दिपक मोहिते,
फ्रंटलाईन,
मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर दोन नवीन मार्ग प्रस्तावित,
सुमारे २६ हजार कोटी रु.खर्च अपेक्षित,
मुंबई-पुणे रेल्वे प्रवास अधिक सुखद व तो कमी वेळेत व्हावा,यासाठी मध्य रेल्वे दोन नवीन प्रकल्प हाती घेत आहे.कर्जत-तळेगाव व कर्जत-कामशेत असे हे दोन नवीन मार्ग तयार करण्यात येणार आहेत.या प्रस्तावित मार्गावर घाट नसल्यामुळे पुण्याला अवघ्या दोन ते अडीच तासात जाणे शक्य होणार आहे.
मुंबई-पुणे १९२ कि.मी. अंतर पार करायला साध्य तीन तास लागतात.कर्जत-लोणावळा या दरम्यान घाट असल्यामुळे गाड्यांचा वेग कमी असतो.पण घाट टाळून होणारे हे दोन मार्ग सुरू झाल्यास गाड्या ११० की.मी.वेगाने धावतील व प्रवाशांना कमी वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे.त्यासाठी मध्य रेल्वेने दोन मार्गाचे प्रस्ताव तयार केले आहेत.या दोन्ही प्रकल्पासाठी सुमारे २६ हजार कोटी रु.खर्च होणार आहेत.मुंबई-पुणे या मार्गावर दररोज हजारो चाकरमानी येजा करत असतात.हे दोन मार्ग सुरू झाल्यास या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.तसेच राज्यातील दोन महत्वाची शहरे जवळ येणार आहेत.

