सुहास पेडणेकर,तारकर्ली,
एलईडीच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्या बोटीवर कायदेशीर कारवाई,
गेल्याच आठवड्यात राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी एलईडीच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्यासाठी डिजिटल डेटा व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली होती.त्यानंतर अवघ्या काही दिवसात अंमलबजावणी यंत्रणेने एका बोटीवर कारवाई केली आहे.
या प्रणालीनुसार समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटीवर नजर ठेवण्यात येत आहे.विजयदुर्ग परिसरात एक मासेमारी बोट अशा पद्धतीने मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर परवाना अधिकारी देवगड,यांनी सागरी कायद्याच्या तरतुदीनुसार नोटीस जारी करून बोट व संबधित सामुग्री जप्त करण्याचे आदेश दिले.त्यानंतर बोट व १० लाख किमतीचे एलइडी लाईट पुरवणाऱ्या साहित्य जप्त करण्यात आले.मुक्ताई नावाची ही बोट सध्या विजयदुर्ग बंदरात ठेवण्यात आली आहे.लवकरच या प्रकरणाची सुनावणी सहा.आयुक्त मत्स्यव्यवसाय,सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात होणार आहे.

