Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” भारताची गौरवशाली गाथा,” प्रदर्शनाला वसईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, भारताचे लष्करी सामर्थ्य तसेच दिल्लीत होणारी विविध राज्याची संचलने,याचे प्रदर्शन वसई कला क्रीडा महोत्सवात ३५ व्या वर्षा निमित्ताने महोत्सवाचे पहिले अध्यक्ष मुकेश सावे यांच्या मार्गदर्शना खाली विवा महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित केले आहे.या प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.या प्रदर्शनाचे अभिनेता सचिन खेडेकर यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाच्या २५ व्या वर्षी वसईचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे ” माही वसई प्रदर्शन, ” आयोजित करण्यात आले होते.त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता.तर महोत्सवाच्या ३० व्या वर्षी ” कोकण पर्व, ” चे आयोज करण्यात आले होते.हे महोत्सवाचे ३५ वे वर्ष असल्यामुळे…

Read More

दीपक मोहिते, पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गणेश नाईक, मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत, भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्यामुळे त्यांना ” एक व्यक्ती,एक पद,” भाजपच्या नियमावलीनुसार अध्यक्षपद सोडावे लागणार आहे.त्यामुळे या पदावर देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे तसेच विश्वासू सहकारी असलेल्या रविंद्र चव्हाण वर्णी लागणार आहे.यासंदर्भात एक ते दोन दिवसात त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी गेल्या दहा वर्षात पक्षवाढीसाठी केलेले प्रयत्न नजरेत भरणारे होते. पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना या दोन्ही जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा जागा जिंकण्यासाठी भरीव योगदान दिले.या…

Read More

दीपक मोहिते, आगामी वर्ष चांगलं जावो,अशी अपॆक्षा  करूया… नववर्षदिन अवघ्या तीन दिवसावर आला असून देशवासीय तो साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.गेल्या वर्षभरातील कटू आठवणीना मूठमाती देत देशवासीय नव्या वर्षाचे स्वागत करतील.नवी आकांक्षा व अपेक्षा उराशी बाळगत नववर्षाला सामोरे जात आहेत. सर्वप्रथम गतवर्ष सर्वसामान्य जनतेला कसे गेले,याविषयी आढावा घेऊया.हे वर्ष फारसे उत्साहवर्धक नव्हते.या वर्षात आर्थिक आघाडीवर फारशा घडामोडी घडल्या नाहीत. महागाई ” जैसे थे,” स्थितीत राहिली.अनेक जीवनावश्यक वस्तूच्या जीएसटीमध्ये वाढ झाली.या वर्षात राज्य सरकारने सार्वजनिक पैश्याची बेफाम उधळपट्टी केली.त्याचा राज्याच्या विकासकामांवर परिणाम झाला.राज्यावर कर्जाचा बोझा प्रचंड प्रमाणात वाढत गेला.ही वाढ सुमारे २३ % इतकी होती.बाजारातील वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे पार…

Read More

वसंत भोईर,वाडा, हवामान बदलाचा परिणाम : कांदा उत्पादन घटले,दर पुन्हा वाढण्याचे संकेत, कांद्याचे उत्पादन घटल्याने पुढील काळात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.मात्र कांद्याची मागणी वाढल्यास कांद्याला चांगला दर मिळेल.सरकारच्या धोरणावर मेहनतीचे सोने होणार की माती होणार,हे ठरणार आहे. शेतकरी सध्या कांदा लागवड करण्याच्या तयारीत आहेत.यातून शेतकऱ्यांनी कांदा रोपाची पाहणी केली आहे.मात्र,कांद्याचे रोपच बाजारात उपलब्ध नसल्याने कांदा बी फेकून शेतकऱ्यांना लागवड करावी लागणार आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी उपायोजना सुरू केल्या आहेत.१५ डिसें.पर्यंत कांद्याची लागवड करण्यात येते.यावर्षी कांदा लागवड क्षेत्र वाढेल,असे वाटते. कांद्याची लागवड करताना एका एकराला अडीच किलो बी लागते.कांद्याच्या बीयांचे दर ७०० ते ९०० रु. किलो आहे.तर पांढऱ्या कांद्याचे बी…

Read More

दीपक मोहिते, राजकारणाची अधोगती, संतोष देशमुख हत्या प्रकरण : अजित पवार यांना घेरण्याच्या हालचाली, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक व्हावी,यासाठी,सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व भाजपचे आ.सुरेश धस यांनी जोरदार मोहीम उघडली आहे.आतापर्यंत या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व त्यांना पाठीशी घालणाऱ्या धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले होते.पण आ.धस यांनी अचानकपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात संशयाची पाल चुकचुकू लागली आहे.आ.धस यांनी अचानक अजित पवार यांच्याविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केल्यामुळे आता राजकारण ढवळून निघाले आहे.भाजपचा आमदार असताना धस या प्रकरणी आक्रमक भूमिका घेऊ लागल्यामुळे त्यांना कोणाची फूस आहे,अशी चर्चा सुरू झाली आहे.आ.धस हे…

Read More

दीपक मोहिते, महोत्सवाने मुलांना मोबाईलमधून बाहेर काढून मैदानावर आणले — केदार शिंदे, गेली ३५ वर्षे हा महोत्सव सुरू आहे,हे मोठे काम असून त्याबद्दल हितेंद्र ठाकूर यांचे अभिनंदन.येथे एकाच मैदानावर मातीतील स्पर्धा होत आहेत.या महोत्सवाने मोबाईल मधून मुलांना पुन्हा मैदानाकडे आणण्याचे काम केले आहे.क्रीडा स्पर्धाबरोबरच कला विभागात ही अनेक स्पर्धा होत आहेत.आमची सुरुवातही अशाच स्पर्धेतून झाली आहे.त्यामुळे या स्पर्धेमधून येणाऱ्या काळात अनेक कलाकार आणि खेळाडू तयार व्हाव्यात,अशा शुभेच्छा प्रसिद्ध निर्माता दिगदर्शक केदार शिंदे यांनी वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी दिल्या . वसई तालुक्यातील विद्यार्थी व नागरिक यांच्या कला व क्रीडागुणांना वाव मिळावा व त्यांना कला व क्रीडा क्षेत्रात एक चांगले…

Read More

दीपक मोहिते, बांगला देशात हिंदूनंतर ख्रिस्ती समुदाय रडारवर, बांगला देशात हिंदूनंतर आता ख्रिस्ती समाजाला लक्ष्य करण्यात येत आहे.ख्रिस्ती समुदायाच्या वस्तीवर समाजकंटकाकडून सतत हल्ले करण्यात येत आहेत. बांगला देशात सध्या जे काही चालले आहे,त्यामध्ये अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयएचा हात आहे.दक्षिण आशियामध्ये भारत बलाढ्य राष्ट्र होता कामा नये,यासाठी अमेरिका,चीन व पाकिस्तान हे तिघे प्रयत्नशील आहेत.हसीना शेख यांचे सरकार खाली खेचण्यात अमेरिकेने महत्वाची भूमिका बजावली होती.बांगला देशाचे सल्लागार युनूस मोहंमद यांनी बांगला देशाच्या लष्कराला प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराला पाचारण केले आहे.दक्षिण आशिया अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असून, त्यामध्ये अमेरिका महत्वाची भूमिका पार पाडत आहे. म्यानमार व नेपाळ या दोन देशात चीनचा ड्रॅगन हातपाय…

Read More

दीपक मोहिते, भावपूर्ण श्रद्धांजली, थोर अर्थशास्त्री व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग कालवश, थोर अर्थशास्त्री,१९९० च्या दशकात देशाला आर्थिक चणचणीतून यशस्वीपणे बाहेर काढणारे, विकासाचे व्हिजन असणारे डॉ.मनमोहनसिंग यांचे काल प्रदीर्घ आजारानंतर काल निधन झाले.गेली दहा वर्षे सक्रिय राजकारणापासून दूर होते.त्यांनी अर्थतज्ञ म्हणून केलेले कामास जगभरात पोचपावती मिळाली.त्यांनी आपल्या ३३ वर्षाच्या राजकीय वाटचालीत कायम आर्थिक सुधारणा व खुली अर्थव्यवस्थाची कास धरली. त्याचे दृश्यपरिणाम आपण आज पाहत आहोत. ते भारताचे १४ वे पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग ९२ वर्षांचे होते.२००४ ते २०१४ असे सलग दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. विद्वान,मृदू,मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून डॉ.मनमोहनसिंग यांची ओळख होती.३३ वर्षे ते खासदार होते.तर देशाचे पहिले पंतप्रधान…

Read More

संजय नेवे,विक्रमगड, प्रत्येक कुटूंबाला सक्षम करण्यासाठी शासन कटिबध्द-गोगावले, शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचव ल्या जाणार असून जनतेने रोजगार हमी योजनेंतर्गत येणाऱ्या प्रत्सेक योजनांचा लाभ घ्यावा.त्यासाठी गावातील प्रत्येक कुटूंब सक्षम करण्यास शासन कटिबध्द आहे,असे प्रतिपादन रोजगार हमी व फलोत्पादन,खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले यांनी विक्रमगड तालुक्यातील खोमारपाडा येथे आज केले. या कार्यक्रमास खा.डॉ.हेमंत सवरा, जि.प.अध्यक्ष प्रकाश निकम, आ.हरिश्चंद्र भोये,आ.राजेंद्र गावित,मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार वर्मा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके,उपजिल्हाधिकारी ( रोहयो ) विजया जाधव, खोमारपाडा गावचे सरपंच विलास गहला आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी गोगावले म्हणाले की, पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. खोमारपाडा,या छोट्याशा गावाने एक आदर्श निर्माण केला आहे.खोमारपाडा हे…

Read More

दिपक मोहिते, वसई – विरार मनपातर्फे मुलांसाठी व्याख्यानाचे आयोजन, वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या विविध ज्ञानमंदिरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.परंतु शिक्षणाबरोबर काही महत्वाच्या विषयासंदर्भात योग्य वेळी योग्य मागर्दर्शन होणे,तितकेच गरजेचे आहे. ज्यामध्ये लहान मुलांवर होणारे अत्याचार,त्यांच्या शरीरावर आणि मनावर सुद्धा आघात होता असतो म्हणून अशा मुलांसाठी ” चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श,”आणि ” स्वसंरक्षण,” ज्यामधून मुलांना योग्य वेळी काय आणि कशा पद्धतीने प्रतिकार करायचा,याबद्दल जागरूकता येईल,त्याच बरोबर व्यसनाधीनता,मग ती मोबाईल असो,वा अमली पदार्थांचा,सध्याच्या वसई-विरार परिसरात ही वाढत जाणारी समस्या आहे. अनेक ठिकाणी अमली पदार्थ सापडत आहे आणि यामध्ये आपला युवा गुरफटत…

Read More