वसंत भोईर,वाडा,
वाड्यात विश्व हिन्दू परिषद वाडा प्रखंडाच्या वतीने समरसता महायज्ञ संपन्न,
वाडा तालुक्यातील वावेघर येथे विश्व हिन्दू परिषद वाडा प्रखंडच्या वतीने काल श्री स्वामी समर्थ मंदिरात समरसता आयाम महायज्ञ पार पडला.यावेळी २० विवाहित दाम्पत्य यज्ञासाठी बसले होते.
पुरोहित्य जिल्हा सामाजिक समरसता प्रमुख श्री.महेंद्र सुरती महाराज यांनी केले.तसेच
उपस्थित सर्वाना मार्गदर्शन प्रांतमंत्री मोहन सालेकर यांनी केले.यावेळी हिंदू समाजामध्ये महान यज्ञ परंपरा सांगितली. महिला संत यांची महती सांगितली.हिंदू समाज आज संघटीत जर राहिला नाही तर येणारा काळ आपल्यासाठी कठीण असेल.
” बटोंगे तो कटोंगे,” ब्रीदवाक्य
समजुन सर्व जातीपातीच्या पलिकडे राहून हिंदू म्हणून एक झालो पाहिजे.नियमित यज्ञ सत्संग केला पाहिजे,असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
या प्रसंगी पालघर विभाग मंत्री महेश मिस्त्री, जिल्हा मंत्री जयेश घरत, जिल्हा संघटनमंत्री विकास माकुणे,जिल्हा सहसंयोजक शुभम पष्ठे आदी उपस्थित
होते.यज्ञ व कार्यक्रमाची सांगता शांतीमंत्र,उद्घोषणा व सहभोजन करून झाली.या कार्यक्रमास कमलाकर पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाडा प्रखंड अध्यक्ष मिथुन नाईक,प्रखंड मंत्री विजय वारघडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

