- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
Author: दीपक मोहिते
सद्दाम शेख मोखाडा, पालघर जिल्ह्यात यंदा आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता, फेंगल चक्रीवादळामुळे राज्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.सध्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे परिसरातील आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. यंदाक्या हंगामात परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्यामुळे आंबा पिकावर परिणाम होऊन आंब्यांची मोहोर प्रक्रिया लांबली आहे.दरवर्षी निसर्गाचा लहरीपणा,तसेच परतीचा पाऊस,वातावरणात होणारा बदल,याचा परिणाम बागायती पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.साधारणपणे सप्टें. महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात होते,मात्र या वर्षी पावसाने नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पाऊसाने हजेरी लावली.अशावेळी फेंगल चक्रीवादळामुळे हंगामी पिकांना फटका बसला आहे.गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आंब्याला मोहोर येण्याऐवजी पानातील रस शोषणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.साधारणतः नोव्हें.…
सद्दाम शेख,मोखाडा, मोखाडा तालुका ; रोजगार हमी योजनेचे तीन तेरा,आदिवासींच्या स्थलांतरणाला वेग, ग्रामीण भागातील आदिवासी नागरिकांचे स्थलांतर थांबावे, स्थानिक पातळीवर पुरेसा रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सरकारने रोजगार हमी योजना कार्यान्वित केली.या योजनेतून “ मागेल त्याला काम व पंधरा दिवसात दाम ” असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही महत्वकांक्षी योजना कार्यान्वित करण्यात आली परंतु सुरवातीची चार ते पाच वर्षात ही योजना यशस्वीपणे राबवण्यात आली.नंतर मात्र ग्रामिण भागात योजना अंमलात आणणारे अधिकारी व कर्मचारी यांनी योजनेचा मूळ उद्देश गुंडाळून ठेवला.मोखाडा तालुक्यात जवळपास १५ हजाराहून अधिक जॉंबकार्डधारकांची संख्या असुन वर्षभरात केवळ सहा ते सात हजार कार्डधारकांना या योजनेंतर्गतकाम मिळत असून उर्वरित आठ हजार कार्डधारक…
वसंत भोईर,वाडा ग्रामीण, वाडा तालुक्यातील अनेक ग्रा.पं.चा गलथान कारभार, वाडा तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीमध्ये जन्म-मृत्यूच्या नोंदी नसल्याचे श्रमजीवी संघटनेकडून उघड करण्यात आले असून त्यांनी तहसीलदारांकडे ग्रामपंचायतींच्या गलथान कारभाराची यादी सादर केली आहे. यादीची पडताळणी केल्यानंतर तहसीलदारांनी नोंदी करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना पारीत केले. ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिका-याकडून जन्म-मृत्यूची नोंद वेळीच करणे,हे काम आहे.मात्र तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील जन्म मृत्यूच्या घटना निदर्शनास येऊनही त्याकडे दुर्लक्ष करीत घटनेची नोंद केली जात नाही.ज्यावेळी रहिवासी व्यक्तीला विविध कामासाठी दाखला आवश्यक असतो,त्यावेळी ती व्यक्ती ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवते.दाखला देतांना नोंद करतांना त्या गरजू व्यक्तीला अनेक पुरावे सादर करावे लागतात.काही ग्रामपंचायत अधिकारी गरजू नागरिकाना चकरा मारायला लावतात.तसेच विविध कारणे दाखवून…
जव्हार प्रतिनिधी, धानोशी येथे महिला मेळावा उत्साहात साजरा, एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प-१ तर्फे धानोशी ग्रामपंचायतीमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी जव्हार पंचायत समितीच्या सभापती विजयाताई लहारे होत्या.यावेळी धानोशी ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णू पवार,उपसरपंच भगवान पालवी, व ग्रामपंचायत सदस्य ज्योती घेगड व सविता फरळे,आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीताने केली.त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पर्यवेक्षिका सरला मेतकर यांनी महिला मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. सदर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महिलांना प्रमुख मार्गदर्शन करतांना डॉ.भावना घोलप यांनी महिलांना योग…
जिल्हा परिषद पालघर दिनांक१०/१२/२०२४ संदीप लहाने,डहाणू, जिल्हा परिषद तसेच सर्व पंचायत समित्यांमध्ये मानवी हक्क दिन उत्साहात साजरा, पालघर जिल्हा परिषद तसेच सर्व पंचायत समितीमध्ये काल मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला. पंचायत समिती पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा अतुल पारस्कर,प्रभारी गटविकास अधिकारी बापूराव नाळे तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवदिन साजरा करण्यात आला. मानवी हक्क किंवा मानवी अधिकार,हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत.मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात.हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात.खाली नमूद करण्यात आलेले काही मानवी हक्क प्रमुख हक्क मानले जातात.…
गंगाधर जामनिक,पालघर पूर्व, रस्त्यात बंद पडणाऱ्या एस्ट्या ; प्रवासीवर्गात संतापाचे वातावरण, पालघर एस.टी.आगाराला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या सातपाटी – पालघर या मार्गांवर धावणाऱ्या एस. टी. बसेस सतत नादुरुस्त होत असतात,त्यामुळे प्रवासी वर्गात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी बंद पडणाऱ्या बसेस,हा महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणारा आहे. सातपाटीला जाणारी शेवटची बस अधून मधून बंद पडत असते.त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागतो.कारण रात्रीच्या वेळी जाण्यासाठी वाहन उपलब्ध होऊ शकत नाही.त्यामुळे प्रवासी महामंडळाच्या पालघर विभागाच्या बेभरवशा कारभारावर सडकून टीका करतात.सातपाटी मार्गावर नादुरुस्त वाहने देण्यात येत असल्याचा आरोप सातपाटीकरांकडून करण्यात येत आहे. प्रतिक्रिया /- एस.टी.प्रशासनाला सातपाटी ग्रामपंचायतीतर्फे या ज्वलंत समस्येबाबत आम्ही…
संजय लांडगे,वाडा शहर, मांगरूळ येथे जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन स्वच्छतागृह, वाडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मांगरूळ शाळेसाठी स्वच्छ आणि सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्याचा महत्वाचा उपक्रम राबवण्यात आला. के.पी.टी.पाईप्स यांच्या सी.एस.आर.कार्यक्रमांतर्गत, रोटरी क्लब ऑफ मुंबई बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स,फिनेट मीडीया,अभी & नियु ( Following Love ), आणि ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह यांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वी झाला. ही शाळा पूर्वीपासून स्वच्छ आणि सुसज्ज स्वच्छतागृहाच्या सुविधेपासून वंचित होती.विशेषतः मुलींना स्वच्छतागृहाच्या अभावामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.शाळेतील ही गरज लक्षात घेऊन के.पी.टी. पाइप्स यांनी जि.प.शाळेसाठी तीन मुलींसाठी आणि तीन मुलांसाठी असे एकूण सहा स्वच्छतागृह बांधून दिले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.या उद्घाटनप्रसंगी के.पी.टी.पाईप्सचे रिजनल…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महाविकास व इंडिया आघाडीची वाटचाल बिघाडीच्या दिशेने… नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीची वाटचाल आता बिघाडीच्या दिशेने सुरू झाली आहे.लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही तसेच यश पदरात पडेल,अशी सर्वसाधारण अपेक्षा होती.पण आघाडीच्या घटक पक्षात या निवडणुकीत एकवाक्यता व समन्वय याचा अभाव राहिल्यामुळे त्यांचे संख्याबळ साठीच्या आत आले.या पराभवानंतरही त्यांच्या वागण्यात सुधारणा झाली नाही.या पराभवाची कारणमीमांसा करणे,आपलं काय चुकलं ? याविषयी हे घटक पक्ष एकत्रितपणे आत्मचिंतन करतील,अशी अपेक्षा होती,पण त्यांनी आपापल्या वेगळ्या चुली मांडण्यात धन्यता मांडली.त्यामुळे ही आघाडी आता किती काळ तग धरेल,हे सांगणे कठीण आहे. महविकास आघाडीची ही तऱ्हा तर…
दीपक मोहिते, पालघर जिल्हा परिषद चिंचले प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळणार हक्काचे छत, डहाणू तालुक्यातील चिंचले येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत व अंगणवाडीची इमारत मुंबई – वडोदरा महामार्गात जात असल्यामुळे महामार्ग बनवणाऱ्या कंपनीने जिल्हा परिषदेची कुठलीही पूर्व परवानगी न घेता तोडल्या होत्या.त्यामुळे वर्षभरापासून या शाळेतील विद्यार्थी हे एका पत्राच्या छताखाली शिक्षण घेत होते.जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी वर्षभरापासून जिल्हा परिषदेमधील प्रत्येक स्थायी आणि सर्वसाधारण सभेमध्ये पोटतिडकीने हा विषय मांडत असत.नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत हा विषय काशिनाथ चौधरी यांच्याकडून मांडण्यात आला. या सभेमध्ये मुलांना शाळा उपलब्ध करून न दिल्यास जिल्हा परिषद येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने आज…
दीपक मोहिते, पालघर जिल्हा परिषद चिंचले प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळणार हक्काचे छत, डहाणू तालुक्यातील चिंचले येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत व अंगणवाडीची इमारत मुंबई – वडोदरा महामार्गात जात असल्यामुळे महामार्ग बनवणाऱ्या कंपनीने जिल्हा परिषदेची कुठलीही पूर्व परवानगी न घेता तोडल्या होत्या.त्यामुळे वर्षभरापासून या शाळेतील विद्यार्थी हे एका पत्राच्या छताखाली शिक्षण घेत होते.जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी वर्षभरापासून जिल्हा परिषदेमधील प्रत्येक स्थायी आणि सर्वसाधारण सभेमध्ये पोटतिडकीने हा विषय मांडत असत.नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत हा विषय काशिनाथ चौधरी यांच्याकडून मांडण्यात आला. या सभेमध्ये मुलांना शाळा उपलब्ध करून न दिल्यास जिल्हा परिषद येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने आज…
