विश्वास रानडे,पुणे,
पुरंदर विमानतळाच्या कामाना वेग : २०२९ पर्यंत काम पूर्ण होणार,
पुणेकरासाठी एक आनंदाची बातमी आहॆ.
गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या पुरंदर विमानतळाच्या कामाला आता वेग आला आहे. विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनाची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे देण्यात आली असून सप्टें.पर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दिला आहे.
गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या पुरंदर विमानतळाच्या कामाला वेगाने सुरु झाले आहॆ.राज्यातील सर्व विमानतळाच्या विमानसेवा आणि विकास कामासंदर्भात केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकताच आढावा घेतला आहॆ.
या विषयी माहिती देताना ते म्हणाले की, “ मागच्या आठवड्यामध्ये मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ३३ विमानतळाच्या बाबतीत विचारविनिमय करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली.त्या बैठकीत केंद्रातील व राज्यातील वरिष्ठ अधिकारी होते.पुरंदर विमानतळ २०२९ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.विमानतळासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या संपादनाचे काम एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात येणार आहॆ.पुण्याच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे काम देखील येत्या दीड वर्षांमध्ये पूर्ण होईल. पुरंदर,नवी मुंबई आणि पुणे या विमानतळाबाबतही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.महाराष्ट्रातील चार विमानतळाच्या नामांतराबाबतचे प्रस्ताव दिले आहेत.पुणे,छ.संभाजीनगर, नवी मुंबई विमानतळाला दि. बा.पाटिलांचे नाव देण्यात यावे,कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव द्यावे, असे प्रस्ताव राज्य सरकारने पाठवले आहेत,मी पाठपुरावा करत आहेत.”

