दीपक मोहिते,
महोत्सवाने मुलांना मोबाईलमधून बाहेर काढून
मैदानावर आणले — केदार शिंदे,
गेली ३५ वर्षे हा महोत्सव सुरू आहे,हे मोठे काम असून त्याबद्दल हितेंद्र ठाकूर यांचे अभिनंदन.येथे एकाच मैदानावर मातीतील स्पर्धा होत आहेत.या महोत्सवाने मोबाईल मधून मुलांना पुन्हा मैदानाकडे आणण्याचे काम केले आहे.क्रीडा स्पर्धाबरोबरच कला विभागात ही अनेक स्पर्धा होत आहेत.आमची सुरुवातही अशाच स्पर्धेतून झाली आहे.त्यामुळे या स्पर्धेमधून येणाऱ्या काळात अनेक कलाकार आणि खेळाडू तयार व्हाव्यात,अशा शुभेच्छा प्रसिद्ध निर्माता दिगदर्शक केदार शिंदे यांनी वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी दिल्या .
वसई तालुक्यातील विद्यार्थी व नागरिक यांच्या कला व क्रीडागुणांना वाव मिळावा व त्यांना कला व क्रीडा क्षेत्रात एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना प्रोत्साहन व स्पर्धात्मक संधी देण्याच्या हेतूने वसईत यंग स्टार ट्रस्ट पुरुस्कृत वसई विरार महानगरपालिकेच्या सहकार्याने वसई तालुका कला – क्रीडा विकास मंडळ आयोजित वसई तालुका कला – क्रीडा महोत्सवाच्या क्रीडा विभागाचे उदघाटन कसोटी क्रिकेटपट्टू संजय बांगर यांच्या तर कला विभागाचे निर्माता दिगदर्शक केदार शिंदे यांच्या हस्ते उदघाटन झाले.या महोत्सवाच्या उदघाटनाला नालासोपाराचे आ.राजन नाईक यांच्यासह माजी आ. हितेंद्र ठाकूर,माजी आ.क्षितिज ठाकूर,माजी आ.राजेश पाटील,वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त रमेश मनाले,माजी खा.बळीराम जाधव,माजी महापौर अनुक्रमे नारायण मानकर,प्रविण शेट्टी,प्रांत शेखर गाडगे,तहसीलदार अविनाश कोष्टी इ.मान्यवर उपस्थित होते.कला विभाग प्रमुख अनिल वाझ यांनी महोत्सवाच्या वाटचालीचा आढावा घेतला.यावेळी मैदानात विविध शाळेतील विद्यार्थ्यांचे संचलन झाल्यावर दुपारी विरार येथून निघालेल्या क्रीडाज्योतीचे आगमन मैदानात झाले.कार्यक्रमात वसईचे नाव उज्वल करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.महोत्सवात कला विभागात एकूण ३४ प्रकारच्या तर क्रीडा विभागात एकूण ३८ प्रकारच्या स्पर्धा विविध वयोगटात होणार आहेत.
महोत्सवात नव्याने निवडून आलेले नालासोपाऱ्याचे आ.राजन नाईक यांनी शुभेच्छापर केलेल्या आपल्या भाषणात,देशातील सर्वात मोठा कला- क्रीडा महोत्सव,हा माझ्या तालुक्यात सुरु आहे,त्याचा मला नक्कीच आनंद आहे.या मल्होत्सवाला जी मदत लागेल ती मी व आमच्या शासनातर्फे करेन,असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.तर भारतीय संघाचा माजी कसोटीपट्टू संजय बांगर यांनी सांगितले की,मला २०१२ पासून महोत्सवाला यायचे निमंत्रण होते,परंतु काही ना काही कारणामुळे मला येता येत नव्हते,परंतु तब्बल १२ वर्षानंतर हा योग्य आला आहे. मी पण ग्रामीण भागातूनच आलेला खेळाडू आहे.यापुढे शहरातून खेळाडू पुढे येणार नसून ते ग्रामीण भागातून येणार आहेत.कला – क्रीडा महोत्सव हे येथील खेळाडू आणि कलाकारांना मिळालेले व्यासपीठ आहे.या महोत्सवाच्या आयोजकांनी कार्यक्रमासाठी विविध खेळातील प्रशिक्षकांना बोलवावे,जेणेकरून येथील खेळाडू त्यांच्या नजरेत भरतील आणि खेळाडूंना त्याचा फायदा होईल.या कार्यक्रमानंतर भारताची गौरवगाथा या प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते वसई विकास बँकेच्या मुख्यालयात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी वसई कला – क्रीडा मोहोत्सवाचे पाहिले अध्यक्ष मुकेश सावे यांनी कला – क्रीडा महोत्सवाची वाटचाल आणि येणाऱ्या काळातील रूपरेषा मांडली.अशा कार्यक्रमासाठी तरुणांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन संगीता बेनो सेरोजो यांनी केले

