नवीन पाटील,सफाळे,
तारापूर येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन,
तारापूर ग्रामपंचायत क्षेत्रातील तरुणांनी एकत्र येवून सर्व धर्म समभाव,बंधुभाव आणि सामाजिक सलोखा,अधिक घट्ट करण्याच्या उद्देशाने गावातील सर्व जाती धर्माच्या खेळाडूंसाठी तारापूर क्रिकेट प्रीमियम लीग २०२५ चे आयोजन तारापूर जवळ कांबोडा येथील मैदानावर तीन दिवस करण्यात आले आहॆ.या क्रिकेट स्पर्धेत तारापूर गावातील आठ संघ व सुमारे १२५ खेळाडू सहभागी झाले आहेत .
या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
पत्रकार पंकज राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तारापूरच्या सरपंच संध्या पागधरे,उपसरपंच उमेश दवणे पालघर तालुका रोहिदास समाज संघाचे अध्यक्ष वसंत जाधव,माजी उपसरपंच निळकंठ पाटील व गणेश दवणे,ग्रामपंचायत सदस्य तन्वी किणी व योगिता उंबरे माजी सदस्य गीतांजली सावे नीता मोरे व भारती राणा,विनायक जाधव,मार्कंडेय शाह,गणेश बाणे,वैशाली जाधव आदी मान्यवर उपस्थित होते .
क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळा संदेश दिला जाणार असून मॅच सहा षटकाच्या आहेत.दरम्यान ज्येष्ठ ग्रामस्थांची तसेच महिलांचीही क्रिकेट मॅच होणार आहे.प्रथम विजेत्या संघाला ५० तर द्वितीय विजेत्या संघाला २५ हजार रु. आणि ट्रॉफी बक्षीस देण्यात येणार असून उल्लेखनीय खेळ करणाऱ्या खेळाडूंचाही सन्मान करण्यात येणार आहे.स्पर्धेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी यतीन जाधव,राजेश कुटे,संतोष पाटील,तुषार किणी,राकेश सावे,मनोज व महेश राऊत,आवेश जुमानी, सिद्धांत पाटील,अतुल व किरण जाधव आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

