दीपक मोहिते,
” भारताची गौरवशाली गाथा,” प्रदर्शनाला वसईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,
भारताचे लष्करी सामर्थ्य तसेच दिल्लीत होणारी विविध राज्याची संचलने,याचे प्रदर्शन वसई कला क्रीडा महोत्सवात ३५ व्या वर्षा निमित्ताने महोत्सवाचे पहिले अध्यक्ष मुकेश सावे यांच्या मार्गदर्शना खाली विवा महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित केले आहे.या प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.या प्रदर्शनाचे अभिनेता सचिन खेडेकर यांनी तोंडभरून कौतुक केले आहे.
वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाच्या २५ व्या वर्षी वसईचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे ” माही वसई प्रदर्शन, ” आयोजित करण्यात आले होते.त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता.तर महोत्सवाच्या ३० व्या वर्षी ” कोकण पर्व, ” चे आयोज करण्यात आले होते.हे महोत्सवाचे ३५ वे वर्ष असल्यामुळे यंदा विवा महाविद्यालयाच्या सहकार्याने ” भारताची गौरवशाली गाथा,” प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनात सेना दलाच्या आजवरच्या वाटचालीचा वेध घेण्यात आला आहे.तसेच लहान पुतळ्यांच्या सहाय्याने सेना दलातील वेगवेगळ्या विभागाचे दर्शन घडवण्यात आले आहे.राष्ट्रपती भवन व इतर महत्वाची ठिकाणे,या प्रदर्शनामध्ये प्रदर्शित करण्यात आली आहेत.या प्रदर्शनात प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणारी विविध राज्याचे प्रतिनिधित्व करणारी आणि तेथील संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या छोट्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. संचलनात होणारी परेड त्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.हे प्रदर्शन वसई विकास बँकेच्या मुख्यालयात उभारण्यात आले आहे.सदर प्रदर्शन ३ जाने.पर्यंत सुरु राहणार आहे.त्यानंतर विरार येथील विवा महाविद्यालयात ते कायम स्वरूपात सर्वाना पाहता येणार आहे.
३५ व्या कला – क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ” भारताची गौरव गाथा, ” हे प्रदर्शन म्हणजे आपण २६ जाने.रोजी आपण दिल्लीत असल्याचा भास होत होता.त्याचबरोबर आपल्या देशाच्या लष्करी सामर्थ्याचेही दर्शन झाले.हे प्रदर्शन शाळेतील मुलांसह त्यांच्या पालकांनीही बघायला हवे,असे मत जेष्ठ सिनेकलावंत सचिन खेडेकर यांनी प्रदर्शन पाहिल्यावर व्यक्त केले.

