वाडा प्रतिनिधी,
वाड्यात नमो विकास मॅरेथॉन उत्साहात संपन्न,
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील भारत तसेच युवकांना नशेपासून दूर ठेवण्यासाठी व सुदृढ,समर्थ सशक्त भारत घडवण्यासाठी सेवा पंधरवडा अभियान नुकताच वाडा येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात नमो विकास मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
या मॅरेथॉनचे उद्घाटन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार व नरेश आक्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
आपला भारत देश, खेळामध्ये सुद्धा महासत्ता बनावा,या स्वप्नाला बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही चळवळ सुरु केली आहे.या चळवळीला विविध माध्यमातून देशभरात उत्तम प्रतिसाद लाभत आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमो रन विषयी मार्गदर्शन करतांना युवकांनी नशेपासून दुर राहून सुदृढ भारत घडवण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी पालघर जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार, नमो मॅरेथॉनचे संयोजक नरेश आक्रे मनीष दहेरकर,राजेंद्र समेळ,कुणाल साळवी,वाडा शहर मंडळ अध्यक्ष स्वप्निल रोठे,कैलास गवळी,समीर विचारे,निशांत वलटे,प्रथमेश गोरे आदींसह वाडा शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

