- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” रणसंग्राम,” वसई विधानसभा मतदारसंघ, आ.हितेंद्र ठाकूर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात… वसई विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ.हितेंद्र ठाकूर पुन्हा रिंगणात नसणार,या एकमेव कारणामुळे विविध पक्षाच्या अनेक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.२०१९ मध्ये सलग सहाव्यांदा निवडून आलेल्या आ.ठाकूर यांनी २०२४ ची निवडणूक मी लढवणार नाही,असे जाहीर केले होते.त्यामुळे यंदा वसई विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली.पण आ.हितेंद्र ठाकूर पुन्हा रिंगणात उतरतील,असे संकेत मिळू लागल्यामुळे सध्या इच्छुक उमेदवारांमध्ये काहीशी मायूसी निर्माण झाली आहे.आ.हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर आपली डाळ शिजू शकणार नाही, हे माहीत असल्यामुळे हे इच्छुक उमेदवार,यावेळी बविआचा उमेदवार कोण असेल,याविषयी कानोसा घेऊ लागले आहेत. आ.ठाकूर यांचा निवडणूक न लढवण्याचा निर्णय…
दीपक मोहिते, जाज्वल्य देशाभिमानच देशाला महासत्ता बनवू शकतो… आज देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.स्वातंत्र्याच्या साडेसात दशकात आपल्या देशाची झालेली वाटचाल वाखणण्याजोगी आहे.सुरुवातीच्या काळात अनेक आघाडीवर बलाढ्य देशानी आपली कोंडी केली.अन्न-धान्य,संरक्षण,परराष्ट्र धोरण,शिक्षण,आरोग्य व आर्थिक धोरण इ.क्षेत्रात आपण मागासलेलो होतो.परंतु आता तशी स्थिती राहिली नाही.वरील सर्व क्षेत्रात आपण स्वंयपूर्ण झालो आहोत,ही अभिमानाची बाब असून प्रत्येक भारतीयाने आज आपल्या तिरंग्याला सलाम करायलाच हवा.अठरापगड़ जाती-जमाती,विविध भाषा व संस्कृती,प्रचंड लोकसंख्या असलेला लोकशाहीप्रधान देश,अशी जगभरात आपली ओळख आहे.हे सारे एकसंघ ठेवून राज्यकारभार चालवण्याची किमया आपल्या राज्यकर्त्यानी यशस्वीरित्या करून दाखवली,याची नोंद आपण सर्वांनी घ्यायलाच हवी. गेल्या ७७ वर्षात देश विकसनशील देशाच्या रांगेत सामील झाला,जगभरात आता…
दीपक मोहिते, आंतरराष्ट्रीय घडामोडी,भाग क्र.४ फ्रंटलाईन, त्यामुळे मालदीव ताळ्यावर आला… मालदीव हा देश जमिनी क्षेत्रानुसार सर्वात लहान असा देश असून तो मुस्लिमबहुल आहे.दोन वर्षांपूर्वी झालेल्या जनगणनेमध्ये या देशाची लोकसंख्या पाच लाख पंधरा हजार इतकी असल्याचे स्पष्ट झाले.तो भारताच्या नैऋत्येस ६०० कि.मी.अंतरावर लक्षद्वीप समूहाजवळ २६ बेटांवर वसलेला आहे.माले ही त्याची राजधानी आहे.देशाचे वार्षिक सकल उत्पन्न हे २.८४ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके आहे.हा देश अनेक वर्षे ब्रिटनच्या ताब्यात होता.२६ जुलै १९६५ मध्ये तो स्वतंत्र झाला.या देशाशी भारताचे अत्यंत चांगले व सौहार्दाचे संबंध आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यामध्ये कटुता निर्माण झाली आहे.गेल्या निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रपती मोहंमद मुइज्जू यांनी भारताने आपल्या देशातील सैन्याला…
दिपक मोहिते, फ्रंटलाईन, मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर दोन नवीन मार्ग प्रस्तावित, सुमारे २६ हजार कोटी रु.खर्च अपेक्षित, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास अधिक सुखद व तो कमी वेळेत व्हावा,यासाठी मध्य रेल्वे दोन नवीन प्रकल्प हाती घेत आहे.कर्जत-तळेगाव व कर्जत-कामशेत असे हे दोन नवीन मार्ग तयार करण्यात येणार आहेत.या प्रस्तावित मार्गावर घाट नसल्यामुळे पुण्याला अवघ्या दोन ते अडीच तासात जाणे शक्य होणार आहे. मुंबई-पुणे १९२ कि.मी. अंतर पार करायला साध्य तीन तास लागतात.कर्जत-लोणावळा या दरम्यान घाट असल्यामुळे गाड्यांचा वेग कमी असतो.पण घाट टाळून होणारे हे दोन मार्ग सुरू झाल्यास गाड्या ११० की.मी.वेगाने धावतील व प्रवाशांना कमी वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे.त्यासाठी मध्य रेल्वेने दोन मार्गाचे…
दीपक मोहिते, निवडणूक वार्तापत्र, उमेदवारीसाठी,” पळा,कोण पुढे पळे तो,” शर्यत सुरू, राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला माफक प्रमाणात यश मिळाले असले तरी पालघर जिल्ह्यात या पक्षाचे अस्तित्व अत्यंत नगण्य असे आहे.पक्षाची स्थिती अत्यंत दयनीय असली तरी त्यांच्या इच्छुक उमेदवारामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मॅरेथॉन शर्यत सुरू झाली आहे.साधी ग्रामपंचायत निवडणूक लढवू न शकणारे काही स्वयंभू नेतेही या शर्यतीत सामील झाले आहेत. १९९५ साली आ.हितेंद्र ठाकूर काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर या पक्षाची अक्षरशः वाताहत होत गेली.त्याकाळी पक्षाला उभारी देणारे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही आ.हितेंद्र ठाकूर सोबत पक्षाला सोडचिट्ठी दिली.त्यानंतर काँग्रेसला काही किरकोळ अपवाद वगळता एकही निवडणूक लढवणे शक्य झाले नाही.गेल्या तीस वर्षात झालेल्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जे पोटात होते,ते ओठावर आले, रक्षाबंधनाच्या तोंडावर भाजपचे आ.रवी राणा व शिवसेनेचे ( शिंदे गट ) आ.महेश शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या ” लाडक्या बहिणीं,” ना थेट धमक्या दिल्यामुळे महायुतीच्या नेत्यांची सारवासारव करताना झालेली दमछाक उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर काल जळगाव येथे जाहीर सभेत बेंबीच्या देठापासून कोकलत होते.या दोघा आमदारांनी गमतीने हे वक्तव्य केले असल्याचे ते ” खोटं बोल,पण रेटून बोल,” या त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे बोलत होते. आ.राणा काय म्हणाले पाहूया,” जर तुम्ही आम्हाला भरभरून आशीर्वाद दिलात तर या १५०० रु.चे ३००० रु.होतील.पण जर का तुम्ही आशीर्वाद दिले नाहीत तर मी तुमचा…
दीपक मोहिते, आंतरराष्ट्रीय घडामोडी,भाग क्र.३, ” श्रीलंका,” फ्रंटलाईन, श्रीलंका ; देश अद्याप सावरू शकला नाही,चीनची संगत भोवली, बांगलादेशात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जे काही घडले तसेच दोन वर्षांपूर्वी श्रीलंकेत घडले होते.बांगला देशात जे काही घडले,त्याला अमेरिकेची फूस होती.तर श्रीलंकेतील घडामोडीमागे साम्यवादी चीन होता.या दोन्ही देशात जे काही घडले,त्यामध्ये एक साम्य होते,ते म्हणजे सत्तेत असलेले ” सरकार उलथवून टाकणे,” व दक्षिण आशियात पाय रोवणे.. गेल्या काही वर्षांपासून श्रीलंका या देशात निर्माण बिकट आर्थिक परिस्थितीमुळे तो देश पार डबघाईला आला आहे.या देशावर कोसळलेले आर्थिक संकट,हे अत्यंत भयावह असून त्यातून सावरण्यासाठी त्याला पाच ते सहा अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे.अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही आपला हात…
दीपक मोहिते, विधानसभा निवडणुकीचे पडघम, फ्रंटलाईन, लवकरच चार राज्याच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता, येत्या नोव्हें.महिन्यात महाराष्ट्रासह झारखंड,हरियाणा व जम्मू-काश्मीर या चार राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी चालवली आहे.या चारही राज्यातील मतदारयाद्या अद्यायावत करण्याचे काम येत्या २० ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे. जम्मू व काश्मीर राज्यात २०१८ साली भाजप व पीडीपी युतीचे सरकार होते,भाजपने २०१८ साली युती तोडल्यामुळे सरकार गडगडले,तेव्हापासून या राज्यात राष्ट्पती राजवट आहे.हरियाणा राज्यात भाजप-जेजेपी युतीचे सरकार होते.येत्या ३ नोव्हें.२०२४ रोजी विधानसभेची मुदत संपत आहे.येथे गेल्या निवडणुकीत भाजप व जेजेपी युतीला अनुक्रमे ४१ व १० जागा मिळाल्या होत्या.भाजपने अन्य सात अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आरक्षणप्रश्नी महायुतीच्या नेत्यांची अवस्था,” इकडे आड,तिकडे विहीर,” राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मराठा व ओबीसी आरक्षणप्रश्नी अडचणीत आणण्यासाठी महायुतीचे राज्यातील नेते सध्या निरनिराळे हातखंडे वापरत आहेत.मात्र त्यामध्ये त्याना शरद पवार काही यश मिळू देत नाहीत.काल शरद पवार यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवा व या बैठकीला मराठा नेता मनोज जरांगे पाटील व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनाही बोलवण्यात यावे,अशी थेट गुगलीच टाकल्यामुळे एकनाथ शिंदे यांना याविषयी प्रतिक्रिया द्यावी लागली तर छगन भुजबळ यांनीही सावध पवित्रा घेत,यातून काय निष्पन्न होणार ? असा उलट प्रश्न विचारला. गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या काही संघटना,( मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी…
पालघर, मुंबई-अहमदाबाद महामार्ग बांधणीच्या कामात प्रचंड हेळसांडपणा, ६०० कोटीचा चुराडा,नागरिक बेहाल, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग १२ लेनचा करणे,तसेच दहिसर ते तलासरी या ११० किमी. अंतराच्या मार्गाचे काँक्रीटीकरण करणे,या कामासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी नोव्हे.महिन्यात ६०० कोटी रु.निधी दिला. त्यानंतर संबधित ठेकेदाराने काम देखील सुरू केले.पण या कामात कोणतेही नियोजन नव्हते,तसेच बांधकामात वापरण्यात आलेल्या नित्कृष्ट दर्जाचे साहित्य,यामुळे या महामार्गाची सध्या पार दुर्दशा झाली आहे.या कामाकडे प्राधिकरणाचे अधिकारी फिरकत नसल्यामुळे ठेकेदार आपली मनमानी करत आहे.महामार्गाचे काम सुरू होऊन आठ महिन्याचा कालावधी लोटला पण केवळ ३५ ते ४० % च काम झाले आहे.या झालेल्या रस्त्यावर पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.काँक्रीटीकरण…
