Author: दीपक मोहिते

सुरेश काटे,तलासरी, तलासरीतील रुग्णांची उपचारासाठी गुजरात राज्यात धाव, आरोग्य विभागातील रिक्त पदे आणि आदिवासी भागात काम करण्याची उदासीनता, अशा दोन कारणामुळे तलासरी सारख्या आदिवासी भागात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहॆ.रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नसल्याने नाईलाजास्तव गुजरात राज्यात जाऊन आदिवासी रुग्णांना महागडे उपचार करून घ्यावे लागत आहॆत. तलासरी तालुक्यात शासानाच्या ग्रामीण रूग्णालयासह चार प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच २७ उपकेंद्रे आहेत,पण या आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांची रीक्त पदे मोठया प्रमाणात आहेत.तसेच आदिवासी भागात काम करण्यास वैद्यकिय अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उदासीनता असल्यामुळे,वैद्यकिय अधिकारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहायला तयार नसतात.एक डॉक्टर सतत तीन दिवस काम करून उर्वरित काळात घरी जात असल्याने आदिवासी रुग्णांना २४ तास सेवा…

Read More

मनिष म्हात्रे,वसई, आगाशी येथे सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा, सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ,आगाशीचा ४७ वा वर्धापन दिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ काल संध्याकाळी काशीदास घेलाभाई हायस्कूल आगाशी येथील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य तथा युवा नेतृत्व विकास तज्ञ प्रिया सावंत,केळवे येथील नूतन विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अशोक राऊत उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोमवंशी क्षत्रिय संघाचे चिटणीस प्रफुल्ल म्हात्रे यांनी भूषवले.यावेळी युवक मंडळाचे अध्यक्ष महेश म्हात्रे, आकाशवाणीचे केंद्र संचालक भूपेंद्र मेस्त्री,वृत्तनिवेदक राजेश राऊत,पत्रकार मनिष म्हात्रे तसेच आगाशी व उंबरगोठण शाखेतील ज्येष्ठ समाज बांधव व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.वर्धापनदिनाचे औचीत्य साधून मंडळाच्या…

Read More

अनिल वैद्य,नाशिक, नाशिकमध्ये आज लॅब टेक्निशियन व व्यवसायिकांची राज्यस्तरीय परिषद, ” थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्र,” हे ब्रीद घेऊन मराठा विद्या प्रसारक समाज,नाशिक संचलित सिन्नर,येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,जिल्हा नाशिक आणि आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट-ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन व व्यावसायिक यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी राज्यभरातून ७०० विद्यार्थी,लॅब टेक्निशियन आणि व्यवसायिकांनी नोंदणी करण्यात आली आहे,अशी माहिती मविप्रच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य पी.व्ही.रसाळ, आश्रय संस्थेचे मुख्य विश्वस्त दीपक नाईक प्रा.प्रकाश पांगम यांनी दिली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी…

Read More

विश्वास रानडे,पुणे, पुरंदर विमानतळाच्या कामाना वेग : २०२९ पर्यंत काम पूर्ण होणार, पुणेकरासाठी एक आनंदाची बातमी आहॆ. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या पुरंदर विमानतळाच्या कामाला आता वेग आला आहे. विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनाची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे देण्यात आली असून सप्टें.पर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या पुरंदर विमानतळाच्या कामाला वेगाने सुरु झाले आहॆ.राज्यातील सर्व विमानतळाच्या विमानसेवा आणि विकास कामासंदर्भात केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकताच आढावा घेतला आहॆ. या विषयी माहिती देताना ते म्हणाले की, “ मागच्या आठवड्यामध्ये मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ३३ विमानतळाच्या बाबतीत…

Read More

संजय नेवे,विक्रमगड, विक्रमगड तालुक्यात २४ हजार मजुरांच्या हाताला गावातच काम, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीच्या माध्यमातून विविध कामांना सुरुवात झाली आहॆ.तालुक्यामध्ये २४ हजार २४५ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तालुक्यात भातशेतीची कामे आटोपल्यानंतर भागातील आदिवासी मजूर मोठ्या संख्येने शहराकडे स्थलांतर होत असतात.परंतु गेल्या काही वर्षापासून रोजगार हमीच्या कामाच्या माध्यमातून स्थानिक आदिवासीना कामे मिळू लागल्यामुळे या भागातील स्थलांतर कमी झाल्याचे दिसून येत आहे. सरकारने मजुरांना १०० दिवस काम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विविध शासकीय यंत्रणांची असल्याने आज पंचायत समिती स्तरावरील नाला खोलीकरण,गाय गोठा,घरकुल,पेवरब्लॉक,वृक्ष लागवड,रस्ते,अशी एकूण ५२३ कामे सुरू झाली असून त्यासाठी १४ हजार ६८२ मजुरांना काम…

Read More

सुहास पेडणेकर,तारकर्ली, एलईडीच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्या बोटीवर कायदेशीर कारवाई, गेल्याच आठवड्यात राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी एलईडीच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्यासाठी डिजिटल डेटा व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली होती.त्यानंतर अवघ्या काही दिवसात अंमलबजावणी यंत्रणेने एका बोटीवर कारवाई केली आहे. या प्रणालीनुसार समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटीवर नजर ठेवण्यात येत आहे.विजयदुर्ग परिसरात एक मासेमारी बोट अशा पद्धतीने मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर परवाना अधिकारी देवगड,यांनी सागरी कायद्याच्या तरतुदीनुसार नोटीस जारी करून बोट व संबधित सामुग्री जप्त करण्याचे आदेश दिले.त्यानंतर बोट व १० लाख किमतीचे एलइडी लाईट पुरवणाऱ्या साहित्य जप्त करण्यात आले.मुक्ताई नावाची ही बोट सध्या विजयदुर्ग बंदरात ठेवण्यात…

Read More

रवि शानभाग,कर्जत रायगड विशेष, जनाची नाही तर मनाची लाज बाळगा -भरत गोगावले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ” जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी,” अशा परखड शब्दात राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी एका कार्यक्रमात त्यांना खडे बोल सुनावले.या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये रणकंदन सुरू होण्याची शक्यता आहे. काल रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सीबीसी लॉन येथे कर्जत विधानसभा,शिवसेना,भाजप व रिपाई तर्फे नवनिर्वाचित मंत्री,खासदार,आमदार, यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता,त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमास सार्व. आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर,भरत गोगावले,खा.धैर्यशील पाटील,पेणचे आ.रवि पाटील,खा.श्रीरंग बारणे,माजी आ.महेंद्र थोरवे व सुरेश लाड इ.मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्याचे महिला व बालविकासमंत्री अदिती…

Read More

दीपक मोहिते, पालकमंत्रिपदाचे घोडं अखेर गंगेत न्हालं…. अखेर पालकमंत्र्यांचे घोडं गंगेत न्हालं,सर्वप्रथम मंत्रिमंडळ,त्यानंतर मंत्र्यांचा शपथविधी,खातेवाटप व आता पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार,या तिघांची चांगलीच दमछाक झाली.अशावेळी बीडहत्या प्रकरण घडले त्यामुळे पालकमंत्रीपदाचा वाद शिगेला पोहोचला होता.पुणे,रायगड व बीड या तीन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कसा सोडवायचा ? असा यक्षप्रश्न फडणवीस सरकारसमोर उभा ठाकला होता. काल या तिघांनी या यादीवर अखेरचा हात फिरवला व ती प्रसिद्धीस दिली.पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जबाबदारी स्विकारली आहे.पुण्यासाठी चंद्रकांत पाटील हे इच्छुक होते,पण त्यांच्याकडे सांगलीची धुरा सोपवण्यात आली आहे.बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांना देण्यात येऊ…

Read More

नवीन पाटील,सफाळे, तारापूर येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, तारापूर ग्रामपंचायत क्षेत्रातील तरुणांनी एकत्र येवून सर्व धर्म समभाव,बंधुभाव आणि सामाजिक सलोखा,अधिक घट्ट करण्याच्या उद्देशाने गावातील सर्व जाती धर्माच्या खेळाडूंसाठी तारापूर क्रिकेट प्रीमियम लीग २०२५ चे आयोजन तारापूर जवळ कांबोडा येथील मैदानावर तीन दिवस करण्यात आले आहॆ.या क्रिकेट स्पर्धेत तारापूर गावातील आठ संघ व सुमारे १२५ खेळाडू सहभागी झाले आहेत . या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पत्रकार पंकज राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तारापूरच्या सरपंच संध्या पागधरे,उपसरपंच उमेश दवणे पालघर तालुका रोहिदास समाज संघाचे अध्यक्ष वसंत जाधव,माजी उपसरपंच निळकंठ पाटील व गणेश दवणे,ग्रामपंचायत सदस्य तन्वी किणी व योगिता उंबरे माजी…

Read More

वसंत भोईर,वाडा, वाड्यात विश्व हिन्दू परिषद वाडा प्रखंडाच्या वतीने समरसता महायज्ञ संपन्न, वाडा तालुक्यातील वावेघर येथे विश्व हिन्दू परिषद वाडा प्रखंडच्या वतीने काल श्री स्वामी समर्थ मंदिरात समरसता आयाम महायज्ञ पार पडला.यावेळी २० विवाहित दाम्पत्य यज्ञासाठी बसले होते. पुरोहित्य जिल्हा सामाजिक समरसता प्रमुख श्री.महेंद्र सुरती महाराज यांनी केले.तसेच उपस्थित सर्वाना मार्गदर्शन प्रांतमंत्री मोहन सालेकर यांनी केले.यावेळी हिंदू समाजामध्ये महान यज्ञ परंपरा सांगितली. महिला संत यांची महती सांगितली.हिंदू समाज आज संघटीत जर राहिला नाही तर येणारा काळ आपल्यासाठी कठीण असेल. ” बटोंगे तो कटोंगे,” ब्रीदवाक्य समजुन सर्व जातीपातीच्या पलिकडे राहून हिंदू म्हणून एक झालो पाहिजे.नियमित यज्ञ सत्संग केला पाहिजे,असे आवाहन त्यांनी…

Read More