दिपक मोहिते,
वसई – विरार मनपातर्फे मुलांसाठी व्याख्यानाचे आयोजन,
वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या विविध ज्ञानमंदिरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.परंतु शिक्षणाबरोबर काही महत्वाच्या विषयासंदर्भात योग्य वेळी योग्य मागर्दर्शन होणे,तितकेच गरजेचे आहे.
ज्यामध्ये लहान मुलांवर होणारे अत्याचार,त्यांच्या शरीरावर आणि मनावर सुद्धा आघात होता असतो म्हणून अशा मुलांसाठी ” चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श,”आणि ” स्वसंरक्षण,” ज्यामधून मुलांना योग्य वेळी काय आणि कशा पद्धतीने प्रतिकार करायचा,याबद्दल जागरूकता येईल,त्याच बरोबर व्यसनाधीनता,मग ती मोबाईल असो,वा अमली पदार्थांचा,सध्याच्या वसई-विरार परिसरात ही वाढत जाणारी समस्या आहे. अनेक ठिकाणी अमली पदार्थ सापडत आहे आणि यामध्ये आपला युवा गुरफटत आहे. त्यामुळे योग्य वयामध्ये मुलांना योग्य तज्ज्ञांकडून विषयाचे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
त्यामुळे ” व्यसनाधीनता,” आणि ” वयातील संभाव्य धोके,” याबद्दल तज्ज्ञांतर्फे मागर्दर्शन होणे,काळाची गरज बनली आहे.त्यानुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये, ” चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श,” ” स्वसंरक्षण,” व्यसनाधीनता,” आणि कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये ” व्यसनाधीनता,” आणि ” वयातील संभाव्य धोके,” या विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वसई तालुक्यातील इतिहास सांगणे खूप गरजेचे आहे.त्यामुळे वसई ( वसई तालुक्यातील इतिहास ) विद्यार्थ्यांना सांगण्याकरिता व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
त्यानुसार महानगरपालिका हद्दीतील उत्कर्ष विद्यालय विरार,मदर मेरी इंग्लिश हायस्कूल आणि जूनियर कॉलेज,नालासोपारा पूर्व व इतर अनुदानित व विनाअनुदानित शाळा,कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय व जिल्हा परिषद शाळेमध्ये व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.त्यास शाळा व महाविद्यालय यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.तसेच उर्वरित शाळा व महाविद्यालयांन मध्ये देखील लवकरात लवकर व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत.” व्यसनाधिनता जनजागृती, ” या विषयावरील व्याख्यानामध्ये व्यसनाधिनता म्हणजे काय, त्याच्या पायऱ्या कोणत्या आहेत,त्यापासून आपण स्वतःला कसे सुरक्षित ठेऊ शकतो याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ” चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श,” ह्या व्याख्यानामध्ये वाईट स्पर्श कसा ओळखायचा आणि आपल्यासोबत जर अशी घटना घडली तर काय करायचे याबाबत मुलांना
आणि मानसिक सक्षमता याविषयी मुलांना मार्गदर्शन करण्यात आले.जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी ” माझी वसई,” या विषयाचे व्याख्यान घेण्यात येत असून वसई तालुक्याचा इतिहास मुलांना सांगण्यात येतो,जेणेकरून मुलांना आपला परिसर आणि त्याचा इतिहास समजेल.सदर व्याख्यानाचा विद्यार्थ्यांना त्याच्या जीवनात नक्कीच फायदा होणार आहे.अशाप्रकारची व्याख्याने आयोजित करणारी आणि अश्या प्रकारचा नविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी कदाचित एकमात्र आपली महानगरपालिका असावी.

