- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर, वाडा वाडा येथे प्रदूषणकारी टायर कंपनीच्या परवानगीचा उफाळला वाद, तालुक्यातील कोनसई या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये आशा इंड्रस्टीज या टायर कंपनीने परवानगी मागीतली होती.या परवानगीच्या ठरावाला ग्रामस्थांचा सक्त विरोध असताना राजकीय दबावापोटी ग्रामपंचायत अधिकारी पंकज चौधरी यांनी ती देण्याची तयारी चालवली होती.त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्यांना काही तास ग्रामपंचायत कार्यालयात घेराव घातला.ग्रामस्थ आक्रमक झाल्याने अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलीस आल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. या प्रदूषणकारी कंपनीला देण्यात आलेल्या परवानगीमुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,तालुक्यातील कोनसई या गावातील नागरिकांनी ग्रामसभेत प्रदूषणकारी कंपन्या कायमच्या बंद करण्याकरिता व भविष्यामध्ये प्रदूषण कारी कंपन्याना परवानगी देण्यात येऊ नये असा ठराव क्रमांक १ (…
दिपक मोहिते, भान असायला हवे, …अन्यथा कपाळमोक्ष ठरलेला आहे, गेल्या आठवड्यात वसई तालुक्यात अतिवृष्टी होऊन वसई,विरार व नालासोपारा या तीन महानगरात हाहाकार उडाला.अनेकांच्या घरात,दुकानात पाणी शिरले व सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान व हाल झाले.या दुर्देवी प्रसंगात तालुक्याचे जनजीवन तीन ते चार दिवस पार विस्कळीत झाले.सध्या पावसाचा जोर ओसरल्यामुळे या महानगरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अशा या अस्मानी संकटात सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले असताना सोशल मिडियावर एक व्हिडियो क्लिप व्हायरल झाली व लोकांच्या मनात एक ना अनेक प्रश्न उभे ठाकले.नालासोपारा पूर्व भागात असलेल्या एका गटारामधून सांडपाणी निचरा न झाल्यामुळे लोकांच्या घराघरात पाणी शिरल्याचे स्थानिकांचे म्हणणे होते.स्थानिक पातळीवर काम करणारी गाव संघर्ष…
दिपक मोहिते, महायुतीमध्ये मिठाचा खडा, भाजपने प्रकाश निकम याना पक्षात घेऊन शिंदे गटावर एकप्रकारे सूडच उगवला, गेल्या आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे गटाचे नेते व पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम व त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन चांगलाच सूड उगवला आहे.त्यामुळे शिंदे गटाचे स्थानिक नेत्यांच्या अंगाचा तिळपापड झाला आहे.त्यांच्या जिल्हाप्रमुखानी भाजपने असे फोडाफोडीचे राजकारण,यापुढे असेच सुरू ठेवल्यास आम्हीही त्याला जसेच्या तसेच उत्तर देऊ,अशी थेट धमकी दिली आहे. पालघर येथे शिंदे गटाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अशाप्रकारची धमकी दिली.पण त्यावर भाजपकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. राज्यात महायुती असली असली तरी स्थानिक पातळीवर शिंदे गट व भाजपचे…
सुनील पाडवी,वसई मध्यरात्री धुमाकूळ घालणाऱ्या बारवर वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांची धाड, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्त्याच्या पॅचवर्क पाहणीदरम्यान आ.स्नेहा दुबे पंडित यांनी दत्तानी मॉल परिसराची पाहणी केली. यावेळी मॉलमधील विंग्स ऑन फायर बार व पंखा फास्ट बार येथे डिजेच्या कर्णकर्कश आवाजात धुमाकूळ सूरू होता.तसेच मॉलबाहेर तरुणांकडून मद्यप्राशन करून भांडण सुरू असल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही मध्यरात्री २.३० वाजता हे बार कायदा मोडून सर्रासपणे सुरू असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आले. या संदर्भात आ.स्नेहा दुबे पंडित यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ घटनास्थळी बोलावून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. “आमचा कोणत्याही व्यवसायाला विरोध नाही, मात्र कायदा मोडून रात्री २.३०…
सचिन पाटील,वसई गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आ.दुबे-पंडीत यांची मध्यरात्री रस्त्यांची पाहणी, आज वसईच्या आ.स्नेहा दुबे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री प्रत्यक्ष प्रत्येक स्थळांवर भेट देऊन रस्त्यांच्या पॅचवर्क,पेव्हर ब्लॉक व दुरुस्ती कामांची पाहणी केली. यामध्ये १ ) अग्रवाल नाका परिसर,२ ) स्टार सिटी जूचंद्र, ३ ) वामन ढाबा ते तिवरी फाटा नायगाव पूर्व व ४ ) वसई ईस्ट-वेस्ट ब्रिज ते मधुबन वसई पूर्व या रस्त्यांचा समावेश होता.रात्री १.०० वाजता सुरु झालेला पाहणी दौरा पहाटे ०४.०० वाजेपर्यंत सूरू होता.या दरम्यान अखंड पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली व चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या ठेकेदाराला चांगलेच फैलावर घेतले. कामाची गती व गुणवत्ता तपासून नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने आणि…
वसंत भोईर,वाडा आठ दिवसांच्या अतिवृष्टीने भातशेतीचे मोठे नुकसान वाड्यात गेले आठ दिवस विश्रांती न घेता धो-धो कोसळणा-या पावसाने अखेर आज उसंत घेतली आहे.त्यामुळे येथील नागरिकांना आज सुर्यदेवाचे दर्शन झाले. गेले आठ दिवस सतत मुसळधार कोसळणा-या पावसामुळे तालुक्यात सर्वत्र पुरपरिस्थीती निर्माण झाली होती.या अस्मानी संकटात शेतकऱ्यांसह अनेक नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.नदी,नाले,ओहोळ तुडूंब भरून दुथडी भरून वाहत असल्यामुळे येथील जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले होते.भातलागवड करण्यात आलेल्या शेतजमिनीला अक्षरश : पुराने विळखा घातला होता.आठ दिवस शेतजमीन पाण्याखाली राहील्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.या अतिवृष्टीचा विपरीत परिणाम भातशेतीवर मोठ्या प्रमाणात झाला असून अनेक शेतकऱ्यांची भात लागवड कुजून वाया गेली.शासनाने नुकसानीचे तातडीने…
जव्हार,प्रतिनिधी, झाप ग्रा.पं.च्या ग्रामसभेत विकासाचे अनेक ठराव संमत, जव्हार तालुक्यातील झाप ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच एकनाथ दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली आनंदी वातावरणात पार पडली.या ग्रामसभेत शिक्षण,आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी यांना प्राधान्य देणारे अनेक ठराव मंजूर करण्यात आले. या ग्रामसभेत नाशिक येथे सुरू असलेल्या रोजंदारी शिक्षकांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यात आला. शिक्षकांना बाह्य स्त्रोतांमार्फत आदेश न देता थेट रोजंदारीवरच नियुक्ती द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रातील अन्यायकारक मध्यस्थी टळून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची हमी मिळणार आहे.तसेच शालेय मुलांना मिळणारे मध्यान्ह भोजन पुन्हा शाळांमधूनच देण्यात यावे,असे ठरवण्यात आले.या निर्णयामुळे मुलांना ताजे व पौष्टिक अन्न मिळणार असून,स्थानिक स्वयंपाकी महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार…
दीपक मोहिते, निर्मळ येथे २३ व २४ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय हवामान परिषद २०२५ चे आयोजन, आपली वसई, आपला विकास आणि युथ फॉर युनिटी अँड व्हॉलंटरी अॅक्शन (युवा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी समाज सेवा मंडळ हॉल,निर्मल नाका,वसई ( पश्चिम ) येथे हवामान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. वसई-विरारचे होणारे नागरीकरण,शेती,मासेमारी व उपजीविकेवर होणारा परिणाम,वसईतील लोकांचा सततचा पर्यावरण विषयक सुरु असलेला संघर्ष याबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.शहराच्या लोकसंख्येचा मोठा वाटा असलेल्या श्रमिकांच्या वस्त्यांना बहुतेकदा हवामानाच्या परिणामांचा सर्वात आधी सामना करावा लागतो.वारंवार येणारे पूर, अपुरा ड्रेनेज किंवा उपजीविकेच्या जागा गमावल्यामुळे बांधकाम, बाजारपेठ किंवा लघु उद्योगांमध्ये…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शिंदे गटाचा बालेकिल्ला उध्वस्त करण्यासाठी भाजपचे फोडाफोडीचे राजकारण सुरू, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून फोडाफोडीच्या राजकारणाने चांगलाच वेग घेतला आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून या खेळीला प्राधान्य देण्यात येत आहे.निवडणुका जाहीर होण्यापूर्वी फोडाफोडीचे राजकारण करून राजकीय पक्षांना खिळखिळे करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.पालघर जिल्ह्यात अशाप्रकारची मोहीम सुरू झाली आहे.विरोधी पक्षासह मित्र पक्ष देखील त्यांच्या नजरेतून सुटलेले दिसत नाहीत.त्यांच्या या खेळीचा दणका मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाला नुकताच बसला आहे. काल पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम,तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट ) नंदकुमार पाटील,त्यांच्या पत्नी रेश्मा पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सारिका निकम,शिरगावचे…
अनंत संख्ये, बोईसर तारापूर येथे वायुगळती ; चौघाचा मृत्यू तर दोन जण जख्मी, काल दुपारी बोईसर – तारापूर औद्योगिक वसाहतीमधील मेडले फर्मास्युटिकल लिमिटेड या केमिकल कंपनीच्या युनिट क्र.एफ – १३ च्या नायट्रोजन रिऍक्शन टाकीतून गॅसगळती होऊन चार कामगार मृत्यूमुखी पडले.तर अन्य दोघेजण गंभीर झाले. दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान ही दुर्घटना घडली असुन कंपनीत कामकाज सुरु असताना अचानक ही गळती सुरु झाली.या दुर्घटनेत कल्पेश राऊत,वय ४३ राहणार मु.पो चिंचणी,ता. डहाणू,बंगाली ठाकूर,वय ४६, राहणार-अथमलगोला,पटना ( बिहार ), धीरज प्रजापती,वय -३१, राहणार – शिवाजीनगर, सालवड ( बोईसर ) कमलेश यादव,वय-३१ राहणार,शिवाजीनगर,सालवड ( बोईसर ),मुळगाव – सेठाकोली,पोस्ट – बैजाबारी रौनापार,आजमगड ( यू.पी.) या…
