दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
शिंदे यांच्या मुखातून भाजपच बोलत आहे,
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुका,या नोव्हे.मध्ये होतील,असे संकेत दिले आहेत.या निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे,असेही ते पुढे म्हणाले.
निवडणूक कधी होणार,याविषयी शिंदे यांनी दिलेल्या संकेतासोबत त्यांनी महायुतीचे जगावाटप कशा पद्ध्तीने होईल,याबाबत माहिती दिली आहे.ते म्हणाले,नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट पाहून जागावाटप होईल.यापूर्वी भाजपनेही महायुतीमध्ये या अशाच पद्धतीने जागावाटप करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.त्यामुळे काल शिंदे यांनी जे भाष्य केले,त्यावरून त्यांच्या मुखातून भाजपच बोलले आहे,अशी चर्चा सुरू झाली आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप स्ट्राईक रेट मध्ये अव्वल क्रमांकावर होता,त्यानंतर शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) तर राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) हा तिसऱ्या क्रमांकावर राहीला.स्ट्राईक रेटची क्रमवारी लक्षात घेता,अजित पवार गटाच्या वाट्याला नाममात्र जागा येण्याची शक्यता आहे.अजित पवार गटाबाबत राज्यात असलेली नाराजी लक्षात घेऊन भाजप व शिंदे गटाने ही चाल खेळली आहे.मध्यंतरी गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे मुंबईच्या दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यानी देवेंद्र फडणवीस व राज्यातील नेत्यांसोबत बंद खोलीत चर्चा केली होती.त्यानंतर शिंदे यांनी ” स्ट्राईक रेट व जिंकून येण्याची शक्यता,” असे दोन निकष आपल्या पोतडीतून बाहेर काढले आहेत.गृहमंत्री अमित शहा हे अजित पवार गटाला सोबत घेऊन निवडणुकाना सामोरे जा,असे सांगतात,तर दुसरीकडे स्ट्राईक रेटची टूम बाहेर काढतात.यावरून एक गोष्ट स्पष्ट होते कि जागावाटपात अजित पवार गटाची नक्की गळचेपी होणार आहे.

