वसंत भोईर,वाडा,
हवामान बदलाचा परिणाम : कांदा उत्पादन घटले,दर पुन्हा वाढण्याचे संकेत,
कांद्याचे उत्पादन घटल्याने पुढील काळात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.मात्र कांद्याची मागणी वाढल्यास कांद्याला चांगला दर मिळेल.सरकारच्या धोरणावर मेहनतीचे सोने होणार की माती होणार,हे ठरणार आहे.
शेतकरी सध्या कांदा लागवड करण्याच्या तयारीत आहेत.यातून शेतकऱ्यांनी कांदा रोपाची पाहणी केली आहे.मात्र,कांद्याचे रोपच बाजारात उपलब्ध नसल्याने कांदा बी फेकून शेतकऱ्यांना लागवड करावी लागणार आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी उपायोजना सुरू केल्या आहेत.१५ डिसें.पर्यंत कांद्याची लागवड करण्यात येते.यावर्षी कांदा लागवड क्षेत्र वाढेल,असे वाटते.
कांद्याची लागवड करताना एका एकराला अडीच किलो बी लागते.कांद्याच्या बीयांचे दर ७०० ते ९०० रु. किलो आहे.तर पांढऱ्या कांद्याचे बी एक हजार ते बाराशे रु.किलो आहे.एक सरी दोन हजार रु.ना विकली जाते.एका एकराला दहा ते बारा स-यांचे रोप लागतात .
शेतकऱ्यांनी रोप तयार करण्यासाठी वाफे तयार केले. मात्र,बदलत्या हवामानाने ही रोपे तयारच झाली नाहीत. याचा फटका कांद्याच्या रॊपांना बसला.यातूनही कांद्याच्या रोपांचे दर वाढले आहेत.हे दर शेतकऱ्यांच्या आता बाहेर आहेत.
कांदा लागवडीचा एकही खर्च कितीबोल?
नांगरणी-१०००,
रोटावेटर-८००,
रोप-१२००,
लागवड-४०००,
वाहतूक-१०००,
औषध खते-४०००,
फवारणी-४५०,
खुरपणी-६०००,
काढणी-८०००,
वाहतूक-२०००,
इतर-२०००,
एकूण-४१,२५०,
कांद्याचा एकूण खर्च मोठा आहे.त्या तुलनेत मिळणारा दर नगण्य आहे.कांद्याला २५ रु.किलोवर दर असेल तरच शेतकऱ्यांना ते फायद्याचे ठरते.
-सुरेश भोईर,शेतकरी

