दीपक मोहिते,
भावपूर्ण श्रद्धांजली,
थोर अर्थशास्त्री व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग कालवश,
थोर अर्थशास्त्री,१९९० च्या दशकात देशाला आर्थिक
चणचणीतून यशस्वीपणे बाहेर काढणारे, विकासाचे व्हिजन असणारे डॉ.मनमोहनसिंग यांचे काल प्रदीर्घ आजारानंतर काल निधन झाले.गेली दहा वर्षे सक्रिय राजकारणापासून दूर होते.त्यांनी अर्थतज्ञ म्हणून केलेले कामास जगभरात पोचपावती मिळाली.त्यांनी आपल्या ३३ वर्षाच्या राजकीय वाटचालीत कायम आर्थिक सुधारणा व खुली अर्थव्यवस्थाची कास धरली. त्याचे दृश्यपरिणाम आपण आज पाहत आहोत.
ते भारताचे १४ वे पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग ९२ वर्षांचे होते.२००४ ते २०१४ असे सलग दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते.
विद्वान,मृदू,मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून डॉ.मनमोहनसिंग यांची ओळख होती.३३ वर्षे ते खासदार होते.तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर १० वर्ष पंतप्रधान राहणारे ते पहिले पंतप्रधान होते.
डॉ.मनमोहन सिंग १९९१ पासून राज्यसभेचे सदस्य होते त्यांनी १९९८-२००४ पर्यंत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहीले.२००४ आणि २००९ मध्ये काँग्रेस पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी २२ मे २००४ आणि पुन्हा २२ मे २००९ रोजी पंतप्रधानपद स्वीकारले.डॉ.सिंग यांची विकासाप्रती असलेली बांधिलकी आणि त्यांच्या अनेक कर्तृत्वाची ओळख त्यांना बहाल करण्यात आलेल्या अनेक अनेक सन्मानाच्या माध्यमातून करण्यात आली.
यामध्ये १९८७ मध्ये पद्मविभूषण,१९९३ मध्ये युरो मनी अवॉर्ड ऑफ द इयर ऑफ द इयर,१९९३ आणि १९९४ या दोन्ही वर्षातील अर्थमंत्र्यांचा आशिया मनी पुरस्कार आणि १९९५ मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार यांचा समावेश आहे.
डॉ.मनमोहनसिंग यांचा जन्म २६ सप्टें.१९३२ रोजी पंजाबमध्ये झाला.त्यांनी १९५२ मध्ये पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि १९५४ मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी १९५७ मध्ये केंब्रिज विद्यापीठातून त्यांचे इकॉनॉमिक ट्रायपोस पूर्ण केले.त्यानंतर त्यांनी १९६२ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फिल केले.
तर १९७१ मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले.त्यांना अल्पवाधित म्हणजे १९७२ मध्ये वित्तमंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदोन्नती देण्यात आली. यू.एन.सी.टी.ए.डी. सचिवालयात काम केल्यानंतर त्यांना दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.
याशिवाय डॉ.सिंग यांनी वित्त मंत्रालयात सचिव,नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष,भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष,अशी पदे भूषवली.त्यांच्या निधनामुळे केंद्रसरकारने देशात सात दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

