- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” बदलते राजकारण,” येत्या १५ दिवसात राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी, महाराष्ट्रात येत्या आठवड्याभरात मोठा राजकीय बॉम्ब फुटणार आहे.त्याची कुणकुण महायुतीच्या नेत्याना लागल्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक,या बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग आला आहे.शरद पवार यांची भेट मिळावी,यासाठी अनेक आमदार रांगा लावत आहेत.त्यामध्ये महायुतीच्या २५ ते २८ आमदारांचा समावेश आहे.पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व शरद पवार यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती,महायुतीमधील अंतर्गत वाद,अजित पवार व एकनाथ शिंदे या दोघांमध्ये वाढत चाललेली दरी तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्याची सूत्रे काढून घेण्याच्या दिल्लीत सुरू झालेल्या हालचाली लक्षात घेऊन तिन्ही घटक…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप ; लोकमान्य टिळक स्वर्गात अश्रु ढाळत असतील, हिंदू धर्मात गणेशोत्सव व शिवजयंती,या दोन उत्सवाला अनन्यसाधारण महत्व असून हे दोन्ही उत्सव गेल्या अनेक शतकापासून उत्साहात साजरा करण्यात येत असतो.आपली संस्कृती व धर्म,याविषयी प्रत्येक हिंदूंच्या मनात अस्मिता कायम जागृत असावी. तसेच आपापसातील मतभेद दूर सारून सर्व भारतीयांनी एकत्र यावे,अशी लोकमान्य टिळकांची इच्छा होती.त्यातून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संकल्पनेचा जन्म झाला.स्वातंत्र्यपूर्व काळात पारतंत्र्यातील आपल्या बांधवांना संघटीत करावे व त्यांच्यामध्ये राष्ट्रीय अस्मिता जागृती करावा,असाही एक उद्देश होता.परंतु अलीकडच्या काळात लोकमान्यांनी सुरू केलेल्या या उत्सवाला हिडीस स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे.हल्ली लाडक्या बाप्पाला किती सोने व पैसे जमा होतात,यावर गणपतीचे…
दीपक मोहिते, सरन्यायाधीशानी मौन सोडायला हवे,अन्यथा चौथा स्तंभही निखळून पडेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाण्यावरून देशभरात जो धुरळा उडाला होता,तो आता बराच खाली आला आहे.या प्रकरणी अनेक घटनातज्ञानी, पंतप्रधान व सरन्यायाधीशांनी लोकशाही मूल्ये जपली पाहिजेत,अशा शब्दात या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.आता हा गदारोळ संपत आला असला तरी या दोघांनी या प्रकरणी जे मौन बाळगले आहे,ते अत्यंत चिंताजनक तर आहेच पण आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारेही आहे.या दोघांपैकी एकाने तरी कोणी कोणाला बोलावले ? याविषयी खुलासा करणे,गरजेचे होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वभाव लक्षात घेता,ते कधीही खुलासा करण्याच्या भानगडीत पडत नाहीत.पण सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे मौन…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आम्हाला असले सावत्र भाऊ नकोत- अंगणवाडी सेविका, कोणत्याही परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुका जिंकायच्याच या इर्षेने तीन इंजिनच्या सरकारने सरकारी खजिन्याची अक्षरशः लूट चालवली आहे.” मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना,” राबवण्यासाठी इतर विभागाचा पैसा ओरबाडून खाण्यात येत आहे.योजनांच्या प्रसिद्धीसाठी करण्यात येणाऱ्या जाहिरातीसाठी २७० कोटी रु.मंजूर करण्यात आले आहेत.मुख्यमंत्री लाडकी बहीण इतर योजनांसाठी लागणाऱ्या ८० हजार कोटी रु.चा बोजा सरकारी खजिन्यावर पडेल,अशी भिती अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या नव्या योजनांमुळे राज्याचे आर्थिक गोळा बेरीज पूर्णपणे कोलमडून पडली आहे.दुसरीकडे जुनी पेंशन योजना लागू करा,यासाठी विविध संघटनांनी सरकार प्रचंड दबाव वाढवला आहे.त्यामुळे सरकार सध्या अडचणीत आले आहे.ही…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” देशात ” एक देश,एक निवडणूक,” संकल्पनेचे वारे वाहू लागले, ” एक देश,एक निवडणूक,” हा विषय गेली अनेक वर्षे चर्चेत आहे.गेल्या महिन्यात स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आपल्या भाषणात ” एकत्रित निवडणुका,” घेण्याचा आपला मनोदय व्यक्त केला होता.काल त्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्याचा मनोदय व्यक्त केल्यामुळे देशातील प्रादेशिक पक्षासह राष्ट्रीय पक्ष सावध झाले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना प्रादेशिक पक्षामुळे देशावर एकछत्री कारभार करणे,शक्य होत नाही.या प्रादेशिक पक्षामुळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे ” अबकी बार ४०० पार,” चे स्वप्न पार भंगले. त्यामुळे २०२९ च्या निवडणुका या एकत्रित निवडणूक पद्धतीने…
दीपक मोहिते, ” जुगलबंदी,” लवकरच धुळवडीचे शिमग्यात रूपांतर होणार, आपल्याकडे होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवडीच्या दिवशी आपण एकमेकांवर रंगाची उधळण करत असतो.पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक पूर्व धुळवडीला सुरुवात केली आहे.या धुळवडीचे येणाऱ्या काळात शिमग्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना, ” आपल्याला गुलाबी रंगाची गरज नाही,आपला सफेद असलेला पेहराव स्वच्छ आहे,आणि तो इतर कोणत्याही रंगाला फिकट करु शकतो.त्यामुळे आपल्याला गुलाबी होण्याची गरज नाही,असे वक्तव्य केले.त्यांच्या या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका न करता ” सफेद रंग हा चांगलाच असल्या,” चे सांगून यावरून वाद…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शिंदे यांच्या मुखातून भाजपच बोलत आहे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुका,या नोव्हे.मध्ये होतील,असे संकेत दिले आहेत.या निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे,असेही ते पुढे म्हणाले. निवडणूक कधी होणार,याविषयी शिंदे यांनी दिलेल्या संकेतासोबत त्यांनी महायुतीचे जगावाटप कशा पद्ध्तीने होईल,याबाबत माहिती दिली आहे.ते म्हणाले,नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट पाहून जागावाटप होईल.यापूर्वी भाजपनेही महायुतीमध्ये या अशाच पद्धतीने जागावाटप करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.त्यामुळे काल शिंदे यांनी जे भाष्य केले,त्यावरून त्यांच्या मुखातून भाजपच बोलले आहे,अशी चर्चा सुरू झाली आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप स्ट्राईक रेट मध्ये अव्वल क्रमांकावर होता,त्यानंतर शिवसेना (…
दीपक मोहिते, सूर्यातीर, स्थानिक भूमीपुत्रांचे पारंपारीक व्यवसाय टिकायला हवेत, कोकण विभाग हा शेती व मासेमारी व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे.या विभागाला ७२० कि.मी.लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.येथे शेती व मासेमारी या दोन व्यवसायावर हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.या दोन्ही व्यवसायाने स्थानिक भूमीपुत्राना आर्थिक सुबत्ता मिळवून दिली.मात्र गेल्या काही वर्षात या दोन्ही क्षेत्राला घरघर लागली असून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे क्षेत्र प्रचंड प्रमाणात घटत गेले.मासेमारी क्षेत्र मात्र कमी होण्यामागे अनेक मानवनिर्मित कारणे आहेत. या दोन्ही व्यवसायात अपार कष्ट करत स्थानिक भूमिपुत्र कसेबसे टिकून आहेत.पण गेल्या काही वर्षात स्थानिक भूमिपुत्राची मुले या क्षेत्रापासून फारकत घेऊ लागले आहेत.कारण या व्यवसायात धनदांडग्याचा शिरकाव,निसर्गाचा लहरीपणा व मत्स्यउत्पादनात सतत होणारी घट,इ.महत्वाच्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वसई विधानसभा ; कॉग्रेसच्या अनेकांचे गुडघ्याला बाशिंग, महाविकास आघाडीमध्ये सध्या वसई विधानसभा मतदारसंघ ही जागा कोणी लढवायची यावरून शिवसेना ( उबाठा ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मतैक्य होत नसल्याचे समोर आले आहे.आजच्या घडीला शिवसेनेकडे पण आ.हितेंद्र ठाकूर यांना टक्कर देईल,असा चेहरा नाही,तरीही त्यांनी या जागेचा हट्ट धरला आहे.पण ही जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडेच जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यांचे उमेदवार संभाव्य उमेदवार विजय पाटील यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुमारे ७६ हजार ९५५ मते घेतली होती.तरीही आ.हितेंद्र ठाकूर यांच्याकडून त्यांचा २५ हजार ९९५ मतांनी पराभव झाला.या लढतीत आ.ठाकूर यांना १ लाख २ हजार ९५० मते मिळाली होती.त्यांना…
दीपक मोहिते, “सांस बोल,” वसई गाव; कॉग्रेसच्या अनेकांचे ” गुडघ्याला बाशिंग,” शिवसेना (उबाठा) यांच्याकडून महाविकास राज्यामध्ये सध्या वसईेंद्र कोड ही जागा कोणीही समाधानी आहे. पण ही जागा भारतीय राष्ट्रीयत्वाकडे जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यांचे समर्थक विजय पाटील यांनी २०१९ च्या लोकशाहीच्या सुमारे ७६ हजार ९५५ मते मांडली होती तरी आ.हितेंद्र ठाकूर यांच्याकडून २५ हजार ९९५ मत मांडले होते. मत ५४.१८ % तर विजय पाटील यांना ४०.०५ % मते पडली. आमदार मनसेचे प्रफु ठाकूर यांना ३ हजार ५४० मते (१.८६ % ) विजय पाटील यांना विजय पाटील यांनी सांगितले. ख्रीष्टी मते होती.पण या कदापि ही माहिती पुन्हा आ.ठाकूर यांच्या पारत जाण्याची…
