Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.२०, प्रचंड महसूल देणारा प्रभाग,पण बकाल, या प्रभागामध्ये अनेक औद्योगिक वसाहती असून हजारो तरुणांना येथे रोजगार उपलब्ध होत असतो.पण या प्रभागात स्थानिक नागरिक व चाकरमान्यांना दररोज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.औद्योगिक वसाहतीमध्ये धड रस्ते नाहीत,साफसफाईची कामे वेळेवर होत नाहीत,विस्कळीत परिवहन सेवा व रिक्षाचालकांचा मनमानीपणा,आदी कारणामुळे सर्वसामान्य नागरिकांची अवस्था ” भीक नको,पण कुत्रं आवर,” अशी झाली आहे.दर पावसाळ्यात तर या प्रभागातील नागरिकांचे हाल कुत्रे खात नाही.नियोजनशून्य औद्योगिक वसाहती स्थापन झाल्यामुळे या प्रभागाला एकप्रकारचा बकालपणा आला आहे.या वसाहतीमधील हजारो कारखान्याकडून महानगरपालिकेला मालमत्ताकराच्या रूपाने प्रचंड महसूल मिळतो,पण त्या बदल्यात त्यांना पुरेशा नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत. येथील…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हारच्या शिरोशी ग्रामपंचायतीमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन, राष्ट्रीय पोषण महिना ( १ ते ३० सप्टें. ) तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आज ग्रामपंचायत शिरोशी येथे रानभाजी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायतीच्या सरपंच योगीता शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ग्रामपंचायत ग्रामसेवक,रोजगार सेवक,पेशा मोबीलायझर,गावातील महिला बचत गट तसेच चारही अंगणवाडींच्या सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.ऍक्शन अगेन्स हंगर या संस्थेचे प्रतिनिधी भोये यांनी रानभाज्यांचे पोषणमूल्य व मुलांच्या आरोग्यासाठी त्यांचे महत्त्व समजावून सांगितले. तर निखंडे यांनी “आहाराचा तिरंगा,” याबाबत मार्गदर्शन करत विविध भाज्यांचा आहारात समावेश करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.समारोप प्रसंगी सरपंच योगीता शेंडे यांनी ग्रामपंचायतीतर्फे सहभागी महिला,अंगणवाडी…

Read More

वाडा प्रतिनिधी, वाड्यात नमो विकास मॅरेथॉन उत्साहात संपन्न, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील भारत तसेच युवकांना नशेपासून दूर ठेवण्यासाठी व सुदृढ,समर्थ सशक्त भारत घडवण्यासाठी सेवा पंधरवडा अभियान नुकताच वाडा येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात नमो विकास मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनचे उद्घाटन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार व नरेश आक्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. आपला भारत देश, खेळामध्ये सुद्धा महासत्ता बनावा,या स्वप्नाला बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही चळवळ सुरु केली आहे.या चळवळीला विविध माध्यमातून देशभरात उत्तम प्रतिसाद लाभत आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमो रन विषयी मार्गदर्शन करतांना युवकांनी नशेपासून दुर राहून सुदृढ भारत घडवण्याचे आवाहन करण्यात…

Read More

वाडा प्रतिनिधी, भरपावसात कामगारांचे कुटुंबासह बेमुदत उपोषण, तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या कोकाकोला या कंपनीतील कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकले असून या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.वारंवार सांगूनही ठेकेदार, कामावर घेण्यास टाळाटाळ करत असल्याने संतापलेल्या कामगारांनी आजपासून तहसीलदार कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेच्या झेंड्याखाली बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अंकल चौधरी,समाधान देहाडे,रूपेश चौधरी,संजय कातवारे व प्रकाश सोनावणे अशी कुटुंबासह उपोषणास बसलेल्या कामगारांची नावे आहेत. वाडा तालुक्यातील कुडूस येथे शितपेय बनवणारी कंपनी असून या कंपनीत सदर कामगार अनेक वर्षापासून कंत्राटी पद्धतीने क्विस क्रोप प्रा. लि.या ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून काम करीत होते.सदर कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता गेल्या मे महिन्यापासून कामावरून काढून टाकण्यात आले…

Read More

दीपक मोहिते, जिल्हा परिषद/ पंचायत समिती,रणसंग्राम – मोखाडा तालुका, मोखाडा तालुका ; स्वातंत्र्याच्या आठ दशकानंतरही विकासाच्या प्रतिक्षेत… मोखाडा तालुका हा अतिग्रामीण तालुका म्हणून ओळखला जातो.या तालुक्यात अनु.जमाती समाजाची लोकसंख्या सर्वाधिक असल्यामुळे तालुक्याला आदिवासी दर्जा मिळाला आहे.नव्याने जिल्हा अस्तित्वात आल्यानंतरही या तालुक्याचा मागासलेपणा आजही ” जैसे थे,” स्थितीतच आहे.या तालुक्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय भातशेती असून या व्यवसायावर हजारो आदिवासी कुटुंबे आपला उदरनिर्वाह चालवतात.या तालुक्याच्या विकासासाठी वर्षाकाठी शेकडो कोटी रु.देण्यात येतात,पण राजकीय मंडळी व नोकरशाही त्याचा फडशा पाडतात.तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत तो पैसा पोहोचत नाही.त्यामुळे स्थानिक आदिवासी भूमिपुत्र आजही उपेक्षित जीवन जगत आहे. हा तालुका पालघर व नाशिक जिल्ह्याच्या वेशीवर वसला आहे.विकासाचे अनेक…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१९, प्रभाग क्र.१९ ; परप्रांतीयांना आंदण, मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेला हा प्रभाग गेली अनेक वर्षे विकासाच्या बाबतीत कायम मागासलेलाच आहे.त्यामुळे अनधिकृत बांधकाम व्यवसायिकांचे व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे चांगलेच फावले आहे.या प्रभागाची ओळख ” बकाल,” अशी करण्यामध्ये या दोघांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली.अनेक परप्रांतीय गुंडांनी या परिसराचे अक्षरशः लचके तोडले तर मनपा अधिकाऱ्यांनी आपल्या सात पिढ्या बसून खातील,इतका रग्गड पैसा कमावला.वसईच्या विकासाचा कसा सत्यानाश केला जातो,हे या प्रभागावरून स्पष्ट होऊ शकते. वन,आदिवासी व सरकारी जमिनी,गुंड व नोकरशाही हातात हात घालून कसे लुटतात,हे या प्रभागात उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे पाहता आपल्या लक्षात येते.तोडण्यात आलेली अनधिकृत…

Read More

दीपक मोहिते, बदल हवा,पण तो व्यवस्थेला मारक असता कामा नये, बातम्याचे हेडिंग वाचकांच्या मनाला भावेल,असे करणे,ही पण एक कला आहे,पूर्वीची जुनी माणसे यामध्ये तरबेज होती.काळ जसजसा बदलत गेला,तसे सारं काही बदलत गेले.पूर्वी पत्रकारितेला “” आदर्श पत्रकारिता,” असे गोंडस नांव होते,हल्ली त्या पत्रकारीतेचे बारसं होऊन ” गोदी मिडिया,” असे नामकरण झाले आहे. ” बदल ही काळाची गरज असते.” असे म्हंटले जाते,पण हा बदल आता लोकशाही व्यवस्थेला मारक ठरणारा आहे,हे आपण विसरत चाललो आहोत. जयंतराव साळगावकर आणि डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे एकाच दिवशी निधन झाले ( अर्थात एक नैसर्गिक आणि दुसरे आपण जाणतोच ) दुसऱ्या दिवशी लोकसत्तामध्ये हेडिंग,काळ निर्णय आणि काळ निर्दय काही…

Read More

दीपक मोहिते, नको ती महानगरपालिका,नको ती निवडणूक, आमच्या नशिबी हे दुष्टचक्र कशासाठी – करदात्यांचा आक्रोश, गेले अठरा दिवस आपले news27.in media वसई तालुका व पालघर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती,महानगरपालिकाव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या हालचाली,प्रभागनिहाय विकासकामे,तसेच लोकप्रतिनिधींची निष्क्रियता व अधिकारी वर्गाचा खादाडपणा याविषयी सविस्तर विवेचन करत आहे.मनपाच्या एकूण २९ प्रभागांपैकी १८ प्रभाग तर जिल्हा परिषदेच्या ५७ गटापैकी ४६ गट आपण प्रसिद्ध केले असुन उर्वरीत प्रभाग व गट येत्या दहा दिवसांत पूर्ण करणार आहोत. तत्पूर्वी आपण गेल्या चार ते पाच दिवस प्रभाग व गटात फेरफटका मारून या दोन्ही निवडणूकासंदर्भात मतदारांच्या राजकीय पक्षाकडून काय अपेक्षा आहेत ? ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला.जवळपास…

Read More

दीपक मोहिते, विरार,वसई व नालासोपारा पश्चिम भागातील अनधिकृत इमारतीवरही कारवाई करा… वीस दिवसांपूर्वी विरार पूर्व भागात इमारत कोसळून १९ रहिवासी मृत्यूमुखी पडल्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी खडबडून जागे झाले व अनधिकृत बांधकाम विरोधी मोहिमेला चांगलाच वेग आला. गेल्या वीस दिवसात प्रशासनाने लाखो फुटाचे अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. पूर्व भागातील चाळमाफियाची बांधकामे जमीनदोस्त करण्यात येत आहेत, तालुक्याच्या पश्चिम भागात ज्या बिल्डर्सनी अतिरिक्त अनधिकृत मजले आपल्या इमारतीवर बांधले आहेत, त्यावर मात्र निष्कासनाची कारवाई करण्यात येत नाही. या अशा अनधिकृत मजल्यांची सखोल चौकशी व्हावी,व या बिल्डर्सवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे,अशी मागणी करण्यात येत आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या निर्देशानुसार विशेष पथक नेमणूक करण्यात आले…

Read More

वसंत भोईर,वाडा गारगाई पाणी प्रकल्पासाठी तानसा अभयारण्यातील साडेचार लाख झाडांची कत्तल, मुंबईची तहान भागवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या वाडा तालुक्यातील गारगाई प्रकल्पाचे काम येत्या काही महिन्यात सुरु होणार आहे.या प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असुन विस्थापित होणाऱ्या एक हजाराहून अधिक कुटुंबियांनाही सद्यस्थितीत असलेल्या घरबाव जमिनीची किंमत,फळझाडे व जमिनीची किंमत किती द्यायची हे निश्चित करण्यात आले आहे.मात्र या प्रकल्पासाठी या परिसरातील जंगल व अभयारण्यातील सुमारे साडेचार लाख झाडांवर कु-हाड चालवली जाणार आहे.त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात जिल्ह्यांत जागा खरेदी करुन त्याठिकाणी तिप्पट झाडे लावण्याचे आश्वासन दिले आहे. वाडा तालुक्याचा अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओगदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात हा प्रकल्प होत आहे.या प्रकल्पासाठी…

Read More