- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहीते, ” हिंदू खतरेमे,” बांगला देशातील हिंदू दंगलखोरांचे लक्ष्य, बांगला देशात सध्या जाळपोळ सुरू असून दंगलखोरांनी हिंदूंच्या वसाहतींना लक्ष्य केले आहे.भयभीत झालेले हिंदू नागरीक आता भारत-बांगला देशाच्या सीमेवर जमा होत आहेत.भारताने याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.दरम्यान देशात नवे सरकार लवकरात लवकर स्थापन करण्यात येणार आहे.पंतप्रधानपदी नोबेल पारितोषिक विजेते महंमद युनूस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.युनूस हे सध्या पॅरिसमध्ये असून ते आज बांगला देशात परतत आहेत. शेख हसीना यानी ब्रिटिश सरकारकडे आश्रय मागितला आहे,मात्र त्यांना परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप सिग्नल मिळालेला नाही.तर अमेरिकेने त्यांचा व्हिसा रद्द केला आहे.नवीन सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप देशात सुरू असलेली…
दीपक मोहिते, संपादकीय, बांगला देशातील अराजकता ; केंद्र सरकार अलर्ट मोडवर, बांगला देशात सध्या प्रचंड अराजकता निर्माण झाली असून पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे.देशात जी धुमश्चक्री सुरू आहे,ती लक्षात घेऊन आपल्या सरकारने सीमावर्ती भागात असलेल्या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.तर सीमा सुरक्षा दलाने बांगला देशाच्या सीमेवर खबरदारीचे उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर देशात आता लष्करी राजवटीचा अंमल सुरू झाला आहे.बांगला देशात लष्कराची राजवट येण्याची ही दुसरी घटना आहे.यापूर्वी तत्कालीन लष्करप्रमुख झिया उर रहमान यांनी १९७७ साली उठाव करून सत्ता ताब्यात घेतली होती.सन १९८१ पर्यंत ते राष्ट्रपतीपदावर कार्यरत…
दीपक मोहिते, आरक्षणाची दाहकता ; बांगला देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, आपल्या शेजारी असलेल्या बांगला देशात सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० % आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास आज हिंसक वळण लागले.आंदोलक व पोलीस यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत ८ विद्यार्थी व १३ पोलीसांचा बळी गेला आहे.तर पंतप्रधान शेख हसीना यांना आपल्या कुटुंबासह देश सोडावा लागला.या सर्व घडामोडीनंतर देशाची सूत्रे सध्या लष्कराच्या ताब्यात गेली आहेत.शेख हसीना याना आपला देश तात्पुरता आश्रय देण्याची शक्यता आहे.त्यानंतर त्या ब्रिटिश सरकारकडे राजाश्रय मागतील,अशी शक्यता आहे. आरक्षणाची दाहकता किती भयावह असते,ते या सर्व घटनांवरून दिसून आले आहे.या संघर्षाची पार्श्वभूमी कशाप्रकारची आहे,हे पाहणे आवश्यक ठरते.१९७१ च्या स्वातंत्र्यलढ्यात ज्या स्वातंत्र्यासैनिकांनी भाग घेतला,त्यांच्या वंशजांसाठी…
दीपक मोहिते, सूर्यातीर, पर्यटनवाढीसाठी जोमाने प्रयत्न हवेत, दरवर्षी राज्य व केंद्र सरकार आपल्या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करत असते.मात्र इतर देशांच्या तुलनेत आपले पर्यटनक्षेत्र गेल्या सात दशकात वाढू शकले नाही.गेल्या ७७ वर्षात पर्यटनवाढीसाठी हजारो कोटी रु.च्या तरतुदी करण्यात आल्या.पण अजूनही आपल्या पर्यटनक्षेत्राला सुगीचे दिवस येऊ शकले नाही. ज्या कोकण परिसराला आपण कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न पाहतो,तो कोकण आजही उपेक्षितच आहे.अस का घडलं ? तर या प्रश्नाचं उत्तर आहे,नोकरशाहीचा करंटेपणा व लोकप्रतिनिधींची उदासीनता होय.आपल्या राज्यात कोकण,प.महाराष्ट्र,विदर्भ व उ.महाराष्ट्र या उपविभागात अनेक पर्यटनस्थळे असून ते विकसित करण्याच्या दृष्टीने स्वातंत्र्योत्तर काळात प्रभावीपणे विकासकामे झाली नाहीत.कोकणचा निसर्गरम्य समुद्रकिनारा,गडकिल्ले, प्रसिद्ध देवस्थाने,कर्नाळा अभयारण्य,डोंगरमाथ्यावर वसलेले माथेरान,नंदुरबार…
[04/08, 6:57 am] droneweb123: दीपक मोहिते, सूर्यातीर, पर्यटनवाढीसाठी जोमाने प्रयत्न हवेत, दरवर्षी राज्य व केंद्र सरकार आपल्या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करत असते.मात्र इतर देशांच्या तुलनेत आपले पर्यटनक्षेत्र गेल्या सात दशकात वाढू शकले नाही.गेल्या ७७ वर्षात पर्यटनवाढीसाठी हजारो कोटी रु.च्या तरतुदी करण्यात आल्या.पण अजूनही आपल्या पर्यटनक्षेत्राला सुगीचे दिवस येऊ शकले नाही. ज्या कोकण परिसराला आपण कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न पाहतो,तो कोकण आजही उपेक्षितच आहे.अस का घडलं ? तर या प्रश्नाचं उत्तर आहे,नोकरशाहीचा करंटेपणा व लोकप्रतिनिधींची उदासीनता होय.आपल्या राज्यात कोकण,प.महाराष्ट्र,विदर्भ व उ.महाराष्ट्र या उपविभागात अनेक पर्यटनस्थळे असून ते विकसित करण्याच्या दृष्टीने स्वातंत्र्योत्तर काळात प्रभावीपणे विकासकामे झाली नाहीत.कोकणचा निसर्गरम्य समुद्रकिनारा,गडकिल्ले, प्रसिद्ध…
पालघर, कलम ३७० व ३५अ निष्कासित ; पाच वर्षे पूर्ण, बॉटमलाईन, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी पाच वर्षांपूर्वी भारतीय संविधानातील अनुच्छेद ३७० हटवण्यासंदर्भातील विधेयक,राज्यसभेत मांडले ,होते व त्यास प्रचंड गदारोळात मंजुरी मिळाली होती.विरोधक या विधेयकाविरोधात आक्रमक झाले व जोरदार घोषणाबाजी करत विरोधी पक्षाचे तमाम खासदार वेलमध्ये उतरले होते. हे कलम हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरचे विभाजन करून लडाख हा प्रदेश केंद्रशासित करण्यात आला.मात्र लडाखसाठी वेगळी विधानसभा निर्माण करण्यात आली नाही.या दोन महत्वाच्या घडामोडीसोबत कलम ३५ अ देखील हटवण्यात आले. कलम ३७० व ३५ अ हटवण्या संदर्भात केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांपासून सावध पावले टाकण्यास सुरुवात केली होती.हे कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये आंदोलन व निदर्शने…
दिपक मोहिते, बॉटमलाईन, वायनाड दुर्घटना ; पर्यावरणाचे महत्व वेळीच ओळखा, केरळ राज्यातील वायनाड या गावात दरड कोसळून सुमारे ३७३ जणांना आपले जीव गमवावे लागले.२२० लोक अद्याप बेपत्ता आहेत,तर २२५ जण गंभीर जखमी झाले आहेत.बचावपथकाने अद्याप शोधमोहीम सुरू ठेवली आहे.निसर्गाकडून अशाप्रकारचा कोप का होतो,यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. यापूर्वी आपल्या राज्यातही माळीण व इर्शालवाडी येथे दरड कोसळून अनेक जण मृत्युमुखी पडले होते.ही दोन्ही गावे डोंगर उतारावर वसलेली होती.वायनाड येथे झालेली दुर्घटनाही तशीच आहे.३० जुलै २०२४ ची सकाळ वायनाडवासीयांसाठी दुर्देवी ठरली.या दरडीखाली मेपड्डी व निलांबूर या दोन गावातील अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली व सर्वत्र हाहाकार उडाला.घटनेची खबर लागताच…
दीपक मोहिते, वास्तव, भूमीपुत्राना उध्वस्त करू नका,मुख्यमंत्र्यांना हजारो भूमीपुत्रांचे साकडे, गेल्या आठवड्यात विरार पश्चिमेस असलेल्या नवापूर या समुद्रकिनारी असलेल्या गावात सेव्हन सी बीच रिसॉर्टससमोर घडलेल्या हाणामारीच्या घटनेत मिलिंद मोरे या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली,या मारहाणीनंतर मोरे याना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचा मृत्यू झाला.ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मित्राचा मुलगा होता.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ते रिसॉर्टस तोडण्याचे आदेश दिले व महसूल विभागाने वेळ न दवडता तो एका रात्रीत जमीनदोस्त केला.मुख्यमंत्री शिंदे यांची ही कृती म्हणजे केवळ बेजबाबदारपणा होता.ज्या मुलांनी हाणामारी केली त्यांच्यावर कारवाई सुरू असताना रिसॉर्टस तोडणे हे अत्यंत चुकीचे होते. कारण ज्या तरुणांनी मिलिंद मोरे याना मारहाण केली,त्यांच्यावर गुन्हा दाखल करून…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वाझेच्या पाठीशी असणाऱ्या अज्ञात शक्ती तोंडघशी पडतील, वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे,पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी एक मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर अज्ञात शक्ती सक्रिय झाल्या व सचिन वाझे आता पुन्हा पोपटासारखा बोलायला लागला आहे.या सर्व घडामोडी अत्यन्त वेगाने घडल्या,यामागचे कारण काय असावे,असा प्रश्न सर्वानाच पडला असणार,ते कारण जाणून घेऊया. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे १५ ऑगस्ट पूर्वी आणखी एक गौप्यस्फोट करणार आहेत.त्यामुळे काही जणांची घाबरगुंडी उडाली व त्यांनी वाझे याला रिचार्ज केले व सचिन वाझे पुन्हा वृत्तवाहिनीवर झळकू लागला.सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत…
दिपक मोहिते, ” बॉटमलाईन,” आरक्षणप्रश्नी समाजाच्या नेत्यांनी स्वार्थी व सत्तापिपासू राजकारण्यांना ओळखावे, राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून जो सावळा गोंधळ सध्या चालला आहे,तो राज्याला विनाशाच्या वाटेवर नेणारा ठरणार आहे.आज मराठा,ओबीसी,धनगर व दलित या जातीमध्ये भांडणे लावून कोणालाही सुखाने सत्ता उपभोगता येणार नाही.मणिपूरमध्ये जे झालं व आजही होत आहे.ते आपल्या राज्यात होता कामा नये,याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे जे प्रयत्न सध्या होत आहेत,ते अत्यंत घातक असे आहेत.पण आपले राज्यकर्ते स्वार्थापोटी फार मोठ्या संकटाला आमंत्रण देत आहेत.या सर्व समाजाच्या नेत्यांनी या दळभद्री राजकारण्यांच्या नादी लागू नये,कारण या राजकारण्यांच्या अशा जीवघेणी खेळीमुळे आपल्या पोराबाळांचे भवितव्य अंधारात ढकलले जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे…
