दीपक मोहिते,
” बदलते राजकारण,”
येत्या १५ दिवसात राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी,
महाराष्ट्रात येत्या आठवड्याभरात मोठा राजकीय बॉम्ब फुटणार आहे.त्याची कुणकुण महायुतीच्या नेत्याना लागल्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक,या बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग आला आहे.शरद पवार यांची भेट मिळावी,यासाठी अनेक आमदार रांगा लावत आहेत.त्यामध्ये महायुतीच्या २५ ते २८ आमदारांचा समावेश आहे.पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व शरद पवार यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.
राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती,महायुतीमधील अंतर्गत वाद,अजित पवार व एकनाथ शिंदे या दोघांमध्ये वाढत चाललेली दरी तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्याची सूत्रे काढून घेण्याच्या दिल्लीत सुरू झालेल्या हालचाली लक्षात घेऊन तिन्ही घटक पक्षाच्या आमदारांची पळापळ सुरू झाली आहे.तिन्ही पक्षातील आमदारांचा कल शरद पवार यांच्याकडे असल्याचे पाहून शिवसेना व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या गोटातही सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे.शिंदे गटाचे अनेक आमदार देखील उद्धव ठाकरे गटाकडे वळण्याच्या मनस्थितीत आहेत.अशा घडामोडींना वेग आला असताना भाजपच्या केंद्रीय नेत्यानी देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत शासकीय निवासस्थान दिल्यामुळे राज्य भाजपमध्येही सध्या प्रचंड चलबिचल निर्माण झाली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ते दिल्लीश्वरांच्या मनातून साफ उतरले आहेत.पुतळा पडल्यानंतर,” हा पुतळा नाविक दलाने उभा केला होता,” असे सांगून आपली जबाबदारी झटकली होती.त्यामुळे त्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उपस्थित राहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी,संरक्षणमंत्री राजनाथसिंग हे दोघे फडणवीस यांच्यावर प्रचंड नाराज आहेत.त्यामुळे मोदी यांना मुंबई आल्यानंतर माफी मागावी लागली होती.या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना दिल्लीत आणून अडगळीत टाकण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.तसेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आगामी विधानसभा निवडणुकीची सूत्रे सोपवणे,पंकजा मुंडे व रावसाहेब दानवे,या दोघांचा लोकसभा निवडणुकीत पराभव होऊनही त्यांचा निवडणूक समितीमध्ये समावेश करणे,या सर्व घडामोडी फडणवीस यांच्यासाठी मारक ठरल्या आहेत.राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन भाजप आता उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या ” सोशल इंजिनिरिंग,” चा प्रयोग महाराष्ट्राच्या राजकारणात राबवण्याच्या तयारीला लागल्याचे संकेत मिळू लागले आहेत.चार दिवसापूर्वी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना ” त्यांच्या प्रवेशाचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला असल्याचे स्वतःहून सांगावे लागले,यावरून फडणवीस यांचे भाजपमधील स्थान काहीसे डळमळीत झाल्याचे दिसून येत आहे.राज्यात एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस व अजित पवार या तिघांविरोधात महाराष्ट्राच्या जनतेत प्रचंड असंतोष आहे,हे आता लपून राहिलेले नाही,त्यामुळे भाजपने नितीन गडकरी,पंकजा मुंडे व रावसाहेब दानवे या तिघांना पुढे केले आहे.या तिघांपैकी नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आले आहेत.राजकारणातील एक सभ्य व सुसंस्कृत चेहरा,अशी त्यांची ओळख आहे.तर पंकजा मुंडे या ओबीसी तर रावसाहेब दानवे हे मराठा आहेत.हे दोन्ही समाज आरक्षण प्रश्नी महायुती सरकारवर प्रचंड नाराज आहेत.त्यामुळे ब्राम्हण,ओबीसी व मराठा,अशा तिघांची मोट बांधून भाजपच्या दिल्लीश्वरानी ” सोशल इंजिनिरिंग,” चा प्रयोग महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय घेतला आहे.शरद पवार व उद्धव ठाकरे यांना रोखण्यासाठी त्यांनी अशाप्रकारची रणनिती आखली आहे,पण त्याला किती यश मिळेल,सांगणे सध्या तरी कठीण आहे.

