर पर्यटकांचे मन मोहुन घेत असते. महाराष्ट्रामध्ये अनेक धरणे देखील असून पावसाळ्यात या धरणांना भेट देणे,ही पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते.परंतु काही धरणे ही सिंचनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असून महाराष्ट्राची शान आहेत.यापैकी एक पालघर जिल्ह्यातील वांद्री धरण …. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या गांजे ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीतील वांद्री धरण आणि…
