संजय नेवे,विक्रमगड,
विक्रमगड – आंबेघर येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन,
विक्रमगड तालुक्यातील आंबेघर येथे आज माऊली स्पोर्ट्स क्लब व जिल्हा परिषद पालघर आरोग्य विभाग यांच्यातर्फे ” एक धाव कुष्ठरोग निर्मूलनासाठी, ” मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन पालघर लोकसभेचे खा.हेमंत सावरा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संदीप पावडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप निंबाळकर,भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पावडे निशिकांत संखे आदी मान्यवर उपस्थित होते.माऊली स्पोर्टस क्लब गेल्या ४ वर्षापासून अथॅलेटिक्स स्पर्धा भरवत असून या स्पर्धेला उस्फूर्त असा स्पर्धकांचा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आयोजक सुरज हाडळ यांनी दिली असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्पर्धक येत आहेत.

