Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, किल्लारी भूकंप ; भूकंपग्रस्त आजही हलाखीचे जीवन जगत आहेत, ३० सप्टेंबर १९९३ रोजी लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात पहाटे ३.५६ मिनिटाने ६.०४ रीष्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.क्षणार्धात ७ हजार ९२८ माणसे मृत्युमुखी पडली.तर १६ हजारहून अधिक लोक जखमी झाले,सुमारे १५ हजार ८५४ जनावरे आपल्या प्राणाला मुकली.५२ गावातील सुमारे सव्वा दोन लाख घरांना तडे गेले.सर्वात जास्त फटका उमरगा व औसा या दोन तालुक्यांना बसला.या घटनेला काल ३१ वर्षे पूर्ण झाली,पण या गावातील लोक अद्याप या धक्क्यातून सावरू शकलेले नाहीत. या प्रलयंकारी भूकंपाला आज ३१ वर्षे पूर्ण झाली. मृत्यूच्या वेदना कवटाळून नव्या पिढीने पुन्हा जगण्याच्या लढाईला नव्याने सुरुवात केली होती.पण त्यांना…

Read More

दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” काँग्रेसच्या नेत्यानी शरद पवार यांच्याकडून शिकायला हवे, एकीकडे महायुती व महाविकास आघाडीच्या शिवसेना ( उबाठा ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये जागावाटप व मुख्यमंत्रीपदावरून दावे-प्रतिदाव्याला उत आला असताना शरद पवार मात्र हूं का चू करताना बघायला मिळत नाहीत.सर्वप्रथम लढाई जिंकणे आवश्यक आहे,असे त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे ते या वादात पडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.सध्या ते भाजप व अजित पवार गटाच्या नाराज आमदार व पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्याच्या कामात गुंतले आहेत.शत्रूचा गड सर करायचा असेल तर त्याचा पाया पोखरला पाहिजे,अशी रणनिती त्यांनी आखली आहे.त्यांच्या या रणनितीला चांगले यश मिळत आहे.अनेक आमदार व पदाधिकारी आता एकामागोमाग त्यांच्या पक्षात दाखल होऊ…

Read More

दीपक मोहिते, इलेक्ट्रो बॉंड प्रकरणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अडचणीत, गेल्या पाच वर्षात वाढलेली भरमसाठ महागाई,जीएसटीमुळे समाजातील प्रत्येक घटक त्रस्त असताना,मूग गिळून बसणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त इलेक्ट्रोल बॉंड प्रकरणी चांगलेच कान उपटले आहेत.या प्रकरणी न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.न्याय दंडाधिकारी यांनी दिलेल्या या निर्णयाने ” ना खाऊंगा,ना खाने दुंगा,” या भाजपच्या घोषणेचा थेट शिरच्छेद झाला आहे. अगोदर सेबी प्रमुख माधवी बूच पुरी आणि आता साक्षात अर्थमंत्री निर्मला सीतारमण या प्रकरणी अडचणीत आल्या आहेत. याप्रकरणी केवळ सेबीप्रमुख माधवी पुरी व अर्थमंत्री निर्मला सीतारमण नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा भाजप देखील अडचणीत आला आहे.…

Read More

दीपक मोहिते, सूर्यातीर, नोकरशाहीच्या बुरसट मानसिकतेमुळे ” मनरेगा,” योजनेची वाताहत, ग्रामीण भागातील लोकांच्या हाताला काम मिळावे,त्यांच्या मुलाबाळांना दोन वेळचे पोटभर जेवण मिळावे,यासाठी राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी रोजगार हमी योजना सुरू केली.या योजनेला ग्रामीण जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.आपल्या राज्यात या योजनेला मिळालेले यश पाहून देशातील इतर राज्यांनीही आपले अनुकरण करत ही योजना आपापल्या राज्यात राबवण्यास सुरुवात केली.कालांतराने ही योजना मनरेगा म्हणून ओळखली जाऊ लागली. १९७२ साली राज्यावर आलेल्या दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी हरितक्रांतीचे प्रणेते व तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी या योजनेची पायाभरणी केली.ग्रामीण भागातील लोकांना वर्षातून किमान २०० दिवस काम ( केंद्र सरकार व राज्य सरकार,प्रत्येकी १०० दिवस ) उपलब्ध…

Read More

दीपक मोहिते, आगामी विधानसभा निवडणूक २०२४ ; एकूण ९ कोटी ५९ लाख मतदार आपला हक्क बजावतील, केंद्रीय निवडणूक आयोगाने काल आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भातील घेण्यात आलेल्या कामकाजाच्या आढावा विषयी माहिती दिली.या निवडणुकीत एकूण ९ कोटी ५९ लाख मतदार असून ४ कोटी ९५ लाख पुरुष तर महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६४ लाख इतकी आहे.या निवडणुकीत १९ लाख ४८ हजार नवमतदार असून ते पहिल्यांदा मतदान करणार आहेत. येत्या २६ नोव्हे.रोजी विधानसभेची मुदत संपत असल्यामुळे आगामी निवडणूक नोव्हे.महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पार पडतील,असे संकेत या पत्रकार परिषदेतून मिळाले आहेत.तसेच ऑक्टो.महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल.त्यामुळे राजकीय पक्षाच्या हालचालींना चांगलाच…

Read More

दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” मनसेचे नेते राज ठाकरे यांना झालंय तरी काय ? मनसे,आगामी निवडणुकीत किती जागा लढवणार,हे अद्याप निश्चित झाले नसले तरी पक्षाचे नेते राज ठाकरे हे गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्याचे दौरे करत आहेत.नाशिक व ठाणे जिल्ह्यात त्यांचा पक्ष फार नाही,पण एखाद दोन जगावर चांगली लढत देईल.पण त्यांना जागा जिंकणे,अशक्य आहे.या निवडणुकीसाठी राज ठाकरे हे सतत दौऱ्यावर आहेत,पण त्यांना अद्याप सूर सापडलेला नाही.त्यांच्या प्रचारात कुठेतरी वैचारिक गोंधळ निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत हेच राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारासाठी मुंबई,ठाणे,कल्याण, नाशिक व पुण्यात प्रचारात जाहीर सभा घेत होते.आज तेच राज ठाकरे महायुतीच्या कारभारावर ताशेरे ओढत सर्वत्र…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” श्रेय उपटण्याच्या नादात गृहखात्याची लक्तरे वेशीला टांगली गेली, बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची पोलिसांकडून एन्काऊंटर झाल्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये सुरू झालेली श्रेयवादाची हावरट स्पर्धा ही अत्यंत घृणास्पद अशीच होती.अक्षय शिंदे याला सजा झालीच पाहिजे,अशी प्रत्येक नागरिकांची इच्छा होती,पण ती भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून व्हायला हवी,असे अभिप्रेत होते.पण पोलिसांनी त्याला ज्या पद्धतीने ठार मारले, त्या पद्धतीला लोकांचा विरोध आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपीने आमच्यावर हल्ला केला व आम्ही स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला.या घटनेनंतर शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी आनंद व्यक्त करत पेढे वाटले.तर खा.नरेश म्हस्के यांनी शिंदे या पोलीस अधिकाऱ्याची हॉस्पिटलमध्ये जाऊन अभिनंदन केले.हे शिंदे महाशय,एक…

Read More

दीपक मोहिते, नालासोपारा येथील अनधिकृत इमारतीमधील रहिवाशांचे आझाद मैदानात आंदोलन, नालासोपारा पूर्वेस अग्रवाल नगरीमधील आरक्षित जागेवरील ४१ अनधिकृत इमारती मधील सुमारे दहा हजार रहिवाशांनी आझाद मैदानावर आंदोलन केले.यावेळी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी खा.सुप्रिया सुळे आंदोलन स्थळी आल्या होत्या.आंदोलकांचे म्हणणे ऐकल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी याविषयी चर्चा करणार असल्याचे सांगितले.पण रहिवाशांचे समाधान झाले नाही. या इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने वसई विरार महापालिकेला दिले आहेत.त्यामुळे पालिकेने येथील रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.खाजगी जमिनी बळकावून तसेच पालिकेच्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमण करून या इमारती बांधण्यात आल्या आहेत. नालासोपारा पूर्वेस अग्रवाल नगरी येथे भूमापन क्रमांक ( सर्व्हे नंबर ) २२ ते ३० पर्यंतचा…

Read More

दीपक मोहिते, राज्यात गेल्या काही वर्षात बालकामगारांची संख्या वाढली, पालघर जिल्ह्यात विविध उद्योगात बालकामगारांची संख्या सतत वाढत आहे.वीटभट्टी,हॉटेल्स,धाबे,किराणा मालाची दुकाने,घरकाम,वाड्या इ.क्षेत्रात सर्रास बालकामगार पाहायला मिळतात.आजच्या घडीला राज्यात सुमारे आठ ते दहा लाखाहून अधिक बालकामगार विविध धोकादायक उद्योगात काम करत आहेत. पण राज्याचे कामगार आयुक्त विभाग,हा वर्षानुवर्षे निद्रावस्थेत आहे.यासंदर्भात या विभागाने कोणतीही ठोस अशी कारवाई केली नाही. राज्यनिर्मितीला ६५ वर्षे पूर्ण झाली.या काळात अनेक कारखाने व अन्य व्यवसायात बालकामगार हे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. वास्तविक बालश्रम निर्मूलनासाठी या विभागाने आपले अधिकार व हक्क उद्योजकांकडे गहाण टाकले आहेत.त्यामुळे राज्यात बालकामगारांची संख्या सतत वाढत गेली.बालकामगार बंदी नियमन…

Read More

दीपक मोहिते, पेजरचे स्फोट ; आधुनिक तंत्रज्ञान अतिरेक्यांच्या हाती पडता कामा नये, गेल्या आठवड्यात इस्रायलच्या ” मोसाद,” या जगप्रसिद्ध गुप्तचर संघटनेने हिजबुल्लाह संघटनेच्या नेत्यांना ठार मारण्यासाठी पेजर व वॉकी-टॉकीचा बेमालूम वापर केला,तो वाखाणण्याजोगा असाच आहे.या हिजबुल्लाह संघटनेने इस्त्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात उडी घेतली असून त्यांनी इस्त्रीलावर ड्रोनच्या साहाय्याने क्षेपणास्त्रे डागण्यास सुरुवात केली होती.त्यांना रोखण्यासाठी इस्त्र्यालाच्या मोसाद या गुप्तचर संघटनेने नवीन मार्ग स्विकारला.हाती असलेल्या या पेजर व वॉकी-टॉकीमध्ये स्फोटके भरून मोसादने अनेक लॅबेनॉन शहरात अनेक स्फोट घडवून आणले.या घडामोडीनंतर लॅबेनॉनने आपल्या देशात इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यावर बंदी घातली.मोबाईलच्या वापरामुळे इस्त्र्यायलच्या सैन्याला आपले लोकेशन कळते,व तो आपल्या नेत्याना टिपून मारतो,हे लक्षात आल्यानंतर हिजबुल्ल्लाहच्या नेत्यांनी तसेच…

Read More