दीपक मोहिते,
” जुगलबंदी,”
लवकरच धुळवडीचे शिमग्यात रूपांतर होणार,
आपल्याकडे होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवडीच्या दिवशी आपण एकमेकांवर रंगाची उधळण करत असतो.पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक पूर्व धुळवडीला सुरुवात केली आहे.या धुळवडीचे येणाऱ्या काळात शिमग्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे.
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना, ” आपल्याला गुलाबी रंगाची गरज नाही,आपला सफेद असलेला पेहराव स्वच्छ आहे,आणि तो इतर कोणत्याही रंगाला फिकट करु शकतो.त्यामुळे आपल्याला गुलाबी होण्याची गरज नाही,असे वक्तव्य केले.त्यांच्या या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका न करता ” सफेद रंग हा चांगलाच असल्या,” चे सांगून यावरून वाद घालण्याचे टाळले.आपण मुख्यमंत्र्याच्या वक्तव्यावर पलटवार केल्यास माध्यमांना आयते कोलीत मिळेल,हे लक्षात घेऊन त्यांनी ” हाताची घडी,तोंडावर बोट,” अशी भूमिका घेतली.पण अजित पवार यांनी ” मुख्यमंत्री,माझी लाडकी बहीण योजने,” च्या नावातून मुख्यमंत्री हा शब्द गायब करणे व त्यांच्या होर्डिंगवर फक्त स्वतःचाच फोटो लावणे,अशा त्यांच्या करणीमुळे शिंदे,हे त्यांच्यावर नाराज आहेत.त्यामुळे त्यांच्या अनेक वक्तव्यातून अधून मधून खदखद बाहेर पडत असते.सध्या सुप्तावस्थेत असलेल्या धुळवडीचे रूपांतर येणाऱ्या काळात शिमग्यात होण्याची दाट शक्यता आहे.

